Followers

Thursday, 22 February 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १९ चौगाव

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १९
चौगाव
ऐतिहासिक माहिती
सध्याची स्थिती
मार्ग
प्रकार -
वनदुर्ग
उंची -
६६०मी समुद्रसपाटीपासून
जवळचे गाव -
चौगाव
रांग -
सातपुडा रांग
मार्ग -
जळगाव-चोपडा-चौगाव
चौगाव हे सातपुडा डोंगराच्या दक्षिणेला वसले आहे. चौगाव लासूरपासून ३ कि.मी. अंतरावर आहे. चोपडा-चौगाव असाही गाडीमार्ग आहे. चौगावपासून उत्तरेला सातपुडा डोंगररांगेत किल्ला आहे. साधारण ४ कि.मी. अंतरावर त्याचा पायथा आहे. वाटेवर तीन नद्यांचा संगम आहे. याला त्रिवेणी संगम म्हणून ओळखतात. तेथे मंदिर आहे. गड झाडीने झाकलेला आहे. गडाच्या कड्याखाली पाणी आहे, तटबंदी, दरवाजे, घरांचे अवशेष आहेत.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १८ अमळनेर

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १८
अमळनेर
ऐतिहासिक माहिती
सध्याची स्थिती
मार्ग
जळगावच्या पश्चिमेला अमळनेर हे तालुक्याचे गाव आहे. धुळे, नंदुरबार, चोपडा, जळगाव, पारोळा अशी गावांशी अमळनेर गाडीमार्गाने जोडलेले आहे. अमळनेर बोरी नदीच्या काठावर वसले आहे. खानदेशातील हा महत्वाचा किल्ला आज नागरी वस्तीमुळे लुप्त झालेला आहे. नदीकडील बाजूकडे तसेच इतरत्र तटबंदीचे अवशेष शोधावे लागतात. एक दरवाजा व त्याचे भव्य बुरुज मात्र पहायला मिळतात. बालेकिल्ल्याचा म्हणून जो भाग सध्या दाखवितात त्या उंचवट्यावर सध्या एक कबर आहे.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १७ पालचा किल्ला

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १७
पालचा किल्ला
ऐतिहासिक माहिती
सध्याची स्थिती
मार्ग
पाल हे जळगावच्या ईशान्येला वसलेले आहे. जळगाव-सावदा-पाल अथवा रावेर-पाल असे गाडीमार्ग आहेत. पाल सुकी नदीवरील प्रकल्पामुळे तसेच पाल-यावल अभयारण्यामुळे प्रसिद्ध आहे. पाल किल्ल्याची तटबंदी व बुरुज जवळजवळ नष्ट होत आलेले आहे. दरवाजाचे अवशेष भक्कमपणे उभे आहेत. किल्ल्यामध्ये वनखात्याचे विश्रामगृह आहे. पालमधील मशीद प्रेक्षणीय आहे.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १६ नंदुरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातील जहागीरदार बारगळांची गढी --२



दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १६
नंदुरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातील जहागीरदार बारगळांची गढी
तळोदा शहरात श्रीमंत बारगळ जहागीरदारांची वैभावाची साक्ष असून प्राचीन गढ़ी आहे. या गढीचा काही भागाच्या आता पड़झड झाली असली तरी काही बांधकाम अजूनही शाबूत आहे. भोजराज बारगळ यानी 1962 मधे या ऐतिहासिक वास्तुच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे त्यांचे पुत्र नारायणराव बारगळ यांनी गढीच्या कमानी दरवाजा बांधला. सुमारे सहा एकर परिसरात या ऐतिहासिक गढीचे बांधकाम झाले असुन हे बांधकाम पाच वर्ष चालले. बारगळ जहागीरदारांच्या घराण्यातील त्यांचे वंशज सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अमरजीतराव शिवाजीराव बारगळ व त्यांचे इतर आप्तेष्ट आजही या ऐतिहासिक गढीत राहतात. १९५२ पर्यंत तळोदयाचे प्रशासन हे बारगळ जहागीरदार यांच्या नियंत्रणाखाली चालायचे. जहागीरदार व गावाचे कामकाज चालवीण्यासाठी एक दिवाण सहा कारकुन असायचे. त्यापैकी दोन कारकुन हे त्यांच्या खाजगी कारभार पहायचे तर चार कारकुन जहागीरदारीचे कामकाज, हिशेब, वसुलीचे काम पहायचे. शिवाय बाहेरच्या प्रशासकीय कामासाठी दोन पाटील होते. मुलकी पाटिल पोलीस पाटील ही दोन्ही पदे त्या वेळी होती. मुलकी पाटलाचे पाच वतनदार घराणे होते. मगन गनपत पाटील, गोविंद कडवा पाटील याप्रमाणे. प्रत्येक पाटीलला २७ एकर जमीन त्या वेळी उत्पनासाठी मीळायची. शिवाय ज़माबंदी दरबारात मुलकी पाटलाला ६९ रुपये १० आणे फेटा, पागोटे, उपरणे, पान-सुपारीचा मान मीळायचा. पोलीस पाटलाला वर्षाला ५७ रुपये ६ आणे फेटा पागोटे, उपरणे, वेताची काठी हां मान मीळायचा. याशिवाय 16 मील कामदार, वनदार (जागले), चार महार कामदार, एक कोळी कामदार वतनदार होते. या कामदारानाही त्यांचा कामापोटी वतन दिले जायचे. येथील हल्लीचे बारगळ जहागीरदार अमरजीतराव बारगळ यांचे पणजोबा कृष्णराव आनंदराव बारगळ आजोबा शंकरराव कृष्णराव बारगळ यांच्या पीढ़ीपर्यंत दि: १-८-१९५३ पर्यंतताळोद्यात ही प्रशासन यंत्रणा बारगळ जहागीरदारांकडे सुरु होती. त्यानंतर ताळोद्यात शासकीय कारभार इनाम अँबाँक्युशन अँक्ट आला व शासनाकडे कारभार आला त्यानंतर तळोदयात शासकीय कारभार सुरु झाला. सन १८६७ चा गँझेतेड रिपोर्ट व बारगळ जहागीरदार संस्थानचे जुने ऐतिहासिक दस्तावेज व कागदपत्राच्या नोंदीत या प्रशासकीय प्रणालीचा उल्लेख आहे.
सांभार : http://sudhaspari.blogspot.in

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १५ नंदुरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातील जहागीरदार बारगळांची गढी--१

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १५
नंदुरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातील जहागीरदार बारगळांची गढी
उत्तरेकडे विस्तीर्ण सातपुडा पर्वताच्या रांगा तर दक्षिणेकडे तापी नदिचे विस्तारलेले पात्र यात वसलेले तळोदे हे शहर. तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतीक, सामाजिक असा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे तळोदे, पहेलवानकीने गाजणारे तळोदे अशी तळोद्याची पहेचान आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तळोदा तालुक्यात राहणार्‍या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. सुरतेची लूट केल्यानंतर शिवछत्रपतींनी तापी नदी किनारी मुक्काम केला होता. ज्या ठिकाणी त्यांचा तळ होता त्या ठिकाणाला तळोदे असे म्हणतात. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात बारगळांची गढी विशेष प्रसिध्द आहे. सन १६६२ मध्ये जहागिरदार भोजराज बारगळ यांनी गढीचे बांधकाम केले. त्यासाठी सात ठिकाणाहुन माती आणण्यात आली. सलग पाच वर्षे बांधकाम सुरु होते. सहा एकर जागेत बारगळांची गढी वसलेली आहे. गढीचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. त्यावरील कोरीव काम अप्रतिम असे आहे. आज ही गढी शेकडो वर्षानंतर ताठ मानेने उभी आहे. तळोदा गाव बारगळ जहागीरदारांना इनाम म्हणून प्राचीनकाळी मिळालेले. त्यामुळे या परिसरावर संस्थानिक बारगळ जहागीरदारांचे वर्चस्व। त्यामुळेच संस्थानिक राणा मानसिंग यानी शिवाजी बारगळ यांचे पुत्र भोजराज याना तळोदे हे गाव इनाम दिले. कालांतराने बारगळ व संस्थानिकात वाद निर्माण झाले. त्यांचे पर्यावसान युद्धात होऊन बारगळानी पूर्ण संस्थान काबिज केले. पुढे समजोता होऊन हे संस्थान परत करण्यात आले व लढाईच्या खर्च्याबद्दल बारगळाना तळोदा गावाची हद्द वाढवून मीळाली. राणानी बारगळाच्या पत्नीस बहिन मानले व या नात्याने दोन्ही घरातच कायमस्वरूपी स्नेहभाव निर्माण झाला.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १४ अचलपूरचा किल्ला-------------------३

