कसारा घाटाचा पहारेकरी “किल्ला बळवंतगड”....

सह्याद्री डोंगररांगाच्या कुशीत असलेला हा घाट तसा सगळ्यांच्याच आठवणीत आहे हिरवागार शालू नेसलेली वनश्री, खोल दरी, त्यातून गेलेला वळणावळणांचा रस्ता तर मधेच डोंगराच्या कुशीत असलेला झाडाझुडपांनी वेढलेला काळाशार रस्ता काळवंडून आलेलं आकाश निसर्गसुंदर मुंबई नाशिक महामार्ग कसारा घाट....
कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या प्राचीन “थळ घाट” थळ घाटाला मोठा प्राचीन इतिहास आहे थळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जव्हार त्र्यंबकेश्वर मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी थळ घाटाच्या समोरच्या डोंगरावर बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला बांधण्यात आला होता थळ घाटाच्या समोर मुख्य डोंगर रांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर बळवंतगड किल्ला आहे...
गडावर किल्ल्याचे अवशेष फार काही नाहीत काही बाजूची तटबंदी मात्र आजतागायत शाबूत आहे गडाच्या मधोमध आल्यावर नंदी, पिंड आणि देवीची मूर्ती आहे ह्या मंदिराच्या खालच्याच बाजूला एक टाक आहे पण तिथे जाण्यासाठी थोड पुढे जाऊन मग खाली उतरावं लागत टाक बऱ्यापैकी मोठ आहे गडाच्या शेवटी गेल्यावर एक बुरुज आपल्या नजरेत दिसून येतो तो बुरुज अजूनही गडाची राखण करत उभा आहे गडावर दोन चौथऱ्याचे अवशेष आहेत...










फोटोग्राफी : @flying_wanderer27 

No comments:
Post a Comment