बहादुरगड हे या किल्ल्याचे प्रचलित नाव असले तरी ते अधिकृत नव्हते. किल्ल्याचे कागदोपत्री नाव पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला आहे. गॅझेट मध्येही अशीच नोंद आहे. २५ मे २००८ ला या गडाचे धर्मवीर गड असे नामांतर केले आहे.
पेडगावचा किल्ला धर्मवीरगड म्हणून प्रसिद्ध आहे. धर्मवीरगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यांमध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदा तालुका आहे. या तालुक्याच्या दक्षिण सीमेवर भीमा नदी वहाते. या भीमा नदीच्या उत्तरतिरावर पेडगावचा हा भुईकोट किल्ला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरून काढायला बहादुरखानाने आपण होऊन शिवाजीराजांना संधी दिली. बहादुरखानाने गडामधे एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरवी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते. महाराजांच्या हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला होता. महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर नऊ हजाराचे सैन्य बहादुरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले. या सरदाराने आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने गडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादुरखान लढाईसाठी तयारी करून मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. त्यावेळी मराठ्यांच्या तुकडीने माघार घेऊन पळायला सुरुवात केली. त्यामुळे बहादुरखानाला चेव चढला. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी बहादुरखानाला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादुरगडावर हल्ला चढवला. गडामध्ये तुरळक सैन्य, नोकरचाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठ्यांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कूच केले. बहादुरखान पाठलागावरून परत आला, तेव्हा त्याला मराठ्यांनी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली. तेव्हा त्याला मराठ्यांच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी आपली इभ्रत वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले होते.
छत्रपती संभाजी राजांना अटक - छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. याचं किल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान
पेडगावला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत. त्याआधी हे समजून घ्या की, पेडगाव दोन आहेत. पहीले थोरले पेेडगाव व दुसरे धाकटे पेडगाव. धाकटे पेडगाव हे दौंड तालुक्यात, पुुणे जिल्ह्यात आहे
दौंड हे पुणे जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव असून रेल्वे आणि गाडी रस्त्याने जोडले गेले आहे. दौंडकडून गाडीरस्त्याने देऊळगावपर्यंत येऊन वडगाव दरेकर मार्गे पेडगाव गाठावे लागते (११० कि. मी.) दौंड पासून पेेेडगाव २० कि. मी. आहे .
दुसरा मार्ग म्हणजे अहमदनगरकडून अथवा पुण्यातून श्रीगोंद्याला व तेथून पेडगावला जाता येते.
No comments:
Post a Comment