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १४
अचलपूरचा किल्ला-------------------३
१६९८ मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज राजाराम यांनी वऱ्हाड प्रांत जिंकला. नंतर शाहू महाराजांनी परसोजी भोसले अमरावतीकर यांना वऱ्हाड प्रांताची जहागिरी दिली. १७४४ ते १७५० पर्यंत हा भाग निजामांच्या ताब्यात गेला पण, नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी त्यांचे पुत्र मुधोजी यांना पाठवले होते. काही काळ एलिचपूर हे मुधोजींच्या ताब्यात होते. नंतर १८०३ मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाले. या युद्धानंतर वऱ्हाड इंग्रजांच्या ताब्यात गेला, हा इतिहास आहे.
मोहम्मद तुघलकाचा पुतण्या सुल्तान इमाद-उल-मुलूक याने १३४७ मध्ये इदगाह उभारली. या इमारतीच्या पायऱ्यांवरून त्यावेळी गाविलगडचा किल्ला दिसत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. १०८ खांबांची आणि १५ मीटर उंचीची जुम्मा मशीद ही पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आली, ही भव्य मशीद उभारण्याचे श्रेय औरंगजेबच्या काळातील नवाब अलीवर्दीखान याच्याकडे जाते.
शहराच्या बाहेरील परकोट हा सुल्तानखानचा मुलगा नवाब इस्माईलखान याने बांधला. नबाबाचा महाल आणि देवडी ही बहिलोलखान व सलाबतखान याने बांधली. बालाजी तसेच, श्रीरामाचे देऊळ, शहा इस्माईलखाँ या फकिराचे थडगे नागपूरचे माधोजी भोसले यांनी बांधले. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्टय़पूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे १०० मीटर व्यासाच्या तलावात ८१ फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. पूर्वी ही इमारत पाच मजली होती. त्यातील तिसरा आणि चौथा मजला पाडून त्याच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला, असे सांगितले जाते पण, ही आगळी वेगळी जीर्ण अवस्थेतील वास्तू आडवाटेने येणाऱ्या पर्यटकांचे आजही लक्ष वेधून घेते. गुलाम हुसैन खान याने इमामवाडा बांधला. त्याच्याच काळात बेबहा बाग बांधण्यात आली. या ठिकाणी इस्माईल खान याचे थडगे आहे. या परिसरात अनेक छोटी मोठी थडगी आहेत पण, या वास्तूचे सौंदर्य वेगळेच आहे. जाळीदार खिडक्या, नक्षीकाम केलेले दरवाजे यामुळे ही वास्तू प्रेक्षणीय बनते पण, सध्या ही वास्तू भकास बनली आहे. नावालाच ही बाग उरली आहे. या बागेत केवळ झुडपे, काही इमारतींचे भग्नावशेष आणि आत प्रवेश केल्यानंतर जाणवणारे भकासपण. ही वास्तू खाजगी मालमत्ता असल्याचा एक फलक दरवाजावर लावण्यात आला आहे पण, या जागेचा वापर या ठिकाणी मिळणारा एकांत पाहून नको त्या कामांसाठी केला जात असल्याचे या भागातील रहिवासी सांगतात.
अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी अजूनही योग्य ते नियोजन झालेले नाही पण, शेकडो वर्षांपूर्वी बहामनी सत्ताकाळात खापरी नळ बांधून शहरभर पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बिच्छन नदीवर त्यासाठी एक धरणही बांधण्यात आले होते, असा उल्लेख ‘गॅझेटियर’मध्ये आहे. आता हे नळ बंद असले तरी त्याचे अवशेष आणि जागोजागी टाक्या अजूनही कायम आहेत. त्याला ‘सातभुळकी’ म्हणतात. या गतवैभवावर चर्चा करणेच आता अचलपूरकरांच्या नशिबी आले आहे. दोन्ही शहराची तहान पूर्णपणे भागवू शकेल, अशी पाणीपुरवठा योजना अजूनही अस्तित्वात आलेली नाही.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १३ अचलपूरचा किल्ला -----२

