किल्ले विजयदुर्ग . ( घेरिया ).
पाण्यात
पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली, सामर्थ्यवान, मराठयांच्या आरमारी
सामर्थ्याचा तेजबिंदू, आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक
पराक्रमाची साक्ष देणारा तरीपण फितुरीला
बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला सिंधुदूर्ग जिल्हयाच्या उत्तरेला टोकाला आहे.
सुमारे 40 किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावरच
हा किल्ला उभा आहे. १२ व्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला १७
व्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता.
पूर्वी हा किल्ला चारी बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला होता. म्हणूनच या किल्ल्याला जलदुर्ग म्हणत. किल्ल्याच्या पूर्व बाजूला बराच मोठा खंदक होता. तो पाण्याने भरलेला असायचा. किल्ल्यात जाण्यासाठी खंदकावर लाकडी पूल होता. रात्री तो काढून ठेवला जात असे. अलिकडे तो खंदक बुजवून रस्ता तयार केला आहे. सुमारे 800 वर्षांहून अधिक काळ स्वबळावर अंत्यंत प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभ्या असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे शूर व तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले. विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्राखाली बांधलेली संरक्षक भिंत हे एक आश्चर्य आहे. किल्ल्याजवळ मोठी जहाज (युध्द नौका) आल्यास त्यांचा तळ भिंतीला आपटून त्या नष्ट होत असत. नितांत सुंदर भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला, विविध घटनांचा साक्षिदार असलेला विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या गतवैभवाचे अवशेष अंगा खांद्यावर बाळगत उभा आहे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :- ह्या किल्ल्याचे सौंदर्य पहाणे, त्याचे
ऐतिहासिक महत्व जाणून घेणे अभ्यासकांना, जिज्ञासूंना, संशोधकांना,
पर्यटकांना एक मेजवानीच ठरते. सुमारे 1 किमी. अंतरावरून हा किल्ला पाहून
डोळयाचे पारणे फिटते. विजयदुर्ग गावातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो.
त्याठिकाणी पूर्वीच्या काळी खंदक होता. समुद्राचे पाणी त्यात खेळवलेले
होते. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी या खंदकावर उचलता येणारा लाकडी पूल
होता. आज मात्र भराव घातल्यामुळे आपला थेट जमिनीवरून गडावर प्रवेश होतो.
गडाचा पहिला दरवाजा "हनुमंत दरवाजा" आणि त्याच्या समोर शिवाजी महाराजांनी
स्थापन केलेल्या हनुमंताचे देउळ आणि एक तोफ़ पाहायला मिळते. हे मंदीर शिवाजी
महाराजांनी गड जिंकल्यावर बांधून घेतले. या मंदीरासमोरून पुढे गेल्यावर
जिबीचा दरवाजा लागतो, दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या पडकोटाला
असलेल्या तीन तटबंद्या पाहायला मिळतात. समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी ३०
फ़ूट उंचीची आहे. त्यानंतर दुसरी तटबंदी १० फ़ूट उंचीची आणि मुख्य किल्ल्याची
तिसरी तटबंदी ३० फ़ूट उंच आहे. दुसर्या आणि तिसर्या तटबंदीच्या मधे
असलेल्या फ़रसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य "यशवंत"
महाव्दार लागते. तीन दरवाजे, तिहेरी तटबंदी यांच्या सहाय्याने किल्ला
अभेद्य केलेला आहे. भव्य अशा "यशवंत" प्रवेशद्वाराच्या आत
पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा होता,
त्यास दिंडी दरवाजा म्हणत. रात्रौ मुख्य दरवाजा न उघडता त्याचा
