Followers

Monday, 24 October 2022

करवीर छत्रपती घराण्याचे राजाराम छत्रपती महाराज (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०)

 पोस्तसांभार ::

Pradnyesh Shailaja Dnyaneshwar Molak  



















Florence, Italy

आपला इतिहास… आपला अभिमान!
करवीर छत्रपती घराण्याचे राजाराम छत्रपती महाराज (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०) यांच्या इटली येथील फ्लोरेन्सच्या समाधी स्मारकाला मी नुकतीच भेट दिली. यापूर्वी भारतातून अनेक लोकं तिथं वंदन करण्यासाठी गेले आहेत. तरीसुद्धा बहुसंख्य लोकांसाठी ही वास्तू अपरिचित आहे किंबहुना त्याचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवलाच गेला नाही हे जरी खरं असलं तरीही आपल्याला इतिहासात किती खोल जायला आवडतं हा व्यक्तीसापेक्ष प्रश्न आहे.
कोल्हापूरचे युवराज Sambhajiraje Chhatrapati हे तिथे २/३ महिन्यांपूर्वी राजाराम छत्रपती महाराजांना अभिवादन करण्यासाठी सहकुटुंब गेले होते. त्यांनी तेव्हा यथोचित अशी पूजा करुन लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवली होती. जेव्हा त्यांना समजलं मी युरोप दौऱ्यावर असताना इटलीला जात आहे तर त्यांनी आवर्जून मला त्या समाधी स्थळास भेट द्यायला सांगितलं. एवढंच नाही तर फ्लोरेन्समधील अजून काही ठिकाणं अन् गोष्टी सुचवल्या. छत्रपती घराण्यातील बऱ्याच लोकांनी तिथे भेट दिली आहे.
तर मित्रांनो, मी तिथे ५ किलोमीटर सायकल करुन पोहोचलो. निळं - पांढरं आभाळ, नदीकाठचा रस्ता, १६० हेक्टरचे भव्य असे गार्डन अशा प्रसन्न वातावरणात राजाराम छत्रपती महाराजांची समाधी आहे. अशा ठिकाणी मी व्हिडिओ करतच पोहोचलो. जशी सायकल पार्क केली तिथे जवळपास ७०/८० विद्यार्थी मला दिसले. मी विचार केला की इथं का आले असतील? तर फ्लोरेन्सच्या विविध मॅप्स् मध्ये या समाधीचा उल्लेख आहे. तसेच Lonely Planet या माध्यमाद्वारे देखील याची माहिती मिळते. या संपूर्ण परिसराचा Monumento all’Indiano असा उल्लेख सगळीकडे आढळतो. थोडक्यात काय तर पार्क, Indiana Palace Cafe, Indiano Bridge आणि Monument to the Maratha Maharajah of Kolhapur, Rajaram Chhatrapati असा हा फ्लोरेन्समधील भव्य व सुंदर भाग!
छत्रपती घराण्यातील राजाराम छत्रपती महाराज हे पहिले राजे होते जे की परदेशात गेले होते. त्यांचं मूळ नाव नागोजीराव पाटणकर. त्यांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तर होतच शिवाय त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी ते छत्रपती म्हणून विराजमान झाले. १८ ऑगस्ट १८६६ ते ३० नोव्हेंबर १८७० हा त्यांचा कार्यकाळ अतिशय यशस्वी राहिला. तब्बल १५० वर्षांपूर्वी १९ व्या शतकात १८७० साली राजाराम छत्रपती महाराज त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत युरोपात जातात ही गोष्टच भारी वाटते. खरं तर त्यांना लंडन येथे व्हिक्टोरिया राणीला भेटायची इच्छा होती. परंतु राणी तेव्हा लंडनमध्ये नसल्यामुळे तेथील तत्कालीन पंतप्रधान विल्यम इवॉर्ट ग्लॅडस्टोन यांनी त्यांचं आदरातिथ्य करुन योग्य तो मान-सन्मान केला. त्यांच्या भारताच्या परतीच्या प्रवासात त्यांनी युरोपचा काही भाग पहावा असं विल्यम यांनी सुचवलं. त्याप्रमाणे राजाराम छत्रपती महाराजांनी पुढील आखणी केली.
मग राजाराम महाराजांनी फ्रांस, बेल्जियम, जर्मनी व उत्तर इटली असा परिसर पाहिला. याचा संपूर्ण इतिवृतांत महाराज रोज लिहायचे. ‘Diary of the late Rajah of Kolhapoor, during his visit to Europe in 1870,’ या नावानी हे पुस्तक पुढे प्रकाशित करण्यात आलं. आजही ते वाचण्यासाठी उपलब्ध आहे. मी ही या डायरीची पानं शांतपणे व सविस्तर चाळली व त्यातून बरीच नवी माहिती मिळाली. जर्मनीतील आल्प्सच्या पर्वतरांगातून उत्तर इटलीतील बोलझानो येथे प्रवास करत असताना राजाराम छत्रपती महाराजांना संधिवाताचा त्रास सुरु झाला. या घातक आजारामुळे त्यांना फ्लोरेन्स येथे आणण्यात आलं. २/३ डॉक्टरांनी तपासलं, उपचार केले परंतु त्यांच्या तब्येतीने साथ दिली नाही. आणि, दुर्दैवाने राजाराम छत्रपती महाराजांचे निधन झालं. एका प्रभावशाली, हुशार व तेजस्वी राजाचा असा शेवट होणं मनाला आजही चटका लावून जातं…
पुढे त्यांचे अंत्यसंस्कार हिंदू रितीरिवाजात पार पाडले जावेत असा त्यांच्या सहकाऱ्यांनी आग्रह धरला. त्यावर तिथे वादविवाद झाला. परंतु महाराजा असल्यामुळे अंत्यविधीसाठी विशेष परवानगी मिळाली. अर्नो व मुगनॉन या नद्यांच्या पवित्र संगमावर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. इटलीमध्ये अशा पद्धतीचा विधी कधीच घडला नव्हता. स्थानिक लोकांमध्ये त्याविषयी कुतुहल निर्माण झाले व बघण्यासाठी गर्दी देखील झाली. या संपूर्ण प्रसंगाचा इतिवृतांत तेथून कोल्हापूरला पाठवण्यात आला.