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १३
अचलपूरचा किल्ला -----२
बहामनी सत्ताकाळात १३९९ मध्ये आठवा सुल्तान फिरोजशहा बहामनी याला एका मोहिमेसाठी अचलपूरला यावे लागले होते. खेडल्याचा राजा नरसिंगराय आणि फिरोजशहा यांच्यातील युद्धानंतर नरसिंगराय शरण आला, तेव्हा तो सुल्तानाच्या भेटीसाठी अचलपूरच्या छावणीतच थांबला होता, यावरून त्या काळातील एलिचपूरचे महत्त्व लक्षात येते. १४२५ पर्यंत अचलपूर हे मुस्लिम सत्तेतील महत्त्वाचे ठिकाण होते. त्यानंतर इमादशाहीत म्हणजे १४९० ते १५७४ पर्यंत वऱ्हाडातील स्वतंत्र इमादशाहीचा कारभार हा गाविलगड, नरनाळा या किल्ल्यांमधून सांभाळला गेला. बरीच वर्षे अचलपूरचा ‘वास्तू इतिहास’ कोराच राहिला. तरीही अचलपूरचे महत्त्व कमी झालेले नव्हते. १५७४ ला वऱ्हाड प्रांत हा निजामाकडे आला. निजामशाहीतही हे शहर महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार ठरले. सुमारे २६ वष्रे निजामशाहीत राहिलेला वऱ्हाड प्रांत १५९८ मध्ये अकबराच्या स्वारीनंतर मोगल साम्राज्यात समाविष्ट झाला. अबूलफजल हा वऱ्हाडचा सुभेदार बनला. मोगलांची सत्ता संपूर्ण शतकभर होती. मोगल दरबाराच्या बातमीपत्रांमध्ये एलिचपूर व संबंधित किल्ल्यांचे उल्लेख सापडतात. २ एप्रिल १६९४ च्या नोंदीनुसार एलिचपूर हे सरकारी खजिना ठेवण्याचे ठिकाण होते. ११ मे १७०३ च्या बातमीपत्रात अजून एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख आहे. त्यात मराठय़ांचे सैन्य वऱ्हाडची राजधानी असलेल्या एलिचपूरवर चाल करून आले व त्यांनी मोगलांचा नायब सरअंदाज खान याच्याकडे चौथाईची मागणी केली. त्यावेळी सुभेदार उमाद तुल्मुक्तखान फिरोजजंग हा होता. मोगल काळातच मराठय़ांनी वऱ्हाड जिंकण्यासाठी अनेक स्वाऱ्या केल्या.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १२ अचलपूरचा किल्ला

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १२
अचलपूरचा किल्ला ----------------१
(सांभार : सह्याद्री प्रतिष्ठान )

