भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))🚩🚩
🚩🚩किल्ल्याची ऊंची:-२९८२.
किल्ल्याचा प्रकार:-गिरीदुर्ग
डोंगररांग:-डोंगररांग नाही
जिल्हा:-सांगली
श्रेणी:-मध्यम
भूपाळगड हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेला किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याच्या बाणूर गावामुळे या किल्ल्याला "बाणूरचा किल्ला" म्हणूनही ओळखले जाते. किल्ल्याचा घेर खूप मोठा आहे. पूर्व आणि उत्तरेकडे साधारण ७०० फूट उंच कडे आहेत. पण पश्चिमेकडून किल्ला फार उंच नाही. बाणूर गाव किल्ल्याच्या याच बाजूला आहे. सध्या किल्ल्यातच गाव वसलेल आहे. किल्ल्याची तटबंदी फोडून रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्याने गाडी घेऊन थेट किल्ल्यावर जाता येते.
पळशीचे सिध्देश्वर मंदिर, शुकाचार्य मंदिर, कोळदुर्ग आणि बाणूरगड ही ठिकाणे खाजगी वहान असल्यास एका दिवसात पाहाता येतात. कोळदुर्गची माहिती साईटवर दिलेली आहे.
इतिहास:-
भूपाळगड हा किल्ला स्वराज्याच्या सीमेवर होता. या किल्ल्यावर फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होते असा उल्लेख आहे. १६७९ मध्ये संभाजी राजे मुघलांना जाऊन मिळाले. दिलेरखानाने त्यांना फौज देऊन भूपाळगड किल्ला घेण्यास सांगितले. संभाजी राजे गडावर चालून आलेले पाहून किल्लेदार फिरंगोजीने प्रतिकार केला नाही. तो गड सोडून पन्हाळगडावर शिवाजी महाराजांकडे गेला. किल्ला घेतल्यावर मुघलांनी किल्ल्यातील मावळ्यांचे हात पाय तोडले.
पहाण्याची ठिकाणे:-
बाणूर गावातून किल्ल्यावर प्रवेश करताना किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. किल्यावर वस्ती आहे. या वस्तीतून डावीकडे एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने पुढे गेल्यावर गावाची वस्ती संपते . पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पठार आहे . समोर एक छोटी टेकडी आपले लक्ष वेधून घेते. या टेकडीवर महादेवाचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेर सिमेंटमध्ये बांधलेली एक कमान आहे ती दुरवरुनच दृष्टीस पडते. या कमानी पर्यंत पोहोचायला १५ मिनिटे लागतात. या टेकडीच्या पायथ्याशी रस्ताच्या उजव्या बाजूला कातळात खोदलेला तकाव आहे. तलाव पाहून पायर्यांच्या मार्गाने कमानीतून टेकडीवर आपला प्रवेश होतो. टेकडीवर शंकराचे पुरातन मंदिर आहे. मंदिराला एकेकाळी तटबंदी असावी. आता फ़क्त तटबंदीतील दरवाजा भक्कमपणे उभा आहे. या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच एक तुळाशी वृंदावन आहे. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची ही समाधी आहे. या टेकडीजवळच एक पाण्याचे छोटे कोरडे टाके आहे. गडाच्या तटबंदीत २ ते ३ दिंडी दरवाजे (चोर दरवाजे) आहेत. किल्ल्यावर सर्वत्र तुटलेल्या रचीव तटबंदीचे अवशेष दृष्टीस पडतात. किल्ल्यावरुन कोळदुर्ग दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा:-
भूपाळगडावर जाण्यासाठी प्रथम कराड गाठावे. कराड - पंढरपूर रस्त्याने (४२ किमी वरील) विटा गाव गाठावे विटा गावातून थेट बाणूर गडावर जाण्यासाठी एसटी बसेस आहेत. खाजगी वहान असल्यास विटा गावाच्या पुढे २२ किमीवरील खानापूर हे तालुक्याचे गाव गाठावे. खानापूर वरून पळशी आणि बाणूरगडाचा फ़ाटा १२ किमीवर आहे. फाट्यापासून बाणूरगड १० किमी अंतरावर आहे. बाणूर गाव हे किल्ल्यातच आहे. बाणूरगडावरील टेकडीवर असलेल्या महादेव मंदिरापर्यंत गाडीने जाता येते. बाणूरगडावर जाण्यासाठी दिवसातून एकदा थेट तासगावहून एसटी आहे.(खाली दिलेले एसटीचे वेळापत्रक पाहा)
राहाण्याची सोय:-
किल्ल्यावरील महादेव मंदिराच्या आवारात राहाता येईल.
जेवणाची सोय:-
जेवणाची सोय आपण स्वत : करावी.
पाण्याची सोय:-
गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी उत्तम
कालावधी:-
वर्षभर🚩🚩

No comments:
Post a Comment