Followers

Thursday, 22 February 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १६ नंदुरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातील जहागीरदार बारगळांची गढी --२



दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १६
नंदुरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातील जहागीरदार बारगळांची गढी
तळोदा शहरात श्रीमंत बारगळ जहागीरदारांची वैभावाची साक्ष असून प्राचीन गढ़ी आहे. या गढीचा काही भागाच्या आता पड़झड झाली असली तरी काही बांधकाम अजूनही शाबूत आहे. भोजराज बारगळ यानी 1962 मधे या ऐतिहासिक वास्तुच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे त्यांचे पुत्र नारायणराव बारगळ यांनी गढीच्या कमानी दरवाजा बांधला. सुमारे सहा एकर परिसरात या ऐतिहासिक गढीचे बांधकाम झाले असुन हे बांधकाम पाच वर्ष चालले. बारगळ जहागीरदारांच्या घराण्यातील त्यांचे वंशज सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अमरजीतराव शिवाजीराव बारगळ व त्यांचे इतर आप्तेष्ट आजही या ऐतिहासिक गढीत राहतात. १९५२ पर्यंत तळोदयाचे प्रशासन हे बारगळ जहागीरदार यांच्या नियंत्रणाखाली चालायचे. जहागीरदार व गावाचे कामकाज चालवीण्यासाठी एक दिवाण सहा कारकुन असायचे. त्यापैकी दोन कारकुन हे त्यांच्या खाजगी कारभार पहायचे तर चार कारकुन जहागीरदारीचे कामकाज, हिशेब, वसुलीचे काम पहायचे. शिवाय बाहेरच्या प्रशासकीय कामासाठी दोन पाटील होते. मुलकी पाटिल पोलीस पाटील ही दोन्ही पदे त्या वेळी होती. मुलकी पाटलाचे पाच वतनदार घराणे होते. मगन गनपत पाटील, गोविंद कडवा पाटील याप्रमाणे. प्रत्येक पाटीलला २७ एकर जमीन त्या वेळी उत्पनासाठी मीळायची. शिवाय ज़माबंदी दरबारात मुलकी पाटलाला ६९ रुपये १० आणे फेटा, पागोटे, उपरणे, पान-सुपारीचा मान मीळायचा. पोलीस पाटलाला वर्षाला ५७ रुपये ६ आणे फेटा पागोटे, उपरणे, वेताची काठी हां मान मीळायचा. याशिवाय 16 मील कामदार, वनदार (जागले), चार महार कामदार, एक कोळी कामदार वतनदार होते. या कामदारानाही त्यांचा कामापोटी वतन दिले जायचे. येथील हल्लीचे बारगळ जहागीरदार अमरजीतराव बारगळ यांचे पणजोबा कृष्णराव आनंदराव बारगळ आजोबा शंकरराव कृष्णराव बारगळ यांच्या पीढ़ीपर्यंत दि: १-८-१९५३ पर्यंतताळोद्यात ही प्रशासन यंत्रणा बारगळ जहागीरदारांकडे सुरु होती. त्यानंतर ताळोद्यात शासकीय कारभार इनाम अँबाँक्युशन अँक्ट आला व शासनाकडे कारभार आला त्यानंतर तळोदयात शासकीय कारभार सुरु झाला. सन १८६७ चा गँझेतेड रिपोर्ट व बारगळ जहागीरदार संस्थानचे जुने ऐतिहासिक दस्तावेज व कागदपत्राच्या नोंदीत या प्रशासकीय प्रणालीचा उल्लेख आहे.
सांभार : http://sudhaspari.blogspot.in

No comments:

Post a Comment