'अचलपूरचा इतिहास म्हणजेच वर्‍हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) शहर. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते. पौराणिक काळात जैन धर्मातील 'इल' नावाच्या राजाने हे नगर वसवल्याने त्याला ‘एलिचपूर’ असे नाव पडले. आज ते अचलपूर या नावाने परिचित आहे.
एलिचपूर ते अचलपूर या शेकडो वर्षांच्या प्रवासात या नगराने इतिहासाला कलाटणी देणार्‍या अनेक घटना अनुभवल्या. मुस्लिम राजवटीत नबाबांचा थाट या शहराने पाहिला. मराठय़ांच्या विरोधात इंग्रजांनी सैनिकी व्यूहरचना याच शहराबाहेरून आखली. कापड आणि रेशीम उद्योगाचा सुवर्णकाळ पाहणार्‍या या शहरात नंतर या व्यवसायावर अवकळा आल्याचेही लोकांना दिसले. सुंदर बागांनी नटलेल्या शहरातील बगिचे नाहीसे झाले. अमरावती जिल्ह्य़ातील सर्वात मोठे तालुक्याचे शहर म्हणून या शहराची ओळख असली तरी अचलपूर जिल्ह्य़ाचे मुख्यालय बनावे, ही अनेक वर्षांची मागणी केव्हा तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा अचलपूरकर बाळगून आहेत.
अचलपूरच्या सभोवताली असलेला परकोट आणि चार भव्य दरवाजे या शहराच्या गतवैभवाचे दर्शन घडवतात. दुल्हा दरवाजा, तोंडगाव दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा आणि हिरापुरा दरवाजा, अशी या द्वारांची नावे आहेत. एलिचपूर ही एकेकाळी विदर्भाची राजधानी होती. त्याकाळी तब्बल ४० हजार घरे शहरात होती. मुस्लिम राजवटीत अचलपूर शहरात ५४ वस्त्या होत्या. त्या वस्तीला तेव्हा पुरा म्हणत. आजही ३५ च्या वर ‘पुरे’ अस्तित्वात आहेत. मुस्लिम नबाबांच्या नावावर या पुर्‍यांची नावे आहेत. समरसखानने (१७२४) वसवला तो समरसपुरा, सुल्तानखानने (१७२७) वसवला तो सुल्तानपुरा, सलाबतखान याची पत्नी अन्वरखातून हिच्या नावावरून अन्वरपुरा, नामदार गंज, नसीबपुरा, अब्बासपुरा, अशी या वस्त्यांना नावे देण्यात आली.
देवगिरीच्या यादवांचा कालखंड संपल्यानंतर व १३४७ मध्ये बहामनी सत्तेचा उदय होईपर्यंत नरनाळा आणि गाविलगड या किल्ल्यांसह वर्‍हाड प्रांत हा दिल्लीचा बादशहा मोहम्मद तुघलक याच्या अधिपत्याखाली होता. यावेळी बादशहाचा जावई इमाद उल मुलूकहा वर्‍हाड आणि खान्देशचा सुभेदार होता. या परिसराचा कारभार तो एलिचपूरहूनच पाहत असे, असा उल्लेख ‘गुलशने इब्राहमी’ या ग्रंथात सापडतो. त्याकाळी एलिचपूर हे महत्त्वाचे ठिकाण होते, हे लक्षात येते पण, या नगरीचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ११






दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ११
इतिहास हा खर तर सर्वात जास्त उपेक्षित विषय पण आपला इतिहास हा सह्याद्रीच्या भुगोलाशी निगडित आहे. इथल्या दुर्गम दुर्गांशी आणि प्राचीन संस्कृतीशी आहे. इथे गड़ - किल्ले - दुर्ग, प्राचीन मंदिरे, शिलालेख, लेणी आणि ह्या सर्वांची रचना इतकी वैविध्यपूर्ण आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य किल्ल्यांचा संबंध छत्रपति शिवाजी महाराजांशी जोडला जातो. शिवकाळात'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग'हा विचार प्रकर्षाने जाणवतो.
सातवाहन, राष्टकूट, शिलाहार,यांचा दुर्गबांधणी मधला सहभाग दुर्लक्ष करण्याजोगा नाही. पण शिवकाळ हा किल्ल्यांची उभारणी व त्यांचा उपयोग यांचा सुवर्णकाळ होता. दुर्गबांधणीतल्या तंत्राचा परमोच्च अविष्कार शिवदुर्गरचनेत आढळतो. त्यांनी काही जलदुर्ग उभारले तर काही गिरिदुर्ग, काही वनदुर्ग तर काही अश्मदुर्ग. शिवछत्रपती महाराजांनी राजाभिषेकानंतर रघुनाथपंतांकडून 'राज्यव्यवहारको श'तयार करवून घेतला. त्यात ७ वे प्रकरण किल्ल्यांवर आहे. तर रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे.
त्यात म्हटले आहे की"गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण.""दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे.
याकरता गड़ पाहून एक, दोन, तीन दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून, वरकड दरवाजे आणि दिंडया चिणून टाकाव्यात."ग़डा वर येणारे मार्ग सुद्धा तितकेच महत्त्वाचे असायचे. त्याबदल लिहिले आहे,"ग़डावर यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावेत. सुगम असले तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवून आणखीकड़े परके फ़ौजेस येता कठिण असे मार्ग घालावे. ग़डाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी (डोंगर उतारावरची झाडी) प्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठीही तोड़ो न द्यावी. बलकुबलीस (अडचणीच्या वेळी) झाडीमध्ये हशम बंदूके घालावी, या कारणेजोगे असो द्यावे."

