Followers

Monday, 5 November 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ४० किल्ले आसावा

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ४०
अ आ मुळाक्षरानुसार असलेले महाराष्ट्रातील किल्ले





किल्ले आसावा :
किल्ल्याची ऊंची : 2400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर
जिल्हा : पालघर श्रेणी : मध्यम
ठाणे जिल्ह्यातील बोईसर हे महत्वाचे शहर आहे. प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्‍या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. ठाण्यातील पूरातन किल्ला चढण्यास सोपा असून गर्द रानातून जाणार्‍या रस्त्यामुळे हा एक दिवसाचा ट्रेक अल्हाददायक होतो.
* पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या तटबंदी वरून आपला गडावर प्रवेश होतो. गडाची तटबंदी दगड एकमेकांवर रचून बनवलेली आहे. गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली २ टाकी आहेत. त्यापैकी मोठ्या टाक्यातील पाणी पिण्या योग्य आहे. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत. कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही.
हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशव्दाराची जागा दिसते. प्रवेशव्दार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्‍याही पहायला मिळतात.
प्रवेशव्दार पाहून किल्ल्यात शिरल्यावर समोरच एक भिंत दिसते, ती एका बांधीव टाक्याचीच भिंत आहे. हे टाकं लहान असून त्याची रचना मोठया टाक्याप्रमाणेच एका बाजूला कातळ व तीन बाजूंनी दगडी भिंत अशी केलेली आढळते. या टाक्याच्या एका बाजूला असलेल्या कातळात पन्हाळी (चर) खोदलेला आहे. या चरातून येणारे पाणी टाक्याला लागून बांधलेल्या छोट्या हौदात पडेल आणि तो हौद भरल्यावर ते पाणी टाक्यात पडेल अशी योजना केलेली आहे. या रचनेमुळे गाळ हौदात जमा होऊन स्वच्छ पाणीच टाक्यात पडेल. या टाक्या जवळील कातळात काही पायर्‍या कोरलेल्या आहेत.
याशिवाय किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेली गुहा व टाकं आहे. ते पहाण्यासाठी मोठ्या टाक्या जवळून खाली उतरून किल्ल्याच्या दक्षिण टोकाला वळसा घालून पूर्वेकडे (बारीपाडा गावाच्या दिशेला) जावे लागते. गुहा पाहील्यावर आपली गडफेरी संपते. गुहे जवळून खाली उतरण्यासाठी पायवाट आहे. पण ती फारशी वापरात नसल्याने वाटाड्या बरोबर असेल तरच या वाटेने उतरावे.
गडावरून दक्षिणेला पालघरचा " देवकोप तलाव " दिसतो.
* पोहोचण्याच्या वाटा :
रेल्वेने :- बोईसर हे पश्चिम रेल्वेवरील महत्वाचे स्थानक आहे. आसावा किल्ला पहाण्यासाठी बोईसर हे जवळचे स्थानक आहे. मुंबई सेंट्रलहून सुटणार्‍या काही पॅसेंजर गाड्या बोईसरला थांबतात. तसेच विरार - डहाणू या दर तासाला सुटणार्‍या गाड्या बोईसरला थांबतात. डोंबिवलीहून सकाळी ५.३३ सुटणारी डोंबिवली- डहाणू गाडी मध्य रेल्वेवरील सर्वांसाठी सोईची आहे. आसावा किल्ला बोईसर पूर्वेला आहे, पण किल्ल्यावर जाण्यासाठी बसेस ( ठाणे , कल्याण मार्गे जाणार्‍या सर्व बसेस वारंगडे गावात थांबतात) व टमटम (१० आसनी रिक्षा नवापूर फाट्यावर मिळतात) पश्चिमेला मिळतात. बोईसर पासून किल्ल्याच्या पायथ्याचे वारंगडे गाव ८ किमीवर आहे.
रस्त्याने :-मुंबई - अहमदाबाद महामार्गावर मुंबई पासून ९२ किमीवर बोईसरला जाणारा चिल्हार फाटा आहे. या फाट्यावरून बोईसरला जाताना १० किमीवर वारंगडे हे गाव आहे.
वारंगडे गावात विराज फॅक्टरी आहे. वारंगडे गावातून विराज फॅक्टरीकडे जातांना फॅक्टरीच्या अगोदर उजव्याबाजूस (बोईसरहून चिल्हार फाट्याकडे जातांना) बारीपाडा गावाकडे जाणारा रस्ता जातो. (या रस्त्याच्या सुरुवातीला एक मोबाईलचा टॉवर आहे). या फॅक्टरीच्या कंम्पॉऊंडला लागून जाणारा रस्ता ८५० मीटरवरील किल्ल्याच्या पायथ्याच्या बारीपाडा गावात जातो. गाव सुरू होण्यापूर्वीच आंगणवाडीची बैठी इमारत डाव्या बाजूला दिसते. या इमारतीच्या बरोबर समोर (म्हणजेच वारंगडे - बारीपाडा रस्त्याच्या उजव्याबाजूस) एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. पावसाळ्यात एक छोटा ओहळ ओलांडून जावे लागते. या कच्च्या रस्त्याने ५ मिनिटे चालल्यावर डोंगर व रस्ता यांच्या मधून आडवा जाणारा नाला लागतो. या नाल्यावर ३ पूल आहेत. येथून गडावर जाण्यासाठी ३ वाटा आहे

