Followers

Thursday, 22 February 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ५


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ५
महाराष्ट्राचे वैभव – ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा (पुणे) --------२
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)

दि. ३० ऑगस्ट १७७३, वेळ दुपारची. अचानक सुमेरसिंह व महम्मद युसूफ ७००-८०० गारद्यांसह वाड्यावरील पहारेकऱ्यांची कत्तल करून वाड्यात शिरले. त्यांनी प्रचंड गोंगाट सुरू केला व थकलेल्या पगाराची मागणी केली. कसला गोंगाट सुरू आहे हे पाहण्यासाठी नारायणराव खोलीतून सज्जात आले, तर त्याला हातात नंग्या तलवारी घेतलेले गारदी माडी चढून त्यांच्याकडे येताना दिसले. तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते रघुनाथरावांच्या निवासस्थानाकडे पळाले. रघुनाथराव त्यावेळेस पूजेत मग्न होते. नारायणराव रघुनाथरावांच्या पायांना घट्ट मिठी मारून जीव वाचवण्याची विनंती करू लागले. काका मला वाचवाऽऽऽ या आर्त किंकाळ्या नारायणरावांच्या मुखातून निघू लागल्या. तितक्यात तुळाजी पवाराने नारायणरावांचे पाय ओढले. नारायणरावांच्या मागे असलेले सुमेरसिंह व इतर गारदी तिथे येऊन पोहोचले. त्यांनी नारायणरावांवर तलवारींचे सपासप वार करून त्यांचे अक्षरशः तुकडे केले. एवढा गोंधळ झाला होता की कोणाला काहीच कळेना. नारायणरावांच्या शरीराचे एवढे तुकडे झाले होते की ते पोत्यात भरूनच प्रेताचे दहन करावे लागले. हा चित्तथराराक प्रकार घडला तो इतिहासप्रसिद्ध पुण्यातील शनिवार वाड्यात. मराठ्यांच्या पेशव्याची अक्षरशः कपटाने कत्तल केली गेली होती.

No comments:

Post a Comment