Followers

Thursday, 28 March 2019

किल्ला सातवा : केळवे भुईकोट


ओळख उत्तर कोकणातील गडकोटांची

किल्ला सातवा : केळवे भुईकोट

उत्तर कोकणातील छोटेखानी दुर्गकोटांच्या मालिकेत स्वतःच्या वैशिट्यपूर्ण आकारामुळे महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेला केळवे भुईकोट.... See more

किल्ला सहावा : बल्लाळगड


ओळख उत्तर कोकणातील गडकोटांची

किल्ला सहावा : बल्लाळगड

महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील छोटेखानी परंतु संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा बल्लाळगड.... See mo
re

किल्ला पाचवा : गंभीरगड

ओळख उत्तर कोकणातील गडकोटांची

किल्ला पाचवा : गंभीरगड

उत्तर कोकणातील शिवकाळाचे साक्षीदार असणाऱ्या किल्ल्यांपैकी एक.शिवरायांच्या सुरतेच्या लुटीसंदर्भातील गुपित उराशी बाळगणारा गंभीरगड.

किल्ले वसई मोहीम परिवार


किल्ला चौथा : दहाणूचा किल्ला

ओळख उत्तर कोकणातील गडकोटांची

किल्ला चौथा : दहाणूचा किल्ला

दिव दमण प्रांतातील समुद्री दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी असणाऱ्या किल्ल्यांपैकी एक दहाणूचा किल्ला.

किल्ले वसई मोहीम परिवार


किल्ला तिसरा: जंजिरे तारापूर

ओळख उत्तर कोकणातील गडकोटांची

किल्ला तिसरा: जंजिरे तारापूर

उत्तर कोकणातील मात्तबर किल्ल्यांपैकी एक. पण सध्या त्याच्या इतिहासापेक्षा श्रीमंताचा वाडा या रिसॉर्ट साठी ओळखला जाणारा किल्ला.