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ३९ आजोबागड (Ajoba)

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ३९
अ आ मुळाक्षरानुसार असलेले महाराष्ट्रातील किल्ले

सांभार : http://trekshitiz.com/.....



आजोबागड (Ajoba)
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बालाघाट रांग
जिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम
बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला " अजापर्वत " उर्फ " आजोबाचा डोंगर " एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो. घनदाट झाडाझुडुपांनी नटलेला हा आजोबाचा गड गिर्यारोहकांसाठी एक आगळे वेगळे लक्ष्यच ठरला आहे. या गडाची ३००० फूटांची उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक मोठे आव्हानच आहे.
इतिहास :
गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रसिद्ध आहे याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी " रामायण " हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना " आजोबा " म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबाचा गड पडले. अशी कथा सांगितली जाते. येथे गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.
भूगोल :
पहाण्याची ठिकाणे :
देहेणेहून ( खाली दिलेली पहिली वाट पकडून) वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी साधारणत: अर्ध्या तासात पोहचावे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो. येथे गडावर रहाण्यासाठी एक कुटी आहे. जवळच पाण्याचा झरा आहे. जर मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय आपल्याला घरूनच करून आणावी लागते. आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर वर एक गुहा लागते. येथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. येथे डावीकडे एक पाण्याचे टाके सुद्धा आहे. या गुहेपर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिड्या देखील लावल्या आहेत. याच मार्गाने आश्रमात परतावे. अशा प्रकारे मुंबईहून येणार्‍यांसाठी आजोबाचा गड एक निसर्गरम्य अशी दुर्गयात्राच ठरते.
अनेक दुर्गवीर रतनगड आजोबाचा गड ते हरिश्चंद्रगड असा ४ ते ५ दिवसांचा ट्रेक करतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१) कल्याण - आसनगाव ( लोकल ट्रेनने ३५ मिनीटे ) -(रिक्षा/बसने ३ कि.मी) शहापूर -(बसने ३० कि.मी.) डोळ्खांब - (जीपने १२ कि.मी.) -देहेणे.
देहेणेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी १ ते १.५ तास लागतॊ. तिथून सीतेच्या पाळ्ण्या पर्यंत जाण्यासाठी १ ते १.५ तास लागतॊ.
२) कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने:-
कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने सुद्धा देहेणे गावी पोहोचता येते.
३) कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्गे:-
गडाचा माथा पहाण्यासाठी कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्गे जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावरती रहाण्यासाठी आश्रम आहे. यात २० जणांना रहाता येते.
जेवणाची सोय :
येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वत:च घेऊन यावे.
पाण्याची सोय :
येथे बारामाही पाण्याचा झरा सतत वाहत असतो.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
देहेणेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी १ ते १.५ तास लागतो.
सूचना :
गडावर सापांचे फार वास्तव्य असल्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ३८ अजिंक्यतारा (Ajinkyatara)

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ३८
अ आ मुळाक्षरानुसार असलेले महाराष्ट्रातील किल्ले