जाण्या-येण्यासाठी उपयोग करीत.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर पोलिस चौकी समोर रचुन ठेवलेले तोफ़गोळे पाहायला मिळतात. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजुने गडफ़ेरी चालू केल्यावर प्रथम आपल्याला खलबतखान्याची इमारत दिसते. तेथुन पुढे सदरेची भव्य इमारत दिसते. सदरेच्या पुढे एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. पुढे बुरुजावरच बांधलेल्या दोन मजली इमारती दिसतात. त्यांना माडी म्हणतात. पुढे राणीवसाची इमारत एका भव्य बुरुजावर बांधलेली पाहायला मिळते. तटबंदीच्या आतल्या बाजूस खाली अनेक उध्वस्त चौथरे पाहायला मिळतात. पुढे तटबंदीवर चढुन चालायला सुरुवात केल्यावर अनुक्रमे गणेश, राम, हणमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात. बुरुज व तटबंदीतील जंग्या, तोफ़ांसाठी ठेवलेले झरोके व बुरुजावर पाण्यासाठी ठेवलेल्या दगडी डोणी पाहाण्या सारख्या आहेत. दर्या बुरुजाला असलेल्या पायर्यांवरुन खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर पाहायला मिळते. त्याच्या पुढे एक चुन्याचा घाणा आहे. चुन्याचा घाणा पाहून परत तटबंदीवर चढल्यावर अनुक्रमे तुटका, शिकरा, सिंदे, शहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनरंजन बुरुज पाहायला मिळतात. मनरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जातांना उजव्या बाजुला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो. समुद्रापासून ३२ मीटर उंच असलेल्या या बुरुजाला "खुबलढा किंवा बारातोपा बुरुज" या नावाने ओळखतात. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे. त्यात काही तोफ़गोळे ठेवलेले आहेत. खुबलढा बुरुज पाहुन पुन्हा तटबंदीवर येउन पुढे गेल्यावर घनची, पान बुरुज पाहायला मिळतात. पुढे एक वास्तू पाहायला मिळते. त्यावर दारुकोठार अस नाव लिहिलेल आहे. परंतू तटबंदीला लागुनच दारुकोठार असण्याची शक्यता कमी आहे.
दारूकोठार पाहून झाल्यावर तटबंदीवरुन उतरून किल्ल्याच्या आत असलेल्या टेकडी भोवती बांधलेल्या तटबंदीच्या आत प्रवेश करुन चोर दरवाजाच्या दिशेने चालत गेल्यावर एक विहिर पाहायला मिळते. ती पाहून आखलेल्या मार्गावरून चालायला सुरुवात केल्यावर भग्न भवानी मंदिर पाहायला मिळते. त्यापुढे उध्वस्त वास्तुंचे काही चौथरे पाहायला मिळतात. पुढे उजव्या बाजूस काही सिमेंटचे ओटे पाहायला मिळतात. त्याला "साहेबांचे ओटे" म्हणतात. इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला.पायवाटेच्या डाव्या बाजूस एक लहान व एक प्रचंड मोठा हौद पाहायला मिळतो. मोठ्या हौदात उतरण्यासाठी पायर्या आहेत. दोनही हौद कोरडे आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी हे हौद बांधण्यात आले होते. साठलेले पाणी जमिनीत मुरु नये म्हणुन हौद बांधताना शिश्याचा वापर केला होता. हौदाच्या पुढे असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर धान्य कोठार होते. इमारत पाहुन पुढे गेल्यावर जखिणीचे मंदिर व त्यासमोर ठेवलेली जखिणीची तोफ़ पाहायला मिळते. ती पाहुन पायवाटेने तोफ़गोळे ठेवलेल्या पोलिस चौकीकडे येताना वाटेत घोड्याच्या पागा, हौद, एक विहिर आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळते. इथेच तटबंदी जवळ खाली उतरणार्या पायर्या दिसतात. इथे एक भूयार असून ते आनंदराव धुळपांच्या वाड्यात उघडते अशी वदंता आहे. किल्ल्याच्या गोमुखी दरवाजा जवळ आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडफ़ेरी पूर्ण करण्यासाठी २ तास लागतात.
विजयदुर्ग पासून ७ किमी अंतरावर गिर्ये गाव आहे. या गावात १) बस स्थानका मागे आनंदराव धुळपांचा वाडा आहे. या वाड्यात माडीवरच्या दिवाणखाण्यात भिंतीवर बरीच जुनी रंगीत चित्रे आहेत. दीड-दोन शतके उलटून गेली असली तरी त्यांचे रंग अद्यापही चांगल्या स्थितीत आहेत.
