Followers

Sunday 27 September 2020

“पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी माता”.

 


“पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी माता”....🙏🚩

३०० वर्षांपासून बदलत्या पुण्याचे साक्षीदार म्हणून तांबडी जोगेश्वरी मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे ग्रामदेवता म्हणून तांबडी जोगेश्वरीला अग्रपूजेचा मान देण्याची प्रथा पेशवेंपासून प्रचलित आहे प्रत्येक महिन्यातील मुख्य सणावाराच्या दिवशी देवीची महापूजा करण्यात येते चैत्रगौरीचं हळदीकुंकू, श्रावणी शुक्रवार, पौणिर्मा आणि आश्विनमधील नवरात्रौत्सवामध्ये मोठ्या भक्तीभावाने महापूजा घातली जाते विशेष म्हणजे नवरात्रामध्ये दसऱ्यापर्यंत रोज देवीची विविध वाहनं साकारली जातात...

सध्याच्या कसबा पेठेत तांबडी जोगेश्वरीची चतुर्भूज मूर्ती स्वयंभू आहे
'तां नमामि जगद्धात्री योगिनी परयोगिनी' अशा शब्दात भविष्यपुराणामध्ये ग्रामदेवतेचं वर्णन करण्यात आलं आहे...
'जीवेश्वरैकस्य ईश्वरी सा योगेश्वरी 'जीव आणि ईश्वर यांची एकरूपता दर्शवणारी आदिशक्ती म्हणजे योगेश्वरी...
योगिनी हे योगेश्वरीचं दुसरं नाव असून कालांतराने योगेश्वरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन या देवीला जोगेश्वरी असं संबोधण्यात येऊ लागलं...

या देवीला तांबडी जोगेश्वरी हे नाव मिळण्यामागे एक कथा आहे....,
माहिष्मती नगरीतील महिषासूराचा पराभव करणारी ती महिषासूरमदिर्नी या महिषासूराचे अंधक, उद्धत, बाष्कल, ताम्र असे बारा सेनापती होते यातील ताम्रासूराचा वध करणारी ती ताम्र योगेश्वरी पण कालांतराने तिची तांबडी जोगेश्वरी या नावाने पूजा केली जाऊ लागली पेशवेकाळापासून आत्तापर्यंत बेंदे घराण्याकडे देवीच्या पूजेचा मान आहे सध्या ज्ञानेश बेंदे आणि वसंत घोरपडकर हे पुजारी पूजेची जबाबदारी पार पाडतात वेशीबाहेरच शत्रूला ठार करून गावाचं संरक्षण केलं पाहिजे म्हणून तांबडी जोगेश्वरी ही पुनवडीच्या (आत्ताचं पुणे) बाहेर आंबील ओढ्याकाठी होती...

जोगेश्वरीचा मुख्य उत्सव म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत होणारा नवरात्रोत्सव या उत्सवामध्ये दररोज आठ ते दहा हजार भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात अष्टमीपर्यंत शेषासनी नारायणी, गरूडारूढा वैष्णवी, अश्वारूढ महेश्वरी, वृषभारूढ आदिमाया अशी देवीची वाहनं इथे साकारली जातातदसऱ्याच्या दिवशी देवीची वाजतगाजत पालखी
निघते केवळ दसऱ्यालाच नाही तर इतर दिवशीही देवीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दीत निघते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आजही देवीच्या आशिवार्दानेच केली जाते....

“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....”

#जागर_स्त्रीशक्तीचा...

#आतुरता_नवरात्रोत्सव_२०२०.....🚩

No comments:

Post a Comment