सांभार : http://trekshitiz.com/ ..
किल्ल्याची ऊंची : 950
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: बामणोली, सातारा
जिल्हा : सातारा
श्रेणी : मध्यम
अजिंक्यतारा हा किल्ला सत्पर्षी, सातारचा
किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.
अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा
शहर वसलेले आहे. गडावरून सातारा शहराचे विहंगम
दृश्य दिसते. प्रतापगडापासून फुटणार्या बामणोली
रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. गडावरुन
पूर्वेला नांदगिरी, चंदन-वंदन हे किल्ले आणि
पश्चिमेला सज्जनगड दिसतो.
इतिहास :
सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे
मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग
रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा.
सातार्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज
(दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला
बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या
आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या
आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती.
बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात
होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै
१६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी
जिंकून घेतला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी
ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब
महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने
सातार्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी
गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल
१७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी
दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच
मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला.
तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू
देखील या स्फोटात सापडले, मात्र काहीही इजा न
होता ते वाचले. तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला.
त्यामुळे मोठा तट पुढे घुसणार्या मोगलांवर ढासळला
व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील
सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१
एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला.
किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल
साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले
आझमतारा.
ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व
त्याचे नामातंर केले अजिंक्यतारा ! पण
ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही.
पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र
१७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि
स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. इ.स. १७१९ मध्ये
महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर
आणण्यात आले. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला.
दुसर्या शाहुच्या निधनानंतर फितुरीमुळे किल्ला ११
फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.
भूगोल :
पहाण्याची ठिकाणे :
सातार्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो
त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन
दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आ.हे
दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत.
दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे
मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे, मात्र
गडावर पाण्याची सोय नाही. दरवाजातून आत
शिरल्यावर डावीकडील सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर
वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती
केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे
टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी
वाट दिसते व " मंगळादेवी मंदिराकडे " असे तिथे
लिहिलेले आढळते.
या वाटेत ताराबाईंचा ढासाळलेला राजवाडा
आहे. येथे एक कोठारही आहे. वाटेच्या शेवटी
मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच
मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक
शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने
पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा
घालण्यासारखेच आहे. गडाच्या दक्षिणेला देखील
दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना
ते नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट
सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी
पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र
तलावांत पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून
आल्या मार्गाने खाली उतरावे लागते.
किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन
किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर
दिसतो. संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणत दीड
तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने
शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता. येते सातारा
एस टी स्थानकावरून अदालत वाड्या मार्गे जाणारी
कोणतीही गाडी पकडावी आणि अदालत
वाड्यापाशी उतरावे. सातारा ते राजवाडा अशी
बससेवा दर १० ते १५ मिनिटाला उपलब्ध आहे.
राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत
येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या
बाजूने जाणार्या थेट वाटेने आपण गडावर जाणार्या
गाडी रस्त्याला लागतो. येथून गाडी रस्त्याने १
किमी चालत गेल्यावर आपण थेट गडाच्या
प्रवेशव्दारापाशी पोहोचतो.अजिंक्यतारा
किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा
आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या
दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड
गाठण्यास साधारण १ तास लागतो.
राहाण्याची सोय :
गडावरील हनुमानाच्या मंदिरात १० ते १५ जणं राहू
शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची व्यवस्था आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
सातार्यापासून साधारणत: १ तास लागतो.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सूचना :
सातार्यात २ दिवस राहुन अजिंक्यतारा, सज्जनगड,
यवतेश्वर, पाटेश्वर ही ठिकाणे पाहता येतात.

अजिंक्यतारा (Ajinkyatara)

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ३७ अहिवंत (Ahivant) किल्ला

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ३७
अ आ मुळाक्षरानुसार असलेले महाराष्ट्रातील किल्ले