राजाराम छत्रपती महाराजांचे इटलीतील फ्लोरेन्स येथे समाधी स्मारक बांधण्याची चर्चा सुरु झाली. काही प्रमाणात पत्रव्यवहार झाला. कोल्हापूरहून आर्किटेक्ट क्यापटन चार्ल्स मॉंट यांनी या छत्रीची Indo-Saracenic Style ची डिझाईन तयार करुन पाठवली व चार्ल्स फ्रान्सिस फुलर यांनी अतिशय उत्तमरित्या मार्बल मटेरियलचा बस्ट पुतळा साकारला. १८७४ साली हे समाधी स्मारक तयार झालं व सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. पुतळ्याच्या खालील बाजूस इटालियन, इंग्रजी, मराठी व संस्कृत भाषेत महाराजांचे नाव, मृत्यूची तारीख व स्मारकाची योजना असे उल्लेख आहेत. तसेच ‘Maharaja of Kolhapur’ असा लोगोही आहे.
१९०२ साली छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे या समाधीस्थळी अभिवादन करण्यास गेले. आजतागायत भरपूर लोकांनी तिथे भेट दिली आहे. या समाधीचे नुतनीकरण काही वर्षांपूर्वी झाले. इटालियन सरकार १५० वर्षांनंतरही या स्मारकाचे योग्यरित्या जतन करत आहे याचं समाधान वाटतं. परंतु राजाराम छत्रपती महाराजांबद्दल तिथे माहितीफलक असणं किंवा त्यांचा जीवनपट मांडणं तसंच छत्रपतींचा आणि स्वराज्याचा लेखाजोखा चित्र व माहिती स्वरुपात मांडणं आवश्यक वाटतं. कारण या साऱ्या गोष्टी तिथे नाहीत अन् जगभरातील पर्यटकांना तिथं आल्यावर काहीच समजत नाही याची खंत वाटते. त्यासाठी कोल्हापूर छत्रपती घराणं, महाराष्ट्र व भारत सरकारने काही ना काही पुढाकार घेऊन योग्य पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं.
या समाधी स्मारकातून प्रेरणा घेऊन कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारक हे इंद्रजीत सावंतांच्या संकल्पनेतून, यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून, स्थानिक प्रशासनाकडून व लोकसहभागातून २०१९ ला उभं करण्यात आलं. तिथे शाहू महाराजांची चार म्युरल्स् आपल्याला पहायला मिळतात व अतिशय सुंदर छत्री देखील केली आहे. परिसर स्वच्छ असून पर्यटकांना फार प्रेरणादायी आहे. फ्लोरेन्स येथील समाधीबद्दल अधिक माहिती इतिहास संशोधक Indrajit Sawant, Malojirao JagdaleChandrakant Patil यांनी दिली.
राजाराम छत्रपती महाराजांचे समाधी स्मारकाजवळ जवळपास ४/५ तास घालवले. ‘I come from the land of Marathas & I am very proud to say that. Even today it feels immensely grateful to visit this monument of Rajaram Chhatrapati, here in Florence, Italy,’ असं म्हणत इतर बरीच माहिती तेथील काही परदेशी पर्यटकांना दिली याचा आनंद व समाधान वाटतं.
या लेखाचा शेवट मला थोडा वेगळा करायचाय… आपण २१ व्या शतकात एका आधुनिक युगात जगत असताना काही भारतीयांना परकीय राजांच्या समाधी किंवा स्मारकं नको आहेत. सतत औरंगजेब अथवा टिपू सुलतान यांच्या समाधीस्थळांवर टिका करायची व त्यानिमित्ताने दंगल घडवून आणायचा प्रयत्न गेल्या काही वर्षात होताना दिसतोय. असंच जर का इटालियन लोकांनी व सरकारने राजाराम छत्रपती महाराजांबद्दल विचार केला तर त्यांचं ही स्मारकाबद्दल वाद निर्माण होऊ शकतो. पण इटालियन लोकं व सरकार तसं करत नाहीत. उलट भारतातील एक मोठा राजा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं व त्यांच्या स्मारकाचं जतन वर्षांनुवर्षे ते करत आहेत. आणि मग कुठलाही महाराष्ट्रीयन किंवा भारतीय जेव्हा फ्लोरेन्सला जाऊन ती समाधी बघतो तर त्याला/तिला गर्व वाटल्याशिवाय राहत नाही. खरं तर भारतीयांनी इतिहासाकडे इतिहास म्हणूनच पाहिलं पाहिजे. भविष्यातले वादविवाद जर टाळायचे असतील तर ही गोष्ट जनमानसात अन् पुढील पिढीत रुजवली पाहिजे असं मला वाटतं.
तर आज फ्लोरेन्स येथे राजाराम छत्रपती महाराजांचे समाधी स्मारक दिमाखात उभं आहे याचा अभिमान वाटतो. जन्मस्थळापेक्षा मला समाधीस्थळं अधिक प्रेरणादायी वाटतात. कारण एखाद्या महान व्यक्तीचा शेवट तिथे झालेला असतो. जन्मापासून मृत्यू पर्यंत त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची शौर्यगाथा त्या समाधीस्थळी जाऊन कळते. आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी इतिहासातून प्रेरणा घेत वर्तमानात जगायचं कसं हे शिकावं आणि मग भविष्याचा वेध घ्यावा. मी एवढंच म्हणेल या समाधी स्मारकाच्या रुपानं राजाराम छत्रपती महाराज सातासमुद्रापार आजही जीवंत असून तिथे गेल्यावर जेव्हा मराठमोळ्या इतिहासाचे स्मरण केले तेव्हा ‘Italy in India & India in Italy’ असंच काहीसं मला वाटलं…!
जय हिंद… जय महाराष्ट्र!
- साकू, २३ सप्टेंबर २०२२, फ्लोरेन्स

