महाराष्ट्राला गडकिल्ल्याचा वारसा इतक्या मोठया प्रमाणात लाभला आहे कि
कित्येक गढीकोटांची नोंद सरकारी दफ्तरात किंवा दुर्गप्रेमींच्या यादीतही
दिसत नाही. कागदोपत्री गढी अथवा कोट अशी कोणतीही नोंद नसलेला
ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात
तोंडापूर येथे असलेल्या या कोटाला भेट देण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे
अजंठा फर्दापूर. फर्दापूरपासुन केवळ १० कि.मी.अंतरावर असलेल्या या कोटाला
औरंगाबाद अजंठा फर्दापूर या भटकंतीत सहजपणे भेट देता येते. तोंडापूर
गावाच्या मध्यभागी एका लहानशा उंचवट्यावर साधारण दीड एकरवर पसरलेल्या या
कोटाची सध्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. आयताकृती आकार असलेला हा कोट
मोठया प्रमाणात पडझड झाल्याने त्याच्या बांधकामाबाबत नेमका अंदाज करता येत
नाही. वाढत्या वस्तीने कोटाचा बहुतांशी भाग गिळंकृत केला असुन अनेक ठिकाणी
कोटाचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. कोटाची संपुर्ण तटबंदी
नष्ट झाली असुन दोन तीन ठिकाणी ती कशीबशी तग धरून उभी आहे. कोटाचे शिल्लक
बांधकाम पहाता कोटाची २० फुट उंच तटबंदी घडीव लांबलचक दगडांनी बांधलेली
असुन बांधकामात चिकणमातीचा वापर केला आहे. कोटाचे दोन बुरुज आजही
ढिगाऱ्याच्या स्वरुपात उभे आहेत. कोटाच्या मध्यभागी असलेल्या वास्तुची भिंत
व दरवाजा आजही शिल्लक असुन या दरवाजाच्या आतील बाजुस देवड्या आहेत. या
वास्तुच्या आत सुंदर शिल्पकृतीने नटलेले मंदीर आहे. कोरीव खांबावर उभे
असलेले हे मंदीर आजही कसेबसे तग धरून उभे आहे. मंदिराच्या दरवाजावर अप्रतिम
शिल्पे कोरलेली आहेत. कोटात पाण्याची कोणतीही सोय दिसुन येत नाही. कोटाची
सध्याची अवस्था बिकट असल्याने संपुर्ण कोट पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी
होतात. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता या कोटाच्या ऱ्हासाला
कारणीभूत होत आहे. याशिवाय तोंडापूर गावात आवर्जुन पहावी अशी सुंदर
पुष्करणी आहे. या पुष्करणीच्या काठावर अनेक मंदीरे असुन त्यातील मुर्ती
मात्र नाहीशा झाल्या आहेत. काही काळाची सोबती असलेल्या ह्या वास्तुंचे
साक्षीदार होण्यासाठी या कोटाला लवकरात लवकर भेट दयायला हवी.
www.durgbharari.com
जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर गावात असलेला भुईकोट त्यापैकी एक. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील उल्लेख वगळता इतर कोठेही या किल्ल्याचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणकाच्या युगात या गढीवजा कोटाची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या कोटाची
www.durgbharari.com
जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर गावात असलेला भुईकोट त्यापैकी एक. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील उल्लेख वगळता इतर कोठेही या किल्ल्याचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणकाच्या युगात या गढीवजा कोटाची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या कोटाची
No comments:
Post a Comment