सांभार : http://trekshitiz.com


अहिवंत (Ahivant) किल्ला
किल्ल्याची ऊंची : 4000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी अहिवंतगड हा प्रमुख किल्ला होता. किल्ल्याचा प्रचंड आकार, त्यावरील अनेक वाड्यांचे अवशेष, मोठी तळी हे किल्ल्याचे मोठेपण अधोरीखित करतात. अचला, मोहनदर या दोन टेहळणीच्या किल्ल्यांची निर्मिती अहिवंतगडाच्या संरक्षणासाठी करण्यात आली असावी. अहिवंतगडचा आकार प्रचंड मोठा असल्यामुळे अहिवंत आणि त्याच्या बाजूचा बुधल्या (बुध्या) डोंगर पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.
खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.
इतिहास :
इसवीसन १६३६ मधे अहिवंतगड निजामशाहीच्या ताब्यात होता. मुघल बादशाहा शहाजहानने नाशिक भागातील किल्ले काबिज करण्याची जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपवली. शाहिस्तखानाचा सरदार अलिवर्दी खानाने अहिवंतगड जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
दरेगावातून पाहील तर अहिवंतगडाचा डोंगर नालेच्या आकारात पसरलेला दिसतो. अहिवंतगडाच्या बाजुला बुध्या डोंगर आहे. त्याच्या बाजुला अजुन एक डोंगर आहे. गावातील मारुती मंदिरापासुन चढायला सुरुवात केल्यावर आपण बुध्या आणि त्याच्या बाजूचा डोंगर या मधिल घळीत पोहोचतो. घळ चढुन बुध्या डोंगराला वळसा घालुन आपण बुध्या आणि अहिवंत गडाच्या मधल्या घळीत येतो. घळ चढुन गेल्यावर डाव्या बाजुला बुध्यावर कोरलेल्या कातळ कोरीव पायर्‍या आणि वरच्या बाजूस बुरुज दिसतो. या पायर्‍यांवर माती पडलेली आहे. त्यामुळे या पायर्‍या काळजीपूर्वक चढुन गेल्यावर आपण बुरुजा पाशी पोहोचतो. बुरुजाच्या पुढे एक सुकलेल टाक आहे. पुढे गेल्यावर दोन खराब टाकी आहेत. बुध्याच्या माथ्याला वळसा घातल्यावर अजुन एक बुरुज पाहायला मिळतो. बुध्याच्या माथ्यावर चार पाण्याची टाकी आहेत. त्यापैकी एक बुजलेल आहे. माथ्यावर एक शेंदुर लावलेला दगड आहे. बुध्याचा माथा छोटा असल्याने अर्ध्या तासात बुध्या पाहुन परत अहिवंतगड आणि बुध्याच्या मधल्या घळीत उतरुन १० मिनिट चढल्यावर आपण अहिवंत गडाच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजुला एक टेकडी आहे पण त्यावर कुठलेही अवशेष नाहीत. गडावरील महत्वाचे अवशेष गडाच्या मध्यभागी दिसणार्‍या टेकडीच्या आसपास आहेत. त्यामुळे टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. साधारणपणे आपण १० मिनिटात उध्वस्थ वाड्यांच्या अवशेषांपाशी पोहोचतो. इथे भरपूर उध्वस्थ वाड्यांचे अवशेष पसरलेले आहेत. त्यावरुन या ठिकाणी गडावरील मुख्य वस्ती होती याचा अंदाज बांधता येतो. यापैकी एका मोठ्या कोसळलेल्या वाड्याच्या मागच्या बाजुला तलाव आहे. त्या तलवाच्या काठावर मारुती आणि सप्तशृंगी देवीची मुर्ती आहे. तलावाच्या काठी एक उध्वस्थ कोठाराची इमारत आहे.
तलावाच्या आजुबाजूचे हे अवशेष पाहुन गडावरील टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. टेकडीपाशी पोहोचल्यावर टेकडी उजव्या हाताला ठेउन व दरी डाव्या हाताला ठेउन चालायला सुरुवात करावी. इथे डाव्या बाजुला दरीच्या टोकाला कातळात कोरलेली गुहा आहे. ही गुहा खालच्या अंगाला असल्यामुळे वरुन दिसत नाही. गुहेत जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्‍या होत्या पण आता त्या नष्ट झाल्याने काळजीपूर्वक खाली उतरावर लागत. गुहेत एक सुकलेल पाण्याच टाक आहे. गुहा सध्या राहाण्यायोग्य नाही. गुहेतून दुरवरचा परिसर दिसतो.
गुहा पाहुन वर येउन परत टेकडी उजवेकडे ठेवत पुढे गेल्यावर पाण्याच टाक लागत. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाक्याच्या बाजूला एक दगडाची तुटलेली ढोणी आहे. खंडोबाची एक अश्वारुढ मुर्ती आहे. टाक्यातल पाणी पिउन टेकडी चढुन जावे. टेकडीवर उध्वस्त घरांचे चौथरे आहेत आणि एक बुजलेल टाक आहे. टेकडीवरुन गडाचा पसारा आणि टेकडीच्या टोकाखाली असणारा बांधीव तलाव दिसतो. या तलावाच्या दिशेने खाली उतरावे. तलाव पाहुन पुढे गेल्यावर उजव्या बाजुला कड्याखाली (दरेगावाच्या दिशेला) कातळात कोरलेली गुहा आहे. ती पाहाण्यासाठी जाण्यासाठी अरुंद वाट आहे त्यावर घसारा (स्क्री ) असल्याने जपुन जावे लागते. गडावरील या दोनही गुहा गडाच्या पठाराच्या खालच्या बाजुस खोदलेल्या असल्याने वरुन त्यांचा अंदाज येत नाही. माहितगार बरोबर असल्यास या गुहा पाहाता येतात.
गुहा पाहुन परत पठारावर येउन पुढे चालत गेल्यावर आपण उध्वस्त प्रवेशव्दारापाशी येतो. प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर कातळात कोरुन काढलेला सर्पिलाकार मार्ग आणि पायर्‍या पाहायला मिळतात. हा त्याकाळी किल्ल्यावर येण्याचा राजमार्ग होता. राजमार्ग उतरुन गेल्यावर आपण एका अरुंद पठारावर येतो. येथे एक पाण्याचे मोठे सुकलेले टाक आहे. टाक पाहुन पुढे गेल्यावर वाट खाली उतरते. या वाटेन एक छोटा वळसा मारल्यावर कातळात कोरलेली एक खांब असलेली गुहा दिसते. ही गुहा राहाण्यायोग्य नाही. गुहा पाहुन खाली उतरल्यावर आपण उध्वस्त दरवाजापाशी पोहोचतो. या दरवाजाच्या बाजुचे बुरुज आणि देवड्याही नष्ट झालेल्या आहेत . या दरवाजातून खालचा दरेगाव बेलवाडी रस्ता दिसतो. या दरवाजातून बाहेर पडुन थोड खाली उतरल्यावर दोन वाटा आहेत. एक वाट सरळ खाली उतरत रस्त्यावर गेलेली आहे. बिलवाडीला उतरायचे असल्यास ही वाट पकडावी.
दरेगावला जाण्यासाठी उजव्या बाजुची कड्याखालुन जाणारी वाट पकडावी. कातळकडा उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत ही वाट सरळ कड्याच्या टोकापर्यंत जाते आणि तिथुन खाली खिंडीत उतरते. खिंडीतून दरेगाव बेलवाडी रस्ता बनवल्यामुळे याठिकाणी वाट थोडी कठीण बनलेली आहे. रस्त्यावर उतरल्यावर मधल्या वाटानी दरेगावला पोहोचायला अर्धा तास पुरतो.
या मार्गाने दरेगाव मारुती मंदिरापासुन सुरुवात करुन बुधा आणि अहिवंत गडाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या दरेगाव बेलवाडी रस्त्यावरील खिंडीत उतरल्यास किल्ला कमीत कमी वेळात संपूर्ण पाहुन होतो. किल्ला नीट पाहाण्यास किमान 3 तास लागतात.
किल्ल्यावरुन अचला, मोहनदर ,सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप ही रांग पाहायला मिळते.
पोहोचण्याच्या वाटा :
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. दरेगावातील मारुती मंदिरात ३० जणांची सोय होते.
जेवणाची सोय :
जेवणाची व्यवस्था आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची पाण्याची टाकी आहे. त्यात फेब्रुवारी पर्यंत पाणी मिळू शकते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
दरेगाव मार्गे दिड तास आणि बेलवाडी मार्गे २ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते फेब्रुवारी

