Followers

Thursday, 22 February 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ८


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ८
महाराष्ट्राचे वैभव – ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा (पुणे) --------५
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)
१८०८, १८९२, १८१३ या वर्षी वाड्याला छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात. तर १७ नोव्हेंबर १८९७ ला वाड्यावरील पेशव्यांची सत्ता संपून वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. वाड्याच्या दिल्ली दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच आहे. देवडीच्या भिंतींवर शेषशायी विष्णू, गणपती या देवतांची चित्रे काढली आहेत. ती आता काळाच्या ओघात बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागामध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.
एक मुसलमान सरदार वाड्याबद्दल पत्रात लिहितो, ‘बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो मात्र आत स्वर्गासारखा दिसतो.’
इ.स. जून १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी गादीचा त्याग केला व पेशवाईची सूत्रे सर जॉन मॅलकम याच्या हाती सोपवून ते एक राजकीय कैदी म्हणून कानपूरजवळ बिठूर येथे राहण्यास गेले. वाड्यात काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेन्री डंडास रॉबर्ट्सन रहात होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्याकाळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली.

No comments:

Post a Comment