किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------4
दिंडी दरवाजा:
मोठ्या दरवाज्याच्याच भाग असलेला हा छोटा आणि बुटका दरवाजा. या दरवाज्यातून जाताना थोडे वाकूनच जावे लागते.
चोर दरवाजा:
रायगडाला
असा एक दरवाजा आहे. अमात्यांच्या आज्ञेने तो दगडांनी चिणून ठेवला आहे.
मुख्य दरवाजा शत्रूने फोडलाच तर या चोर दरवाज्यातून दोरावरून सैनिक उतरवून
चोरवाटेने पळून जायची सोय केलेली आहे. वैराटगडावर आणि कोरलईच्या किल्ल्याला
अशा चोरवाटा आहेत.
चाकणच्या
किल्ल्यात एक फसवा दरवाजा आहे. त्या किल्ल्यात पूर्वेकडून दरवाज्याने आत
प्रवेश केला की ती वाट किल्ल्याच्या आतल्या भागात न जाता वेडीवाकडी वळणे
घेत एका आडव्या भितीपाशी संपते, आणि त्या दरवाज्याने आत शिरलेले सैनिक
जंग्यांच्या माऱ्यात सापडतात.
दारूची कोठारे:
दारूची कोठारे किल्ल्याच्या तटाच्या
एका बाजूस असत. कोठाराच्या इमारतीच्या बांधकामात आणि प्रत्यक्ष इमारतीत
लाकडाचा अंशही नसे. दारूच्या कोठारांत बंदुकीच्या दारूने भरलेली मडकी,
बंदुकीच्या गोळ्या, तोफांचे गोळे आणि बाण साठवलेले असत. ही कोठारे गडावरील
वस्तीपासून शक्य तितकी दूर असत.
देवड्या:
देवड्या
म्हणजे बुरुजांवरील किंवा दरवाज्यांच्या दोन्ही बाजूंस असलेली
पहारेकऱ्याची जागा, चौकी. सुवर्णदुर्गाच्या दरवाज्यापाशी अशा देवड्या आहेत.
देवळे, समाध्या, स्मारकशिला आणि कबरी:
प्रत्येक
किल्ल्यावर दोन-तीन तरी देवळे आहेत. काही किल्ल्यांवर स्मारकशिला आणि
काहींवर समाध्या आहेत. रायगड किल्ल्यावर शिवाजीची समाधी आणि वाघ्या
कुत्र्याचे स्मारक आहे. कबरी अनेक किल्ल्यांवर आहेत. रायगडावरील कबरीला
मदरशाची कबर म्हणतात. लोहगडावर दोन थडगी आहेत आणि मुसलमान पिराची एक कबर
आहे.
धान्यकोठ्या:
या दगडामध्ये खोदलेल्या असत किंवा आयत्याच बनलेल्या गुहांमध्ये किल्ल्याचा धान्यसाठी ठेवला जाई.
नगारखाना:
नावाप्रमाणेच या कारखान्यात नगारा, शिंग, ताशे आणि इतर वाद्ये ठेवली जात. राजगडावरील अंबरखाना पद्मावती माचीवर आहे.
पागा (थट्टी):
थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.
पीलखाना:
पीलखाना
म्हणजे हत्ती ठेवायची जागा. महाराष्ट्रातील किल्ल्यांपैकी फक्त रायगड,
पन्हाळगड आणि प्रतापगड या तीनच किल्ल्यांवर पीलखाने असावेत.
पेठा (पेठ-कारखाना):
किल्यासाठी
असलेल्या बाजारपेठा बहुधा किल्ल्याखाली असायच्या. त्याला अपवाद म्हणजे
रायगड किल्ला. या किल्ल्यावर नामांकित बाजार आहे. मध्ये रुंद रस्ता आणि
दोन्ही बाजूंनी दगडी बांधणीची मापीव बावीस बावीस दुकाने. इथे प्रत्येक
दुकानाला माल साठवण्यासाठी मागे दोन दोन खोल्या आहेत आणि खाली तळघर आहे. या
दुकानांतून घोड्यावर बसून, जाता जाता खाली न उतरता माल खरेदी करता येत
असे. अशाच प्रकारच्या पेठा आणि बाजार पुरंदर किल्ल्यावर, पन्हाळ्यावर आणि
मु्रूड जंजिऱ्यावर होते.
प्रवेशद्वार:
हे एकच असेल तर चांगले नाही. याकरिता किल्ल्याला दोन तीन दरवाजे आणि चोरदिंड्या असतात. नेहमीच्या वापरासाठी पाहिजे तितके दरवाजे आणि दिंड्या ठेवून बाकीच्या दगडमातीने चिणून बंद केलेल्या असतात. संकटप्रसंगी ते मार्ग उघडून पळून जाण्याची ही सोय असते.
प्रवेशमार्ग:
किल्ल्यांना
बहुधा अनेक वाटांनी जाता येते. असे असले तरी किल्ल्यावर पोचण्यासाठी
बऱ्याच वाटा असू नयेत, आणि केवळ एकच वाटही असू नये. एका वाटेवर शत्रू आला
असताना दुसऱ्या वाटेने पळून जाता आले पाहिजे. असा किल्ला जास्त सुरक्षित
असतो. देवगिरीच्या किल्ल्याला एकच प्रवेशमार्ग असल्याने अल्लाउद्दीन
खिलजीने आक्रमण केल्यावर रामदेवरायाला शरण जावे लागले.
फरासखाना:
हा कारखाना वस्त्रे ठेवण्यासाठी असे. सतरंज्या, गादी, तक्के, लोड, सिंहासन, पडदे, गालिचे वगैरे ठेवण्याची जागा.
No comments:
Post a Comment