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ३६ अचला (Achala) किल्ला...



दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ३६
अ आ मुळाक्षरानुसार असलेले महाराष्ट्रातील किल्ले
अचला (Achala) किल्ला...
अचला
समुद्रसपाटी पासून उंची - ११०० मीटर
पायथ्या पासून उंची - ३५० मीटर
जिल्हा - नाशिक
पायथ्याची गावे - जांभळी, पिंपरी
अक्षांश/रेखांश - ७३.८१५०८७, २०.४३१५८१
साधारण माहिती
वणीपासून फक्त चार किमीवर असलेला अचला त्याच्या जवळच्या अहिवंतशी एका धारेने जोडला आहे. दुस-या बाजूला तौला नावाचा सुळका अचलापेक्षा काही मीटर उंचावलेला दिसतो. तौला समुद्रसपाटीपासून साधारण १२३० मीटर उंच आहे तर अचलाची उंची ११०० मीटर भरते. अचला पायथ्यापासून अदमासे ३५० मीटर उंच आहे.
गडावर जायला प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. पहिला जांभळी गावाकडून, म्हणजे उत्तरेकडून आहे. ही वाट आपल्याला इशान्येकडून वरती पठारापर्यंत नेते. त्यापूढे गडाचा माथा डावीकडे ठेऊन उत्तरेकडील पाय-यांनी माथा गाठता येतो. ह्या मार्गावर थोड्या भागात घसारा आहे. दुसरा मार्ग पिंपरी गावाकडून येतो. हे गाव अचलाच्या दक्षिणेला वणी सापुतारा रस्त्यावर आहे. हा दक्षिण पल्ला जांभळीकडील मार्गापेक्षा थोडा लांबचा आहे.
अहिवंतवरून पश्चिमेकडची धार पकडून अचलावर जाता येते. ह्या धारेवर एक अष्टकोनी टाके आहे. त्याच्या शेजारून एक ओढ्याची वाट खालच्या घळीकडे जाते. त्यातून घळीत गेल्यावर नागमोडी वाटेने अचलाचे पठार गाठता येते. तिथून पुन्हा उत्तरेकडे वळसा घेत माथ्याचा मार्ग धरावा.
गडावर पाहण्यासारखे
अचलाच्या माथ्यावरून विस्तृत प्रदेश न्याहाळता येतो. पश्चिमेला तौला शिखर उंचावते तर पूर्वेला अहिवंत व सप्तशृंगीगड दिसतात. उत्तरेकडे लांबवर हातगड आणि नि-ही शिखरही दिसते. माथ्यावर काही पाण्याची टाकी असली तरी पावसाळ्यानंतर त्यात फारसे पाणी टिकत नाही. गडाची तटबंदी आज उभी असली तरी कधी पर्यंत टिकून राहिल ते सांगता येत नाही. ह्या व्यतिरिक्त वरती घरांचे काही अवशेष देखिल दिसतात.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ३५ अचला (Achala) किल्ला