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १०

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १०
महिन्यातुन एकदा तरी गड-किल्ले-दुर्गावारी करा,
रोग आणि आजारांतुन बाहेर पडा.
दुर्ग सर करणा-या मावळ्यांना श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती पोट आणि मानसिक आजार होणार नाहीत.
आधुनिक वैद्यकशास्त्रात याचे संदर्भ आढळत नसतील असे समजुन याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः एकदा खात्री करा.
मग तुम्ही स्वतःच या गोष्टीचा प्रचार कराल.
● श्वसन - गडावर खालुन वर चढताना श्वासांची प्रक्रिया जलद होते,
त्यामुळे पुर्ण श्वासोच्छ्वासाची क्रिया घडते.
श्वासोच्छ्वासाच्या क्रियेला चालना मिळते.
● रक्तप्रवाह - श्वासोच्छ्वास जलद झाल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, रक्ताभिसरणाची क्रिया जलद होते.
शिरांतील, नसांतील ब्लॉकेज निघतात.
महिन्याला दुर्गाची वारी
ब्लड-प्रेशरचा आजार दुर करी..!
● गुडघे - पायांवर ताण येतो,
सर्व स्नायु उत्तेजित होतात.
● छाती - वर चढताना दम भरल्याने फुफ्फुसे पुर्ण क्षमतेएवढी हवा आत घेतात आणि बाहेर सोडतात.
● पोट - गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द चालताना डीहाइड्रेशन मुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते, पण गडावर गेल्यावर झरा, तळी, पावसाचे अतिशुद्ध पाणी पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते,
दैनंदिन दुषित पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार दुर व्हायला हातभार लागतो.
शरीरावरील चरबी कमी होते.
● मानसिक आजार - रोजच्या धकाधकीच्या जीवनातील ताण-तणाव हे गडावरील मनाला प्रसन्न करणारे वातावरण, निसर्गाचे मुक्तहस्त चित्रण, निसर्गाचे रंग-रुप पाहुन दुर होतात.
गडावरील सौंदर्य पाहुन भारलेले मन घेऊनच खाली आल्याशिवाय आपण राहत नाही.
मनाची प्रसन्नता वाढते आणि ताण-तणाव निवळायला मदत होते.
चला मग दुर्गांच्या वाटेवर..!!

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ९

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ९
महाराष्ट्राचे वैभव – ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा (पुणे) --------६
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)
पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१,४०२ हिरे, ११,३५२ माणके, २७,६४३ पाचू १,७६,०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडूर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १,५६२ पिरोजा, १,९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना बाजीरावानंतर त्यांचा दत्तक पुत्र नानासाहेब याला मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर नानासाहेबांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांनी हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्यकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्यावेळी ब्रिटिशांना मिळाला होता.
२७ फेब्रुवारी १८२८ रोजी वाड्याला लागलेल्या भीषण आगीत इमारत भस्मसात झाली आणि पेशव्यांच्या विशाल साम्राज्याच्या एकमेव निशाणीचा काळाच्या पडद्याआड दुर्दैवी अंत झाला. ही आग सतत सात दिवस चालू होती. आता केवळ काही मोजकेच अवशेष आपणास पहावयास मिळतात. ज्या वास्तूने मराठेशाहीच्या गौरवाचे, त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले तो नगारखाना आज पुणे शहराचे लाडके प्रतिक व पुणेकरांचा मानबिंदू बनला आहे.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ८