२) कान्होजी आंग्रेंच्या काळात विजयदुर्ग पासून ३ किमीवर
वाघोटन खाडीत दगड फ़ोडून आरमारी गोदी (Dry Dock) बांधण्यात आली होती. या ठिकाणी जहाज बांधणी आणि दुरुस्तीची कामे केली जात.
३) विजयदुर्ग पासून ३ किमीवर रामेश्वर मंदिर आहे. त्याच्या जवळ संभाजी आंग्रे यांची समाधी आहे.
इतिहास -: कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर 16 किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली त्यात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे इ.स. ११९३ ते इ.स.१२०६ या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला.
इ.स. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकेपर्यंत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. 1218 मध्ये बुडविले. इ.स. 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला. पुढे इ.स. 1431 मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. 1490 ते 1526 या काळात बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकणप्रांत सोपविला गेला. त्यानंतर 1653 पर्यंत सुमारे 129 वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६५३ साली विजयदुर्ग विजापूरच्या आदिलशाहीकडून जिंकून घेतला, तेव्हापासून विजयदुर्ग किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त झाले. स्वत: शिवाजी महाराजांनी निशाण टेकडीवर भगवा ध्वज फडकाविला. महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यावेळी त्याची व्याप्ती फारशी नव्हती, तेव्हा साधारण 5 एकर क्षेत्रात हा किल्ला विखुरलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती व व्याप्ती केली. 14 एकर 5 गुंठे इतक्या क्षेत्रापर्यंत या किल्ल्याची व्याप्ती वाढविली. पूर्वेच्या बाजूला नवीन तटबंदी उभारली.
सुरवातीला विजयदुर्ग घेरिया या नावाने ओळखला जात असे, विजयदुर्ग जवळ असणार्या गिर्ये या गावावरून घेरिया हे नाव पडले होते. पण महाराजांनी किल्ल्याची दुरुस्ती केली तेव्हा "विजय संवत्सर" चालू होते, म्हणून त्याचे नाव विजयदुर्ग ठेवण्यात आले.
इ.स. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग येथे मराठी आरमाराची स्थापना केली,.पुढे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात विजयदुर्गला आरमारात महत्वाचे स्थान प्राप्त झाले. १६९८ साली छत्रपती राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना 'सरखेल' हा किताब बहाल केला. कान्होजीनी विजयदुर्गाच्या सहाय्याने समुद्रावर असा काही दरारा बसविला की बलाढ्य इंग्रजांच्या आरमारासही कित्येक वेळा पराभूत होवून माघार घ्यावी लागली. विजयदुर्ग किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इंग्रज्,डच्,पोर्तुगीज यांनी सातत्याने किल्ल्यावर स्वार्या केल्या पण त्यांना प्रत्येक वेळी हारच पत्करावी लागली.
कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत तंटे सुरू झाले. मुलगा तुळाजी आंग्रे पेशव्यांना जुमानीसा झाला. तेव्हा त्याचा उच्छेद करावा हा हेतू मनात धरून पेशवे व इंग्रज एक झाले. इ.स. १७१७ मध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे "ससेक्स" जहाज पकडून विजयदुर्ग बंदरात ठेवले. कान्होजींच्या समुद्रावरील वाढत्या प्रभावाने इंग्रजांचे धाबे दणाणले होते. इंग्रजांनी इ.स. १७१८ मध्ये प्रचंड आरमारानीशी विजयदुर्गावर हल्ला चढवला, पण किल्ल्यावरून तुळाजीचा भरवशाचा सरदार रुद्राजी धुळपने तो हल्ला परतवून लावला. प्रचंड दारूगोळा आणि २०० सैनिकांचे प्राण गमवून इंग्रजांचे आरमार मुंबईला परत गेले.