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ३५
अ आ मुळाक्षरानुसार असलेले महाराष्ट्रातील किल्ले

सांभार :http://trekshitiz.com






अचला (Achala) किल्ला
किल्ल्याची ऊंची : 4040
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी दगड पिंप्रि गावामागे असलेला अचला गड हा छोटेखानी किल्ला अहिवंत गडाचा साथिदार आहे. अचला गडाचे स्वरुप पाहाता हा टेहळणीचा किल्ला असावा. या किल्ल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगराला टवल्या नावाने ओळखतात, तर उजव्या बाजूच्या डोंगराला भैरवाचा डोंगर म्हणतात.
खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.
पहाण्याची ठिकाणे :
दगड पिंप्री हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावात ५ फ़ूट उंचीच्या ६ वीरगळी पाहायला मिळतात. गड चढायला सुरुवात केल्यावर अचला गडाची सोंड खाली उतरते. त्या खिंडीत एक पत्र्याचे देऊळ आहे. त्या देवळाला सतीचे देऊळ म्हणतात. तेथून एक टप्पा चढून गेल्यावर भगव्या झेंड्याच्या खाली शेंदुर फ़ासलेली हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. गडाच्या कातळ टोपी खाली गडावर जाणार्‍या कातळ कोरीव पायर्‍या पाहायला मिळतात. अर्ध्या पायर्‍या चढल्यावर कातळात वरच्या बाजूला एक ३ फ़ूट लांब आणि ३ फ़ूट रुंद आकाराची चौरस प्रवेशव्दार असलेली गुहा पाहायला मिळते. गुहेत जाण्यासाठी पायर्‍या सोडून थोड चढुन जाव लागत. गुहा १० फ़ुट लांब आहे. या गुहेतून दूरवरचा परीसर चांगला दिसतो. याची योजना टेहळणीसाठी केलेली असावी. गुहा पाहून परत पायर्‍या चढायला सुरुवात करावी. पायर्‍या संपतात तेथे पाण्याचे बुजलेले एक टाक आहे. पुढे एक छोटा टप्पा चढुन गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे बुजलेले एक टाक आहे.
गड माथ्यावर प्रवेश केल्यावर एक टाक दिसत. त्या टाक्या भोवतीच्या झुडूपांवर कपडे पडलेले दिसतात. कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यावर गावकरी या ठिकाणी येऊन स्नान करतात. त्यावेळी ते गावातून घालून आलेले कपडे या ठिकाणी सोडून, नविन कपडे घालून जातात. आज मात्र हे टाक सुकलेल आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला एका झाडाखाली काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. पण त्या ओळखता येण्याच्या पलिकडे झिजलेल्या आहेत. त्यामागे घरांची जोती आहेत. तिथून उजव्या बाजूला वळून किल्ला आणि बाजूचा डोंगराच्या घळीत उतरायला सुरुवात केली की दोन टाकी दिसतात त्याच्या खालच्या बाजूस दोन टाकी आहेत. त्याच्या खाली एका पुढे एक पाच टाकी आहेत. अशी ८ टाक्यांची अनोखी रचना पाहायला मिळते. हि टाकी पाहून परत किल्ल्यात प्रवेश केला तेथे येऊन विरुध्द दिशेला (प्रवेश केला तेथून डावीकडे) डाव्या बाजूला गेल्यावर एक मोठ पाण्याच कोरड टाक पाहायला मिळते. त्यात दगड पडून ते बर्‍याच प्रमाणात बुजलेल आहे. टाक पाहून परत प्रवेशव्दाराशी आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते. गडमाथा छोटा असल्यामुळे गडफ़ेरीस अर्धा तास पुरतो. अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप ही रांग अचला वरुन पाहायला मिळते.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिकहुन वणी गाठावे. वणीहून एस.टी.ने पिंपरी अचलाकडे जावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे. अचला गावात उतरून दगड पिंपरी गावाकडे सरळ चालत निघावे. हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. दगड पिंपरी हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. खाजगी वाहानाने थेट दगड पिंपरी गावात जाता येते. गावातून समोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत छोटेसे सतीचे देऊळ दिसते. त्याच्या दिशेने वर चढत जावे. पाऊलवाट प्रथम शेतातून आणि नंतर वनखात्याने लावलेल्या जंगलातून वर चढत जाते. साधारणपणे अर्ध्या तासात आपण सोंडेवरील सतीच्या देवळापाशी पोहोचतो. देवळापासून डाव्या बाजूला दिसणारा किल्ला "अचला", तर उजवीकडे धावत जाणारी सोंड थेट "अहिंवत" गडाला जाऊन मिळते. डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरून अंगावर येणारी वाट पकडावी. पहिल्या टप्प्यावर मारूतीचे मंदिर आहे. पुढे ही वाट कातळ कड्यापर्य़ंत उभी चढत जाते. कड्याच्या नाकाडा खाली आल्यावर उजवीकडे वळून , कडा डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवून आडवे चालत गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. पायर्‍या चढुन गेल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. दगड पिंपरी गावातून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो.
दगड पिंपरी ते बेलवाडी असा कच्चा रस्ता झालेला आहे. काही वर्षात गाडीने थेट सतीचे देऊळ असलेल्या सोंडेपर्य़ंत पोहोचता येईल. तेथून गडमाथा १ तासात गाठता येईल.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची व्यवस्था आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पिण्या योग्य पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
दगड पिंप्री मार्गे दिड तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते फेब्रुवारी