पहिल्या महादुर्गा राजमाता जिजाऊसाहेब

 


पहिल्या महादुर्गा राजमाता जिजाऊसाहेब .पहिली माळ माँसाहेबांच्या चरणी अर्पण..
शिवाजीराजांना प्रत्येक वेळी यशच का मिळत गेले ? असा प्रश्न पुष्कळवेळा आपणापुढे उभा राहतो, याचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे उत्तम असे नेतृत्व. खुद्द शिवाजीराजांच्या अंगी धडाडी, सारासार विचार, शौर्य आणि अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे लोकांच्या गुणांची पारख करणे हा होता. शिवाजीराजांनी केवळ या गुणावरच घोडखिंड पावन करणारे शंभूसिंह जाधवराव ,बाजी व फुलाजी बांदल यासारखे शूर योद्धे मिळवले होते. पुरंदरला शीर तुटून खाली पडलेले असतानाही शत्रूची मुंडकी उडविणारे मुरारबाजी लाभले होते. त्याचप्रमाणे अफजलखान भेटीच्या वेळी शिवाजीराजांचे संकट ते आपले संकट म्हणून तेथे जवळच उभे राहणारे जिवाजी ही काही कमी नव्हते.
'आधी लगीन कोंढाण्याचे ' सांगणार्या आणि लगेच स्वराज्यात कोंढाणा किल्ला सामील करून आत्मबलिदान करणारे तानाजी मालुसरे हे देखील कोठेही उणे नव्हते हे त्यांनीच दाखवून दिले होते. चारी पादशाहींनी हाय खाऊन कित्येक वेळा ज्याच्या हातून माती खाल्ली व प्रतिशिवाजी म्हणवून घेतले ते नेताजी पालकर म्हणजे तर साक्षात विजांचा कडकडाट होते. याशिवाय प्रतापराव गुजर,अण्णाजी दत्तो, रघुनाथराव ,मोरोपंत पिंगळे असी अनेक माणसे शिवाजीराजांनी वेचून काढली होती. फक्त निवडली असे नव्हे तर त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांच्यावर कामगिरी शिवाजीराजांनी सोपवली होती.
शतकांच्या मर्यादांना खिंडार पाडून स्वकर्तृत्वाने जिजाऊंनी शिवाजीराजांना घडविले. महाराष्ट्राला मुस्लीम जोखडातून स्वतंत्र करावयाचे विचार त्यांच्यात जागृत केले. जागतिक पातळीवर शौर्याची तुलना व्हावी असा ध्यास या माऊलीने जोपासला व अतुलनीय धैर्याचा परिचय देऊन कार्य सिद्धीला पोहोचविले. अफजलखान नावाचे भयंकर संकट आले तरी जिजाऊमातेने मोलाची सल्लामसलत करून आशीर्वाद दिला .' यश देईल भवानी, तुम्ही कामगिरीला सिध्द व्हा.'
'वाघाएवढे काळीज लागते ,पोटच्या गोळ्याला मृत्यूसमोर उभं करायला पण.
जिजाऊंना ध्यास लागला होता तो स्वराज्य स्थापनेचा.
इ.स.१६६६ ला घात करणारे संकट ओढवले.औरंगजेब बादशहाला आग्र्याला जाऊन भेटायचे होते. पण याहीवेळी मातेने पुत्राला हिंम्मत दिली. युक्तीचा सल्ला दिला व आशीर्वादही दिला. ही कामगिरीही पार पडेल, आई भवानी राहील तुझ्या पाठीशी.
मार्च ते सप्टेंबर असा सहा महिने जिजामातेने चोखपणे राज्याचा कारभार पाहिला .शत्रूच्या हाती एकही किल्ला दिला नाही ; उलट शत्रूच्या ताब्यातील ' रांगणा किल्ला ' स्वराज्यात सामील करायचे राजकारण केले. स्वतंत्र विचारसरणी व कर्तृत्वाची जाण जिजाऊ मातेमध्ये सक्षम होती. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडू शकले. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याच्या कारभारामध्ये अधिकाधिक लक्ष घातले.छ. शिवाजी महाराजांच्या बद्दल जिजाऊंना अत्यंत प्रेम आणि जिव्हाळा वाटत असला तरी त्या कधी पुत्रप्रेमाने आंधळ्या होऊन राजांना कधी कोणत्या सवलती देत नसत. उलट त्यांची करडी नजर सर्वांच्यावर होती.
