Followers

Monday, 5 November 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ३६ अचला (Achala) किल्ला...



दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ३६
अ आ मुळाक्षरानुसार असलेले महाराष्ट्रातील किल्ले
अचला (Achala) किल्ला...
अचला
समुद्रसपाटी पासून उंची - ११०० मीटर
पायथ्या पासून उंची - ३५० मीटर
जिल्हा - नाशिक
पायथ्याची गावे - जांभळी, पिंपरी
अक्षांश/रेखांश - ७३.८१५०८७, २०.४३१५८१
साधारण माहिती
वणीपासून फक्त चार किमीवर असलेला अचला त्याच्या जवळच्या अहिवंतशी एका धारेने जोडला आहे. दुस-या बाजूला तौला नावाचा सुळका अचलापेक्षा काही मीटर उंचावलेला दिसतो. तौला समुद्रसपाटीपासून साधारण १२३० मीटर उंच आहे तर अचलाची उंची ११०० मीटर भरते. अचला पायथ्यापासून अदमासे ३५० मीटर उंच आहे.
गडावर जायला प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. पहिला जांभळी गावाकडून, म्हणजे उत्तरेकडून आहे. ही वाट आपल्याला इशान्येकडून वरती पठारापर्यंत नेते. त्यापूढे गडाचा माथा डावीकडे ठेऊन उत्तरेकडील पाय-यांनी माथा गाठता येतो. ह्या मार्गावर थोड्या भागात घसारा आहे. दुसरा मार्ग पिंपरी गावाकडून येतो. हे गाव अचलाच्या दक्षिणेला वणी सापुतारा रस्त्यावर आहे. हा दक्षिण पल्ला जांभळीकडील मार्गापेक्षा थोडा लांबचा आहे.
अहिवंतवरून पश्चिमेकडची धार पकडून अचलावर जाता येते. ह्या धारेवर एक अष्टकोनी टाके आहे. त्याच्या शेजारून एक ओढ्याची वाट खालच्या घळीकडे जाते. त्यातून घळीत गेल्यावर नागमोडी वाटेने अचलाचे पठार गाठता येते. तिथून पुन्हा उत्तरेकडे वळसा घेत माथ्याचा मार्ग धरावा.
गडावर पाहण्यासारखे
अचलाच्या माथ्यावरून विस्तृत प्रदेश न्याहाळता येतो. पश्चिमेला तौला शिखर उंचावते तर पूर्वेला अहिवंत व सप्तशृंगीगड दिसतात. उत्तरेकडे लांबवर हातगड आणि नि-ही शिखरही दिसते. माथ्यावर काही पाण्याची टाकी असली तरी पावसाळ्यानंतर त्यात फारसे पाणी टिकत नाही. गडाची तटबंदी आज उभी असली तरी कधी पर्यंत टिकून राहिल ते सांगता येत नाही. ह्या व्यतिरिक्त वरती घरांचे काही अवशेष देखिल दिसतात.

No comments:

Post a Comment