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ८
महाराष्ट्राचे वैभव – ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा (पुणे) --------५
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)
१८०८, १८९२, १८१३ या वर्षी वाड्याला छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात. तर १७ नोव्हेंबर १८९७ ला वाड्यावरील पेशव्यांची सत्ता संपून वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. वाड्याच्या दिल्ली दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच आहे. देवडीच्या भिंतींवर शेषशायी विष्णू, गणपती या देवतांची चित्रे काढली आहेत. ती आता काळाच्या ओघात बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागामध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.
एक मुसलमान सरदार वाड्याबद्दल पत्रात लिहितो, ‘बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो मात्र आत स्वर्गासारखा दिसतो.’
इ.स. जून १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी गादीचा त्याग केला व पेशवाईची सूत्रे सर जॉन मॅलकम याच्या हाती सोपवून ते एक राजकीय कैदी म्हणून कानपूरजवळ बिठूर येथे राहण्यास गेले. वाड्यात काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेन्री डंडास रॉबर्ट्सन रहात होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्याकाळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ६

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ६
महाराष्ट्राचे वैभव – ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा (पुणे) --------३
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)
इ.स.१८ व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला १७ जून १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या भव्य अशा वाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत करण्यात आली.
शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत, पेशव्यांचा दरबारच येथे होता. पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे. पुढे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्तमहाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढविली.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ५


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ५
महाराष्ट्राचे वैभव – ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा (पुणे) --------२
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)

दि. ३० ऑगस्ट १७७३, वेळ दुपारची. अचानक सुमेरसिंह व महम्मद युसूफ ७००-८०० गारद्यांसह वाड्यावरील पहारेकऱ्यांची कत्तल करून वाड्यात शिरले. त्यांनी प्रचंड गोंगाट सुरू केला व थकलेल्या पगाराची मागणी केली. कसला गोंगाट सुरू आहे हे पाहण्यासाठी नारायणराव खोलीतून सज्जात आले, तर त्याला हातात नंग्या तलवारी घेतलेले गारदी माडी चढून त्यांच्याकडे येताना दिसले. तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते रघुनाथरावांच्या निवासस्थानाकडे पळाले. रघुनाथराव त्यावेळेस पूजेत मग्न होते. नारायणराव रघुनाथरावांच्या पायांना घट्ट मिठी मारून जीव वाचवण्याची विनंती करू लागले. काका मला वाचवाऽऽऽ या आर्त किंकाळ्या नारायणरावांच्या मुखातून निघू लागल्या. तितक्यात तुळाजी पवाराने नारायणरावांचे पाय ओढले. नारायणरावांच्या मागे असलेले सुमेरसिंह व इतर गारदी तिथे येऊन पोहोचले. त्यांनी नारायणरावांवर तलवारींचे सपासप वार करून त्यांचे अक्षरशः तुकडे केले. एवढा गोंधळ झाला होता की कोणाला काहीच कळेना. नारायणरावांच्या शरीराचे एवढे तुकडे झाले होते की ते पोत्यात भरूनच प्रेताचे दहन करावे लागले. हा चित्तथराराक प्रकार घडला तो इतिहासप्रसिद्ध पुण्यातील शनिवार वाड्यात. मराठ्यांच्या पेशव्याची अक्षरशः कपटाने कत्तल केली गेली होती.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ४