गुणांची पारख कशी करावी, लोकसंग्रह कसा करावा, केलेला लोकसंग्रह कसा टिकवावा हे जिजाऊंनी शिवाजीराजांना शिकवले होते. शिवाजीराजांनी मुसलमानांचा ही विश्वास संपादन केला होता. राजांच्या सैन्यात कितीतरी पठाण मुसलमान होते. त्यांना नोकरीवर ठेवून योग्य मोबदला दिला होता.
शिवाजीराजे म्हटले की , मोगली आणि आदिलशाही दोन्ही तख्ते रागाने दात-ओठ खात .प्रत्येक जण आपापल्या परीने शिवाजीराजांना पकडून देऊ पाहत होते. पण ते त्यांना जमले नाही . मरणासारखी संकटे समोर उभी होती, तरीदेखील तू शरण जा आणि आपली सुटका करून घे असे जिजाऊ त्यांना कधीच सांगत नसत.
जिजाऊंनी आपले स्वतःचेच मन इतके घट्ट केले होते की कोणत्याही संकटप्रसंगी मोठ्या धीराने त्या मार्गदर्शन करीत.माँसाहेबांमुळेच शिवाजीराजे हे पन्हाळ्यावर स्वराज्याच्या दृष्टीने निर्धास्त होते. कारण राजगडावरून स्वतः जिजाऊ जातीने सर्व पाहत होत्या. कोंढाणा किल्ला घ्यायला लावणाऱ्या जिजाऊ साहेब अत्यंत विचारी व दुरदर्शी होत्या. जिजाऊंचे व्यवहारचातुर्य एवढे आघात होते की केवळ त्यांच्याच प्रेरणेने , शिकवणीमुळे शहाजी राजांच्या गैरहजेरीत देखील प्रत्येक गोष्टी त्यांनी शिवाजीराजांकरवी करून घेतल्या ,यातच त्यांची मुत्सद्देगिरी पारखण्यासारखी होती.
वास्तविक शिवाजीराजांच्या जीवनात शहाजीराजांचा संपर्क किंवा सानिध्य खूपच कमी होते ; परंतु आऊसाहेबांनी आईची जागा भरून काढलीच परंतु त्याशिवाय वडिलांची भूमिका सुद्धा कित्येक वेळा त्यांना करावी लागली. कारण शहाजीराजांच्या आयुष्यातील बहुतेक वेळ स्वारीवर व दगदगीत दक्षिणेकडे गेल्यामुळे प्रत्यक्ष शिवाजीराजांकडे लक्ष देणे त्यांना कधी जमलेच नाही.
शहाजीराजे जरी फार काळ शिवाजीराजांजवळ नव्हते तरी आपल्या पित्या बद्दल त्यांना खूपच आदर होता.कारण जिजाऊंनी आपल्या वडिलांबद्दल कसे वागावे याचे खुप चांगले संस्कार केले होते.
महाभारतामध्ये पांडवांना निरनिराळ्या संकटकाळी भगवान श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले, तर शिवशाहीमध्ये तसेच मार्गदर्शन जिजाऊंनी केले .
स्वराज्यस्थापनेच्या काळी जिजाऊंनी सर्वतोपरी कंबर कसली होती. त्यामुळेच शहाजीराजांच्या मृत्युने सती जाण्यास जेंव्हा जिजाऊ निघाल्या तेव्हा शिवाजीराजे पूर्णपणे हादरून गेले होते. कारण त्यांना माहीत होते की जिजाऊ या स्वराज्याची देवता आहेत. शिवाजीराजांचे जिजाऊंशी वागणे हे अत्यंत आदरणीय व विनम्रतेचे होते. शिवाजीराजे आईसाहेबांच्या इच्छेविरुद्ध काहीही करत नसत. उलट राजे कोणतेही काम करताना आईना विचारून ,त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा करूनच निर्णय घेत. कारण शिवाजीराजांच्या पहिल्या सल्लागार म्हणजे जिजाऊसाहेब होत्या.
शिवाजी राजांच्या गैरहजेरीत जिजाऊ जातीने राज्याचा डोलारा सांभाळीत.शिवाजीराजे स्वारीवर गेले की जनतेचा न्याय निवाडा
जिजाऊच करत असत.
लांबून लांबून लोक जिजाऊंना पाहण्यास, भेटण्यास ,नमस्कार करण्यास येत असत .प्रत्येकाची योग्य ती विचारपूस करून, प्रत्येकाच्या तक्रारीकडे त्या लक्ष देत.
