पुरंदरचा जोड किल्ला ||
किल्ले वज्रगड||
पुरंदरच्या पूर्वेला लागूनच किल्ल्यापासून एक सुटा डोंगर दिसतो याला वज्रगड किंवा रुद्रमाळ असे म्हणतात. पुरंदरच्या मानाने लहा
न पण महत्त्वाचा असा हा किल्ला आहे.
मिर्झाराजे आणि दिलेरखान पठाण पुण्याहून पुरंदराकडे कूच करून निघाले
15 मार्च 1665. लोणी काळभोर ओलांडून त्यांनी भुलेश्वरच्या डोंगरातून
कऱ्हेपठार गाठले 30 मार्च 1665.म्हणजे एवढासा प्रवास करण्यास मोगली
सैन्याला 15 दिवस लागले. एवढ्यात खान गडबडला काय झाले तरी काय मराठ्यांचा
अकस्मात छापा आला. मोगलांची कापाकाप झाली व मराठे पसारही झाले. परंतु
दिलेरने तरीही पुरंदरचा पायथा गाठला व गडावर सरबत्ती सुरू केली. गडावरून
तोफा आग ओकू लागल्या. पुरंदरचे युद्ध एकाकी सुरू झाले.
महाराज
यावेळी राजगडावर होते. पुरंदरावर व इतर किल्ल्यांवर मोगली फौजा हल्ले करणार
ओळखून महाराजांनी स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवर दारूगोळा, फौजफाटा तयार
ठेवला होता. तसेच किल्लेदार, गडकरी म्हणूनही हिकमतीची माणसे ठेवली
होती.किल्ले पुरंदरवर. असाच एक सरदार नामजाद केला अत्यंत शौर्यशाली जणू
दुधारी तलवारच. तलवार फिरत होती जावळीच्या चंद्रराव मोरे यांकडून.परंतु
महाराजांनी जावळीवर छापा घातला आणि स्वराज्यात दाखल केली. त्यावेळी महाराजच
त्याचे शौर्य पाहून खुश झाले. असा माणूस स्वराज्यात हवाच महाराजांनी
त्यांना स्वराज्यात बोलवले व त्यांनी हो म्हंटले लगेच त्यांना सरदारीचा
शेला पांघरण्यात आला. त्याचे नाव "मुरारबाजी देशपांडे!"
किल्ले
पुरंदर मोगलांनी गराडला होता. संपूर्ण गडाची नाकेबंदी झाली
होती.पन्हाळगडाखाली जशी सिद्दीची छावणी होती तशी पुरंदरखाली होती.जिकडे
पहावे तिकडे तंबू, राहुट्या यांची गर्दी तोफा, हत्ती, उंट, घोडे, पायदळ.
पुरंदर लागून असलेला वज्रगड ह्यांच्या मध्ये असलेल्या खिंडीला भैरवखिंड
म्हणत.ह्या दोन्हीतील अंतर म्हणजे हाकेचे.वज्रगडावरुन पुरंदरावर सहज तोफेचा
मारा करता येवू शकतो हे हेरून दिलेरने आपले जास्त बळ येथे
एकवटले.वज्रगडाचा माथा लहान असल्याने रक्षणासाठी तीनशे शिबंदी
होते.कुबादखान, बादिल बख्तीयार, उदयभान, अतीशखान, मीर अतीज, मिर्झाराजांचा
मुलगा किरतसिंह आणि दिलेरखानाचे दोन पुतणे गैरत आणि मुजफ्फर असे अव्वल
सरदार वज्रगडाशी भांडू लागले.दिलेरखान स्वतः हल्ल्याच्या योजना आखत होता.तर
मिर्झाराजे प्रत्येक मोर्चावर लक्ष ठेवून होते. निकोलाओ मनुची हा तरबेज
गोलंदाज स्वतः तोफखाना चालवीत असे.
ही झाली वज्रगडाची
नाकेबंदी.याशिवाय पुरंदरच्या दक्षिण- पश्चिम दिशा आवळल्या गेल्या.दिलेरला
वाट्टेल ती किंमत मोजून वज्रगड घ्यायचा होता.त्याने एक योजना आखली
वज्रगडाच्या जास्त जवळ व उंच तोफा डागायच्या.
मगत्याने"अब्दुल्ला","फत्तेलष्कर","महेली" ह्या अजस्त्र तोफा वज्रगमगच चा
डोंगर चढू लागल्या.व मार्याच्या टप्प्यात येवून आग ओकू लागल्या.वज्रगडाचा
बुरूज ह्या मार्याने ढासळू लागला. ह्यावेळी पुरंदर सर्व हल्ले मोडून काढत
होता. पण मुरारबाजी मदतीस जावू शकत नव्हते कारण तिकडे मदतीला गेले की मोगल
पुरंदरमध्ये घुसतील.
अखेर वज्रगडाची घटका भरली आणी बुरूज
ढासळला.खिंडारातून मोगल घुसले. तीनशे मराठे दोन दिवसा झुंझवत राहिले.शेवटी
मराठ्यांनी हत्यार टेकले.वज्रगडावर हिरवे निशाण फडकू लागले 14 एप्रिल 1665.
गड आता लष्कराच्या ताब्यात असल्याने पाहता येतच नाही.असा मराठ्यांच्या इतिहासातील महत्वपूर्ण किल्ला दुरून पहावा लागतो.
साभार- महाराष्ट्रातील किल्ले द.ग.देशपांडे