किल्ले वसई मोहीम परिवार


Saturday, 23 March 2019

किल्ला पहिला: अशेरीगड

ओळख उत्तर कोकणातील गडकोटांची

किल्ला पहिला: अशेरीगड

अनेक गडांची सध्याची अवस्था पाहिल्यावर इथे कधीकाळी गड होता का असा प्रश्न पडतो पण काही गड मात्र त्या वेळी मजबूत होत्व आणि त्यामुळे पाच सहा शतकांपूर्वी तिथे काय होते, याचा अंदाज आपण बांधू शकतो. पालघर जिल्ह्यातील अशेरीगड हा त्यातलाच एक.
अशेरीगडाची निर्मिती राजा भोजच्या कारकिर्दीत करण्यात आली. महिकावतीच्या बिंब राजाची सत्ता या गडावर असताना गडाचा चोख बंदोबस्त करण्यात आला.इ.स.१५५६ च्या सुमारास पोर्तुगीजांनी गडावर ताबा मिळवला.पोर्तुगीजांनी गडावर एक छोटेखानी गावच वसवण्याचा प्रयत्न केला.पोर्तुगीजांच्या कुटुंब कबिल्यासह मुले, सैनिक, कैदी अशा एकूण ८०० लोकांचा गडावर वावर होता. इ.स.१६८३ मध्ये संभाजी महाराजांनी गड स्वराज्यात आणला.पण लवकरच पोर्तुगीजांनी गड परत जिंकून घेतला. नरवीर चिमाजी अप्पांनी वसई मोहिमेत फेब्रुवारी १७३९ मध्ये अशेरीगड जिंकून घेतला.
पालघर स्थानकातून मनोरपुढे लागणारे मस्तान नाका याठिकाणी पोहोचावे.मस्तान नाक्यातून मिळेल त्या वाहनाने खोडकोना गावाच्या फाट्यापर्यंत पोहोचावे.खोडकोना गावात आदिवासी वस्ती आहे.अशेरीगड हा डोंगरी किल्ला असून गडावर पोहोचण्यासाठी साधारणपणे दीड तासाची चढाई करावी लागते.तासाभराच्या चढाईनंतर खिंडीच्या माथ्यावर असलेल्या सपाटीच्या पुढील पायवाटेवर उजव्या बाजूस आदिवासींच्या वाघदेवतेची मूर्ती पाहण्यास मिळते.
अशेरीगडाच्या मुख्य वास्तुघटकांना पोर्तुगीजांचे राजचिन्ह, खोदीव पायरीमार्ग, कोरीव गुंफा, पाण्याच्या १४ कोरीव टाक्या, गडावर विविध कालखंडातील प्रवेशद्वार, संरक्षण व्यवस्थेबद्दल योजना, शिबंदीची घरे, मंदिराचे अवशेष, सदर, प्रार्थनास्थळे इत्यादींचा समावेश होतो.संपूर्ण गडाची गडफेरी पूर्ण करण्यास ३ तास पुरेसे आहेत.गडावरील बऱ्याच अवशेषांची अवस्था विखुरलेल्या आणि उध्वस्त स्वरूपात असल्याने शोधमोहीम करावी लागते.डोंगरउतारावरील बऱ्याच प्राचीन खोदीव टाक्या मातीच्या गाळाने बंदिस्त झाल्या आहेत. अशेरीगडाचा पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात तयार केलेला नकाशा वास्तुघटकांची संख्या दर्शवणारा आहे. या नकाशात गडाच्या सपाटीवर असणारा टेहळणीचा मनोरा व मध्यावर असणारी गुंफा प्रवेशद्वारे दिसतात. आजही अभ्यासकांना गडावरील विविध राजवटींनी केलेली बांधकामे अभ्यासण्याची संधी आहे.
गेल्या काही वर्षात दीपस्तंभ प्रतिष्ठान वसई आणि किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे गडाची संवर्धन आणि इतिहास सफर मोहीम आयोजित करण्यात येते.गडावरील बहुतेक वास्तुघटक कातळात खोदुन काढल्याने अशेरीगड प्रत्येक क्षणी मजबुतीची साक्ष देतो.दुर्गसंवर्धनाची जाणीव मनात जपत अशेरीगडाचा मूक इतिहास जपण्यास दुर्गयात्रीची पावले अशेरीगडकडे कूच करायला हवीत.

किल्ले वसई मोहीम परिवार.