क्षात्रतेजाला अपरिहार्य असणारे युद्धकौशल्य त्यांनी शिवबांना शिकवले होते. लढाईचे प्रकार माहीत करून दिले होते. शत्रूशी दोन हात कधी करावेत व प्रसंग बिकट असेल तर गनिमी कावा वापरून शत्रूला नामोहरम कसे करावे याचे शिक्षण त्यांनी शिवरायांना दिले होते.शक्तीची, बळाची लढाई केव्हा व बुद्धिचातुर्याची लढाई केव्हा करावी, याचे शिक्षणही जिजाऊ यांनी शिवबाला दिले होते. क्षात्रतेजाने इतिहास निर्माण केलेल्या सातवाहन ,राष्ट्रकूट ,चालुक्य, वाकाटक व यादव घराण्यातील श्रेष्ठ आदर्श पुरुषांच्या पराक्रमाच्या व कर्तृत्वाच्या गोष्टी त्यांनी नेहमीच शिवबाला सांगितल्या .या थोर युगपुरुषांप्रमाणेच शिवाजीराजांनी आलौकिक कर्तुत्व करावे ,असे जिजाऊंना मनोमन वाटत होते. शिवाजीराजांना विरक्ती, वैराग्य व त्याग इत्यादींची शिकवण दिली. लोकांच्या सामर्थ्यावर मिळवलेले राज्य लोकांच्या कल्याणासाठीच चालविले पाहिजे,अशी जिजाऊंची धारणा होती. लोकांचे दुःख ओळखून प्रजा व राजा यांच्यात भावनिक ,वैचारिक, प्रेमाचे नाते असेल तर जीव्हाळा टिकून राज्यात सुव्यवस्था नांदते, असे जिजाऊंचे ठाम मत होते. रयतेचे रोजचे प्रश्न, समस्या त्यांच्या कुटुंबाची अवस्था, मुलाबाळांचे प्रश्न यावर राजाचे लक्ष असायला हवे ,असा जिजाऊंचा दंडक होता. शिवाजीराजांच्या लहान वयातच त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकण्यास जिजाऊनी सुरुवात केली होती .त्यांना आपल्या मांडीवर बसवूनच राजकारण ,लोकसंघटन, संरक्षण, प्रशासन ,नीतिमूल्ये आदींचे डोळस ज्ञान दिले. यातूनच खर्या अर्थाने शिवाजीराजांची जडणघडण झाली होती .
जिजाऊ म्हणत, " शिवबा ! तुमचे आजोबा मालोजीराजे ,लखुजीराजे अत्यंत पराक्रमी होते .वडील शहाजीराजे तर आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीवरती दरारा असणारे पराक्रमी सिंहच ! अशा सिंहाचा तुम्ही पुत्र आहात. शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे. दैववाद, कर्मकांड ,अनिष्ट रूढी परंपरा यांच्यामुळेच आदिलशाही, निजामशाही ,मुघलशाहीचे फावले आहे .सैन्यबळ ,दुर्गबळ, द्रव्यबळाचा मुकुटमणी म्हणजे शहाजीमहाराज ! भोसले - जाधव घराण्याचा पराक्रमाचा वारसा तुम्हाला लाभलेला आहे .तुम्हाला रयतेचे स्वराज्य निर्माण करायचे आहे.शिवबा,मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे ऊभी आहे, अशी प्रेरणा जिजाऊंनी शिवरायांना दिली.
इतिहास बदलणे जिजाऊंच्या हाती नव्हते ; परंतु नवा इतिहास घडविणे जिजाऊंना शक्य वाटले. स्वराज्य स्थापनेचे कार्य एकटे शिवबा करू शकणार नाहीत .त्यासाठी त्यांनी शिवबासोबत त्यांच्या इतर सहकारी मावळ्यांना ही घडविले .
जातीधर्माच्या पलीकडे जाऊन रयतेच्या स्वातंत्र्याचा ,सुख - समृद्धीचा आणि भविष्याचा विचार जिजाऊंच्या स्वराज्य कल्पनेत होता. जिजाऊ या शिवाजीराजांची माताच नव्हत्या तर सर्वांची त्या प्रेरक शक्ती होत्या. जिजाऊंनी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व दिल्याने शिवरायांची मजबूत जडणघडण झाली होत गेली.
त्यामुळे जेष्ठ महादुर्गा म्हणून पहिला मान जिजाऊ माँसाहेबांकडे जातो🚩
संकल्पना- राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद
©Suvarna Naik Nimbalkar