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ३४ अ आ मुळाक्षरानुसार असलेले महाराष्ट्रातील किल्ले



दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ३४
अ आ मुळाक्षरानुसार असलेले महाराष्ट्रातील किल्ले
महाराष्ट्रात अ आ मुळाक्षरानुसार ३४ किल्ले आहेत
१ ) अचला २ ) अहिवंत ३ ) अजिंक्यतारा ४ ) आजोबागड
५ ) अकलूजचा किल्ला ६ ) अलंग ७ ) अंमळनेर ८ ) आंबोळगड
९ ) अंजनेरी १० ) अंकाई(अणकाई) ११ ) अंतुर १२ ) अर्नाळा
१३ ) आसावा १४ ) अशेरीगड १५ ) औंढा (अवंध) १६ ) औसा
१७ ) अवचितगड १८ ) अंजनवेल १९ ) अलिबाग २० )आड २१) एलीफंता
२२ ) आगाशी २३ ) आगर्कोट २४ ) अहमदनगर २५ ) अंबागड २६ ) अजमेरा
२७ )अनघाई २८ ) अक्कारानीचा किल्ला २९ ) अचलपूर ३० ) अमरावती परकोट ३१ ) आमनेर चा किल्ला ३२ ) अकोला शहर किल्ला ३३ ) अबेजोगाई चा किल्ला ३४ ) आसावा किल्ला
शिवभक्तांनी आणि शिवप्रेमिनो अजून तुम्हाला काही माहित असतील तर comment मध्ये अ आ मुळाक्षरानुसार असलेले महाराष्ट्रातील किल्ले type करा


दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 33 आपल्या किल्ला:





दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 33
आपल्या किल्ला:
आपल्या जवळ, नाशिक पश्चिम घाट कळसूबाई श्रेणी वसलेले आहे. लहान पण सुंदर, किल्ला भेट दिली करणे आवश्यक आहे. आपल्या AVANDH आणि पट्टा किल्ला समीप आहे. किल्ला ग्रेड माध्यम आहे आणि उंची 4046 फूट आहे.
कसे पोहोचाल:
प्रथम बस द्वारे नाशिक Girwadi गावात जा. येथे तुम्ही या पायथ्याच्या lies जे Tirdhe गावात जावे लागेल. मग आपण फोर्ट दृष्टीक्षेपात आहे जेथे पासून Aadwadi गावासाठी चढणे आहे.

