फलटण शहरात यादव काळात बांधलेले "जरबेश्वर मंदिर" फलटण शहरात आजही राजवाडा आणि श्रीराम मंदिरा यांच्या समोरच रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे हेमांडपंथी शैलीतील तारकाकृती मंदिर आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माहिती फलकानुसार जरबेश्वर हे मूळचे जैन मंदिर आहे. मंदिराच्या बाह्य अंगावर चोवीस जैन तीर्थकरांच्या मूर्ती व गणेश पट्टीतील जैन तीर्थंकर मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. यवनांच्या टोळधाडीत या सुंदर मंदिराचीही तोडफोड आणि नासधूस केली आहे. प्रत्येक सुंदर मुर्तीचे अवयव तोडले गेले आहेत. यवनांच्या तोडफोडी नंतर हे मंदिर ओसाड पडले होते . फलटण चे राजे चौथे मुधोजीराव निंबाळकर १८५३ - १९१६ यांनी रिकाम्या जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आहे असे सांगितले जाते. मंदिरच्या बाह्य अंगावर विविध अप्रतिम शिल्प सौंदर्यने नटलेल्या सुरसुंदरीच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाचे द्वार खूपच सुंदर आणि कलाकुसरयुक्त आहे . मंदिरात उजव्या बाजूला देवकोष्टात विठ्ठल-रुक्मीणीची प्रतिमा स्थापित असून मंदिरात नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्यातील महादेवाची पिंड चौकोनी आकाराची असून खूपच सुंदर आहे.
No comments:
Post a Comment