इ.स.१७२० मधे इंग्रज कॅप्टन ब्राऊनने अनेक लढाऊ जहाज घेऊन विजयदुर्गावर हल्ला केला. त्यांच्या ताफ़्यात "फ़्राम" नावाची प्रचंड युध्दनौका होती. तरीही इंग्रजांना हार पत्करावी लागली. मराठ्यांनी इंग्रजांचा पाठलाग चालू केल्यावर त्यांच्या हाती "फ़्राम" लागू नये म्हणून इंग्रजांनी ती युध्दनौका जाळुन बुडवली.
तुळाजीने १७५४ मध्ये त्यांची अनेक जहाजे पकडली, काही जाळली. तुळाजीने आपल्या आरमारात अनेक नवीन जहाजे बांधविली व त्यांवर पगारी यूरोपीय कामगार नेमले. यामुळे पश्चिम किनाऱ्यावर तो जणू अनभिशिक्त राजात समजला जाऊ लागला. आंग्रे यांच्याशी मराठ्यांचे संबंध बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवेच्या कारकीर्दीत बिनसले. हे तंटे कमी करण्याऐवजी पेशव्याने ते वाढविले, असा शाहूंचा स्पष्ट आरोप होता. पेशव्यांचे इंग्रज आणि पोर्तुगीज या पाश्चिमात्य सत्तांशी मैत्रीचे संबंध होते. इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला. त्याचा फायदा घेऊन आंग्रे बंधूचा मिळेल तितका प्रदेश जिंकण्याचा सपाटा पेशव्यांनी लावला. तुळजीची भीती प्रामुख्याने पाश्चिमात्यांना होती; तथापि नानासाहेबाने स्वार्थी हेतूने आंग्र्यांच्या आरमाराचा नाश केला आणि पुढे पश्चिम किनाऱ्यावर त्यामुळे इंग्रज बलवत्तर झाले. तुळाजी आंग्रे विरूद्घच्या युद्धात कोणत्याही आंग्रे बंधूंनी युतीच्या बाजूने भाग घेतला नाही. परिणांतः विजयदुर्गाबरोबरच मानाजी आंग्र्यांच्या आरमाराचा नाश केला आणि पुढे पश्चिम किनाऱ्यावर त्यामुळे इंग्रज बलवत्तर झाले. तुळाजी आंग्रे विरुद्धच्या युद्धात कोणत्याही आंग्रे बंधूंनी युतीच्या बाजूने भाग घेतला नाही. परिणामतः विजयदुर्गाबरोबरच मानाजी आंग्रेचा पनवेलजवळचा बिकटगड आणि इतर प्रदेशही नानासाहेब पेशवेने जिंकून घेतले. तुळाजीने घाबरून नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून उभय पक्षांचा घरोबा पूर्वीपासून चालत आहे, त्याची अभिवृद्धी व्हावी असे कळविले; तथापि पेशव्याने २६ मार्च १७५५ रोजी तुळाजीविरोधी संयुक्त मोहिमेस प्रारंभ केला. अखेर तुळाजीचा पराभव होऊन विजयदुर्ग इंग्रजांच्या हाती पडला (१३ फेब्रुवारी १७५६). इंग्रजांनी किल्लावरील अमाप संपत्ती लुटली. तुळाजी पुढे पेशव्याच्या कैदेतच १७८६ मध्ये मरण पावला. बाणकोटच्या बदल्यात इंग्रजांनी विजयदुर्ग पेशव्यास दिला. आंग्र्यांच्या अस्तानंतर विजयदुर्गचा प्रांत व आरमाराची सुभेदारी पेशव्यांनी आनंदराव धुळप यास दिली. मराठ्यांचे आरमार कमकुवत होण्यास येथूनच प्रांरंभ झाला. पुढे माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांचे कोकणपट्टीवरील विजयदुर्ग, रत्नागिरी वगैरे स्थळे घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा १७७३ च्या जानेवारीत त्र्यंबक विनायक व कृष्णाजी धुळप यांनी पोर्तुगीजांना विजयदुर्गातून हुसकावून लावले. पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) विजयदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर इंग्रजांनी तो जिंकून घेतला. ........
माहिती संदर्भ : ट्रेक क्षितीज संस्था..
छायाचित्र साभार : Devendra's Photography व अन्य
संकलन - Dipesh Ghadigaonkar

No comments:
Post a Comment