Tuesday, 19 March 2019

पुरंदरचा जोड किल्ला ||किल्ले वज्रगड||

पुरंदरचा जोड किल्ला ||

किल्ले वज्रगड||
पुरंदरच्या पूर्वेला लागूनच किल्ल्यापासून एक सुटा डोंगर दिसतो याला वज्रगड किंवा रुद्रमाळ असे म्हणतात. पुरंदरच्या मानाने लहान पण महत्त्वाचा असा हा किल्ला आहे.
मिर्झाराजे आणि दिलेरखान पठाण पुण्याहून पुरंदराकडे कूच करून निघाले 15 मार्च 1665. लोणी काळभोर ओलांडून त्यांनी भुलेश्वरच्या डोंगरातून कऱ्हेपठार गाठले 30 मार्च 1665.म्हणजे एवढासा प्रवास करण्यास मोगली सैन्याला 15 दिवस लागले. एवढ्यात खान गडबडला काय झाले तरी काय मराठ्यांचा अकस्मात छापा आला. मोगलांची कापाकाप झाली व मराठे पसारही झाले. परंतु दिलेरने तरीही पुरंदरचा पायथा गाठला व गडावर सरबत्ती सुरू केली. गडावरून तोफा आग ओकू लागल्या. पुरंदरचे युद्ध एकाकी सुरू झाले.
महाराज यावेळी राजगडावर होते. पुरंदरावर व इतर किल्ल्यांवर मोगली फौजा हल्ले करणार ओळखून महाराजांनी स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवर दारूगोळा, फौजफाटा तयार ठेवला होता. तसेच किल्लेदार, गडकरी म्हणूनही हिकमतीची माणसे ठेवली होती.किल्ले पुरंदरवर. असाच एक सरदार नामजाद केला अत्यंत शौर्यशाली जणू दुधारी तलवारच. तलवार फिरत होती जावळीच्या चंद्रराव मोरे यांकडून.परंतु महाराजांनी जावळीवर छापा घातला आणि स्वराज्यात दाखल केली. त्यावेळी महाराजच त्याचे शौर्य पाहून खुश झाले. असा माणूस स्वराज्यात हवाच महाराजांनी त्यांना स्वराज्यात बोलवले व त्यांनी हो म्हंटले लगेच त्यांना सरदारीचा शेला पांघरण्यात आला. त्याचे नाव "मुरारबाजी देशपांडे!"
किल्ले पुरंदर मोगलांनी गराडला होता. संपूर्ण गडाची नाकेबंदी झाली होती.पन्हाळगडाखाली जशी सिद्दीची छावणी होती तशी पुरंदरखाली होती.जिकडे पहावे तिकडे तंबू, राहुट्या यांची गर्दी तोफा, हत्ती, उंट, घोडे, पायदळ. पुरंदर लागून असलेला वज्रगड ह्यांच्या मध्ये असलेल्या खिंडीला भैरवखिंड म्हणत.ह्या दोन्हीतील अंतर म्हणजे हाकेचे.वज्रगडावरुन पुरंदरावर सहज तोफेचा मारा करता येवू शकतो हे हेरून दिलेरने आपले जास्त बळ येथे एकवटले.वज्रगडाचा माथा लहान असल्याने रक्षणासाठी तीनशे शिबंदी होते.कुबादखान, बादिल बख्तीयार, उदयभान, अतीशखान, मीर अतीज, मिर्झाराजांचा मुलगा किरतसिंह आणि दिलेरखानाचे दोन पुतणे गैरत आणि मुजफ्फर असे अव्वल सरदार वज्रगडाशी भांडू लागले.दिलेरखान स्वतः हल्ल्याच्या योजना आखत होता.तर मिर्झाराजे प्रत्येक मोर्चावर लक्ष ठेवून होते. निकोलाओ मनुची हा तरबेज गोलंदाज स्वतः तोफखाना चालवीत असे.
ही झाली वज्रगडाची नाकेबंदी.याशिवाय पुरंदरच्या दक्षिण- पश्चिम दिशा आवळल्या गेल्या.दिलेरला वाट्टेल ती किंमत मोजून वज्रगड घ्यायचा होता.त्याने एक योजना आखली वज्रगडाच्या जास्त जवळ व उंच तोफा डागायच्या. मगत्याने"अब्दुल्ला","फत्तेलष्कर","महेली" ह्या अजस्त्र तोफा वज्रगमगच चा डोंगर चढू लागल्या.व मार्याच्या टप्प्यात येवून आग ओकू लागल्या.वज्रगडाचा बुरूज ह्या मार्याने ढासळू लागला. ह्यावेळी पुरंदर सर्व हल्ले मोडून काढत होता. पण मुरारबाजी मदतीस जावू शकत नव्हते कारण तिकडे मदतीला गेले की मोगल पुरंदरमध्ये घुसतील.
अखेर वज्रगडाची घटका भरली आणी बुरूज ढासळला.खिंडारातून मोगल घुसले. तीनशे मराठे दोन दिवसा झुंझवत राहिले.शेवटी मराठ्यांनी हत्यार टेकले.वज्रगडावर हिरवे निशाण फडकू लागले 14 एप्रिल 1665.
गड आता लष्कराच्या ताब्यात असल्याने पाहता येतच नाही.असा मराठ्यांच्या इतिहासातील महत्वपूर्ण किल्ला दुरून पहावा लागतो.
साभार- महाराष्ट्रातील किल्ले द.ग.देशपांडे