Sunday, 4 November 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 32 आपल्या किल्ला:


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 32
आपल्या किल्ला:
आपल्या वरच्या 3 संच पाण्याची टाकी (विना पिण्यायोग्य), एक दार, आणि दुसऱ्या बाजूला एक गुहा एक बोकाळला platue आहे. गुहेत एक पायर्या आणि एक लहान खडक पाऊल द्वारे संपर्क साधला (कठीण नाही, पण काळजी घ्या) जाऊ शकते. गुहा पुढील एक लहान निराळा एक भेट वाचतो आहे. गुहेत आणि निराळा सहज सुमारे 20 लोक सामावून शकतो. तेथे गुहेत पुढील चांगला पाणी टाकी आहे आणि तो पाणी फक्त पिण्याच्या स्रोत होते. बांधकामे दिसत आणि काही कबरी किल्ल्याच्या वरील काही जुन्या संरचना आहेत.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 31 आपल्या फोर्ट (Aad Fort )

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 31
आपल्या फोर्ट (Aad Fort )
या लहान किल्ला समान पठार वसले आहे AVANDH आणि पट्टा किल्ला. हे AVANDH पूर्वेला आहे. एक AVANDH आणि पट्टा किल्ला भेट करताना हा किल्ला चांगला साइड सफर आहे.
श्रेणी: मध्यम
उंची: 4046 फूट
येथे पोहोचण्यासाठी: -
नाशिक पोहोचेल.
नंतर पठार वर AADWADI गावात चढणे, GIRWADI बस पकडू आणि बेस येथे TIRDHE गावात चालत पोहोचण्याचा सोपा आहे.
आणखी पर्यायी सफर तो एक मंदिर आहे जे वरच्या पोहोचण्याचा सोपा चढाव गावात TIRDHE पासून MHASOBA- CHAINNAGIRI (4178 फूट) असू शकते.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ७

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग
महाराष्ट्राचे वैभव – ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा (पुणे) --------४
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)
थोरल्या बाजीरावांना ही वास्तू उभारण्यासाठी १६,१२०/- रु. एवढा खर्च आला. पहिले बाजीराव पेशवे यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी तट व त्यांचे बुरुज आणि दरवाजे, दिवाणखाने व इतर इमारती, कारंजे व पाण्याचे हौद आदि वास्तू बांधल्या. हे सर्व काम पूर्ण होण्यास १७६० साल उजाडले. सध्या शनिवारवाड्याच्या चारही बाजूंना ९५० फूट लांबीची तटबंदी आहे. ही तटबंदी आणि बुरुज आजही पुण्यात मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतींना पाच मोठे दरवाजे व नऊ बुरुज आहेत. या बुरुजांवर तोफा बसवण्याची चांगली सोय केलेली आहे. यापैकी ‘पागेचा बुरुज’ आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. असे म्हणतात तो खड्डा तोफांचे गोळे ठेवण्यासाठी तयार करण्यात आला होता. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली दरवाजा, अलिबहाद्दर किंवा मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा आणि नारायण दरवाजा ही नावे आहेत. दिल्ली दरवाजा हा वाड्याचा मुख्य दरवाजा असून त्याचे तोंड उत्तर दिशेला आहे. या दरवाजातून सर्वांनाच येण्यास परवानगी पेशवेकाळात नव्हती. या दिल्ली दरवाजाची उंची २१ फूट व रुंदी १४फूट आहे. हा सर्वात मोठा दरवाजा आहे. वाड्यावर सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १००० हून अधिक नोकर होते.
Shaniwarwada_1860 शनिवारवाड्यात एक सात मजली सात खणी इमारत होती. वाड्यातील महत्त्वाच्या इमारतीत थोरल्या रायांचा दिवाणखाना, नाचाचा दिवाणखाना, गणेश महाल, जुना आरसे महाल आदींचा समावेश होता. वाड्यामध्ये असलेले हजारी कारंजे (एक हजार फवारे उडवणारे) म्हणून ओळखले जाणाऱ्या षोडशदलीय कमळाच्या आकाराच्या कारंज्याची शोभा आता कल्पनेनेच केवळ जाणता येईल. वाड्यात दिवाणखाने व त्यातील अतिसुंदर कोरीवकामाने नटलेल्या कमानींना सुरूच्या झाडांचा आकार दिलेले खांब होते. छतांना मनोहारी लाकडी वेलबुट्ट्या आणि सुंदर वेली व फुले कोरलेली होती तर भिंतीवर रामायण व महाराभात या महाकाव्यातील प्रसंगांचे देखावे चित्रित केलेले होते. वाड्याच्या इमारतींच्या आखणीत बांधकाम आणि त्यातील कलाकुसरीची कामे करण्यात ज्या प्रमुख कारागिरांचा वाटा होता त्यात शिवराम कृष्ण, देवजी व कोंडाजी सुतार, मोराजी पाथरवट, मीनकामात निष्णात असलेल्या जयपूरचा भोजराज व चित्रकार राघो इत्यादींचा समावेश होता.