मराठेशाहीतील नवदुर्गा

 


मराठेशाहीतील नवदुर्गा 
पोस्तसाम्म्भर :सुवर्णा निबालकर 

नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा आणे स्त्रीशक्तीच्या
गौरवाचा उत्सव. जगातील कोणतीही शक्ती ही नैहमी अृश्य आणि
अव्यक्त असते, परंतु तिचा परिणाम हा दृश्य आणि व्यक्त असतो .नारी
ही एक अशीच महाशक्ती आहे .व्यक्ती म्हणून ती दिसत असते पण
शक्ती म्हणून ती अपरिचित असते.
राजे शहाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा
फुले यांना आपल्या पत्नी मध्धे महाशक्ी दिसून आली, आणि त्या
शक्तीला पूरक वातावरण तयार करून त्या पद्धतीची वागणूक दिली
म्हणून या स्त्रिया ऐतिहासिक महाशक्ती ठरल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सुना महाराणी येसूबाई,
महाराणी ताराबाई यांना राजकारण आणि युद्धकला यांचे धडे
शिकवले. आपल्या सासयाचे हे योगदान या दोधींनीही त्याग आणि
शौर्य या रूपाने प्रकट कर्ून आपण महाशक्ती आहोत हे सिद्ध करून
दाखवले.
मराठेशाहीतील स्त्रियांचा राजकीय व प्रशासकीय सहभाग हा विशिष्ट
परिस्थितीवर अवलंबून होता. पतिनिधनानंतर आणि शासनकर्ता पुत्र
अल्पवरयीन असल्यास त्याच्या नावाने राज्यकारभार पाहणाच्या अनेक
स्त्रिया मराठेशाहीत होऊन गेल्या.
वेगवेगळ्या ्षत्रांत स्वत: चे अढळ स्थान निर्माण करणारी आजची स्त्री
सामाजिक बदलांसाठीही ठामपणे उभी राहते आहे. म्हणूनच राजमाता
जिजाऊमातेचा लोककल्याणकारी वारसा जपणारा जिजाऊंच्या
लेकीचा गौरवशाली पराक्रमी इतिहास आपणास समोर आणत
मराठेशाहीतील नवदुर्गा स्त्रीशक्तीचा जागर राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदच्या
माध्यामातून मराठेशाहीतील गौरवशाली जाज्वल्य इतिहास निर्माण
करणाच्या आपल्या स्त्रीशक्तीच्या जोरावर अवघ्या शत्रूला नेस्तनाबूद
करुन रयतेला आधार दिला.

Sunday, 23 October 2022

#_श्री_क्षेत्र_नारायणपूर

 


