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ४
महाराष्ट्राचे वैभव – ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा (पुणे) --------१
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)
१८ व्या शतकात बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांनी बांधलेली सर्वात भव्य, विशाल आणि डौलदार वास्तू आहे. या इमारतीचा पायाभरणीचा समारंभ शनिवार दि. १० जानेवारी १७३० मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार तर उद्‌घाटन समारंभ शनिवार दि. २२ जानेवारी १७३२ या शुभदिनी झाला. जुन्या नोंदीनुसार या वाड्याच्या बांधकामासाठी १६,१२०/- रु. खर्च झाला. इ.स. १७५८ मध्ये किमान १,००० लोक या वाड्यात रहात असत असा उल्लेख सापडतो. जेव्हा मराठेशाही ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी सत्ता होती त्यावेळी शनिवारवाडा हेच पेशव्यांची कारभारी दफ्तर होते. यावेळी अनेक सरदार, लष्करप्रमुख, राजे आणि देशी–विदेशी राजदूतांनी येथे भेटी दिल्या आहेत. असे म्हणतात की या सातमजली भव्य इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिराचा कळस दिसत असे.

Friday, 9 February 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 3


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 3
जलदुर्ग
समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा किंवा पाण्यातून वर आलेल्या पायरस्त्यावरून पायी पायी जाता येते. तर काही किल्ल्यांना तीन बाजूंनी पाणे आणि चौथ्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी सरळ वाट असे. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा ही जलदुर्गांची उदाहरणे. समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळून प्रतिकार करण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे.
काही जलदुर्ग
अलिबाग
गोपाळगड
तारापूर
माहीम
मुरुड जंजिरा
वसई
विजयदुर्ग
सिंधुदुर्ग
सुवर्णदुर्ग

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग २

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग २
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)
यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे वाडा. हे तर असंख्य आहेत.
काही भुईकोट किल्ले
अचलपूरचा किल्ला
अमरावतीचा किल्ला
अहमदनगरचा किल्ला
अकोल्याचा किल्ला
इंदुरीचा किल्लाचाकणचा किल्ला
जवाहरचा किल्ला
शनिवारवाडा
सोलापूरचा किल्ला


दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १



दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १
महाराष्ट्र हा दुर्गांचा प्रदेश आहे . महाराष्ट्र गडकिल्ल्यांनी समृद्ध प्रदेश आहे .महाराष्ट्रामध्ये सातवाहन ,चालुक्य ,सेन्द्रेक ,वाकाटक ,गोंड,मराठे ,बहमनी ,इंग्रज ,पोर्तुगीज ,डच ,फ्रेंच आदींनी किल्ले बांधले .नेमका कोणता किल्ला कोणी बांधला हे काही अपवाद सोडल्यास सांगता येणेही कठीण आहे .या किल्ल्यांचा लष्करी दृष्टीने अतिशय उत्तम उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी केला .या किल्ल्याच्या सहायाने त्यांनी स्वतंत्य राज्याची स्थापना केली .किल्ले हे स्वतंत्र प्रेरकेची प्रतीके ठरली .आजही हे किल्ले आपल्याला ललामभूत आहेत .महाराष्ट्रामध्ये जलदुर्ग ,स्थलदुर्ग ,किनारदुर्ग ,गिरिदुर्ग ,वनदुर्ग प्रकारचे किल्ले असून गढ यांची संख्या लक्षणीय आहे .भूभागाच्या वीशित्थे प्रमाणे किल्ल्यांची बांधणी त्या त्या भागात झालेली दिसते. या किल्ल्यांचे हितगुज एकानासाठी त्याच्या यशोगाथा एकण्यासाठी या किल्ल्यांची "" दुर्गगाथा " आपल्याला निशित प्रेरणादायी ठरेल .किल्ल्यांचे नेमके स्थान ,उंची ,प्रकार ,तसेच त्यासाठी लागणारी साधने ,वेळ .श्रम ,यांची योग्य सांगड घातल्यास आपली दुर्गयात्रा निच्सित आनददायी ठरेल
चला मग आजपासून पाहू या दुर्गयात्रा महाराष्ट्राची
शिवभक्त विनोद जाधव