किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?----------------1
महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. त्यांचे मुख्य प्रकार – भुईकोट किल्ला, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग.
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग):
यांमध्ये
चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा
छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि
देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना
किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे
वाडा. हे वाडे तर असंख्य आहेत.
जलदुर्ग:
समुद्राचे
पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे
लागते. काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा
किंवा पाण्यातून वर आलेल्या पायरस्त्यावरून पायी पायी जाता येते. तर काही
किल्ल्यांना तीन बाजूंनी पाणी आणि चौथ्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी सरळ
वाट असे. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा ही जलदुर्गांची उदाहरणे.
समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळून प्रतिकार करण्यासाठी या
किल्ल्यांचा उपयोग होत असे.
ठाणे,
मुंबई, रायगड, रत्नाेगिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत पसररलेल्या
जलदुर्गांची माहिती ’वेध जलदुर्गांचा’ या भगवान चिले यांनी लिहिलेल्या
पुस्तकात आहे. अंजनवेलचा किल्ला,अर्नाळा, तारापूरचा किल्ला, भरतगड, यशवंतगड
हे किल्ले खासगी मालकीचे झाले असून या किल्ल्यांवर घरे उभारून तेथे बागा
लावल्या आहेत.
डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग):
हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या
पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि
प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत. लढाईत पराभव होऊ लागला की
माघार घेऊन एकदा किल्ल्यात शिरले की शत्रूचा पाठलाग आणि ससेमिरा थांबायचा.
महाराष्ट्रातील काही किल्ले फारच लहान आहेत. असे किल्ले म्हणजे निव्वळ
पहाऱ्यासाठी बांधलेल्या चौक्या. काही किल्ले मात्र फारच मोठे आहेत.
No comments:
Post a Comment