#_श्री_क्षेत्र_नारायणपूर
पोस्तसांभार :प्रसाद पोळ
पुरंदर किल्याच्या पायथ्याला वसलेल्या प्राचीन नारायणपूर गावाचा 'नारायणेश्वर'
महाराष्ट्रामध्ये 'नारायण' या नावाने बरीचशी छोटी छोटी गावे वसलेली आहेत यापैकी काही गावांना बराच जुना इतिहास लाभलेला आहे. अश्याच काही 'नारायण' नावाच्या अक्षराने सुरु होणारे एक नारायणपूर नावाचे प्राचीन गाव हे पुरंदर आणि वज्रगड या ऐतिहासिक किल्यांच्या कुशीमध्ये वसलेले आहे. या नारायणपूर गावाचे मूळ नाव हे 'पूर' असे होते. या 'पूर' गावी प्राचीनतेची साक्ष देणारे एक सुंदर यादवकालीन मंदिर आजही उन पावसाचा मारा झेलत उभे आहे. नारायणपूर या गावाच्या पंचक्रोशी मध्ये उभे असलेले हे मंदिर सासवड पर्यंतच्या परीसरामध्ये 'नारायणेश्वर' या नावाने प्रसिद्ध आहे..
एकेकाळी समृद्ध शिल्पांनी नटलेले हे गाव असणार हे नक्की हे या गावाच्या धाटणी आणि मंदिराच्या प्राचीनतेवरून लगेच लक्षात येते. नारायणपूरच्या या ‘नारायणेश्वर’ मंदिराचे दर्शन घ्यायचे असल्यास स्वतःच्या गाडीने किंवा स्वारगेट एस.टी. स्थानकातून 'नारायणपूर' या एस.टी. ने पोहोचता येते तसेच कापुरव्होळ आणि ऐतिहासिक नगरी सासवड येथून खाजगी जीप देखील आपल्याला मिळू शकतात. पुण्यावरून ऐतिहासिक कात्रज घाटामार्गे कापुरव्होळ येथून सासवड फाट्यावरून डावीकडे वळले कि पहिले दर्शन होते ते अभेद्य पुरंदर किल्याचे. पुरंदर किल्याच्या दिशेने जात असताना इतक्यात झालेले केतकावळे गावाचे बालाजीचे मंदिर देखील तुम्ही बघू शकता. .
आपली गाडी एकदा का सासवड रस्त्यावर लागली कि पुरंदर आणि वज्रगड किल्याच्या परिसरात बरीच छोटी छोटी ऐतिहासिक गावे लपली आहेत त्या प्रत्येक गावाचे महत्व नारायणपूर या गावाएवढेच आहे त्याचे कारण म्हणजे पुरंदर किल्याची जी ऐतिहासिक लढाई झाली होती तेव्हा त्या संपूर्ण परिसरात मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेरखान यांची छावणीच या संपूर्ण प्रदेशात उभारली गेली होती. असे हे संपूर्ण ऐतिहासिक महत्व असलेल्या पुरंदर किल्याच्या परिसरात बरीच आडवाटेवर असलेली ऐतिहासिक ठिकाणे लपलेली आहेत या सर्व गोष्टींचा मागोवा आपल्याला नारायणेश्वरला जाताना नक्की घेता येतो.
कापुरव्होळ वरून मजल दरमजल करीत आणि बलदंड पुरंदर किल्याला चारही बाजूंनी निरखत आपण सरळ येऊन पोहोचतो ते ऐतिहासिक आणि प्राचीन 'पूर' म्हणजेच आत्ताच्या 'नारायणपूर' गावामध्ये. पुरंदर किल्याच्या बरोबर पायथ्याशी 'नारायणपूर' हे गाव वसले आहे. याच 'नारायणपूर' गावातून प्राचीन ‘नारायणेश्वर मंदिराशेजारून’ एक सरळ सोट रस्ता आपल्याला पुरंदर किल्यावर घेऊन जातो. नारायणपुरच्या अत्यंत रम्य असणाऱ्या परिसरात हे सुंदर हेमाडपंथी यादव कालीन मंदिर उभारले गेले आहे. किमान ८०० वर्षे जुने असलेले हे यादवकालीन मंदिर अत्यंत सुरेख आहे. भूमिज स्वरूपातील हे मंदिर कलाकुसरीने भरलेले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण रचना.
नारायणेश्वराच्या प्राचीन मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत मोठा असून आजही थोडे बहुत प्राचीन शिल्प मंदिराच्या आवरात पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या मंदिराच्या आवारामध्ये सिन्नरच्या 'गोंदेश्वर' मंदिराच्या आवारात जसा रांजण बघायला मिळतो तसाच कलाकुसर असलेला रांजण हा येथील मंदिराच्या आवारात असलेल्या एका पारामध्ये पुरून ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्या आवारात आपल्याला काळ्या पाषाणात खोदलेली चपेटदान मारुतीची मूर्ती देखील बघायला मिळते या मूर्तीची उंची जवळपास साडे सहा फुट आहे ती मंदिराच्या आवारात गेल्यावर डाव्या बाजूला बघावयास मिळते
मंदिराच्या आवारात असलेला रांजण.
संपूर्ण मंदिराच्या आवारामध्ये प्राचीन मंदिरांचे अनेक पुरावे बघायला मिळतात. त्यामध्ये पुष्करणी मधील दोन देवकोष्ठातील देव आपल्याला सुस्थितीत पहायला मिळतात. नारायणेश्वर मंदिराच्या परिसरात मंदिराचे जुने यादवकालीन खांब देखिल बघावयास मिळतात. मंदिरासमोर एक सुंदर नंदीची मूर्ती आहे हि मूर्ती थोडीशी भंगलेली असून नंदिवरची कलाकुसर बघण्यासारखी आहे. या मंदिरातील नंदी बाबत एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे या मंदिरात नंदी घडविण्याचा प्रयत्न केला तर मंदिरामधील नंदी भग्न पावतो असे सांगितले जाते. मंदिराच्या दरवाज्यावरची गणेशपट्टी आपले लक्ष वेधून घेते तसेच मंदिराच्या खांबांवर विविध भारवाहक यक्ष देखील बघायला मिळतात. या सुंदर मंदिराच्या आजूबाजूला आणि मंदिराच्या कळसापर्यंत कोरलेली विविध नर्तिकांची शिल्पे तसेच काही अप्सरांची शिल्पे पाहण्यासारखी आहेत. तसेच काही विष्णूच्या मूर्ती देखील मंदिराच्या मागच्या बाजूला कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी तटबंदी उभारली आहे.
मंदिराच्या आवारातील रामेश्वराचे देऊळ.
संपूर्ण मंदिर हे २० खांबांवर उभारले गेले आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला एका खांबावर शिलालेख देखील बघायला मिळतो. तो शिलालेख खांबाच्या बरोबर मध्यभागी कोरलेला आहे. त्यावरील शब्द पुढील प्रमाणे. ‘चांगा वटेश्वराच (T)’. असा बघायला मिळतो तसेच आपल्याला दुसरा शिलालेख रंगमंडपात शिरताच डावीकडील खांबावर बघायला मिळतो. हा शिलालेख आतील खांबाच्या थोडासा खाली असून मंदिरामध्ये पुरेसा प्रकाश नसल्याने बॅटरी घेऊन त्याचे वाचन केले असता तो व्यवस्थित वाचता येतो. या शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे ‘चांगा वटेश्वराचा श्रीधर जोगी’ असा हा शिलालेख असल्याचे आपणास पहावयास मिळते.
भूमिज पद्धतीमध्ये असलेल्या खांबांची रचना.
मंदिरातील खांब हे देखील कलाकुसर केलेले आहेत. तसेच या रेखीव मंदिरात अजून एक शिलालेख लपलेला असून हा शिलालेख दरवाजाच्या चौकटीच्या उजव्या ठिकाणी आहे. या शिलालेखाचा अर्थ ‘अच्यतध्वज’ असा आहे. यातील पहिले दोन शिलालेख हे तेराव्या शतकातील म्हणजे यादव काळातील आहेत तर तिसरा शिलालेख हा थोडा प्राचीन आहे. या वरील सर्व शिलालेखांवरून असे लक्षात येते कि चांगदेव महाराजांचा या परिसरात वास्तव्य होते असा अंदाज आपण लावू शकतो. या मंदिराबाबत काही ऐतिहासिक पुरावे जे मिळतात त्यामध्ये येथे पूर्वी एक विष्णूमंदिर होते जे आता नामशेष झालेले आहे या मंदिरामध्ये विष्णूची भव्य हरिहर रूपातील एक मूर्ती होती जी सध्या मुंबई येथील 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम' म्हणजेच आजचे 'छत्रपती राजा शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय' येथे आहे. याच ऐतिहासिक मंदिराच्या आवारात सुट्या शिळेवर शके १२०७ म्हणजे इ.स. १२८५ या सालामधील रामचंद्र यादवाचा शिलालेख असलेला गद्धेगाळ होता. तो गद्धेगाळ आज पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात जपून ठेवला आहे..
मंदिरातील शिवपिंड अत्यंत सुंदर असून पिंडीच्या मागे आपल्याला गंगेचे शिल्प पहावयास मिळते. तसेच गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला गणपतीची मूर्ती देखील बघायला मिळते. ह्या मंदिराच्या आजूबाजूला पोपटांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. सकाळी लवकर गेल्यास संपूर्ण मंदिराचा परिसर हा पोपटांनी गजबजलेला आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण मंदिर परिसरात पोपटांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे हे पोपट आपले लक्ष नक्कीच वेधून घेतात. सध्या नारायणपूर हे प्रसिद्ध आहे ते एकमुखी दत्तमंदिरासाठी या दत्त मंदिरामुळे 'नारायणपूर' येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु आजही या दत्तमंदिरामुळे होणाऱ्या गर्दी मध्ये भरवस्तीमध्ये असलेले 'नारायणेश्वराचे' हे यादव काळातील अप्रतिम कलाकुसर अंगाखांद्यावर बाळगलेले आणि महाराष्ट्रातील प्राचीन वारसा असलेले हे मंदिर आजही मात्र लोकांच्या दृष्टीने उपेक्षितच आहे.