Followers

Saturday, 31 March 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 30 दौलतमंगळ



दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 30
दौलतमंगळ
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्याला तटबंदी आडवी येते. या तटबंदीने संपूर्ण मंदिराला वेढलेलं दिसून येतं. मंदिराच्या पाय-या चढताक्षणीच द्वारपाल जय-विजय, पायऱ्यांवरील हत्ती, सिंह आदी शिल्पे पाहण्यासारखी आहेत. हे सारं ओलांडून आत आलो की, समोर मुख्य मंदिर दिसते. या मंदिराचा खालचा भाग हा दगडांमध्ये तर वरचा भाग विटांमध्ये बांधलेला दिसून येतो. यावरून याची बांधणी व जीर्णोद्धार हा वेगवेगळ्या कालखंडात झाल्याची खात्री पटते. शिखरावरील चुन्याच्या बांधकामावर गणेश, विष्णू आदी देवतांची शिल्पे कोरलेली दिसून येतात. हे सारं पाहत आपण नगारखान्याच्या इमारतीत प्रवेश करतो. मूळ मंदिराच्या बाहेर असलेली ही इमारत नंतरच्या कालखंडात बांधलेली दिसून येते. यानंतर येते ते सभागृह. या सभागृहातूनच आपण सुबक अशा दरवाजातून पाय-या चढून मूळ मंदिरात प्रवेश करतो.
या मंदिरात प्रवेश करताक्षणीच लाजवाब, भारी, खूपच सुंदर..असे अलंकारीत शब्द बाहेर पडले नाही तरच नवल! एखादा हिरा जसा कोंदणात ठेवला जातो, तसेच काहीसे हे आतील मंदिर वाटते. मंदिराच्या सुरुवातीस नंदीचा मंडप लागतो. या मंडपात एकूण १२ खांब असून मधोमध नंदी आहे. या नंदीवरील कोरीव आभुषणांचे वर्णन करायचे झाले तर वेगळा लेख लिहावा लागेल. इतकं सुरेख आणि कोरीव काम कुठल्याही नंदीवर नसेल. नंदीमंडपानंतर अंतराळकक्ष आणि गर्भगृहाची बांधणी आहे. गर्भगृहात शंकराची सुरेख िपडी आहे. तिन्ही मंडपाभोवती कलाकुसरींनी नटलेल्या शिल्पांचा महोत्सवच भरल्यासारखे वाटते. मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण-महाभारतातील शिल्पपट कोरलेला दिसून येतो. या शिल्पकृतींमध्ये यक्ष, अप्सरा, वादक, नर्तकी तसेच देवदेवता, प्राणी यांची चित्रे दिसतात. मंदिराच्या छताच्या बाजूला कोरलेली घंटेची माळ तर केवळ लाजवाबच! ही नक्षी भान हरपायला लावते. कोणती शिल्पे पाहू आणि किती पाहू यात आपल्या मनाचा पुरता गोंधळ उडून जातो. या सा-या शिल्पांमध्ये एक शिल्प मात्र मनाचा ठाव घेते. ते म्हणजे गणेशाचं स्त्रीरूप! कोठेही सहसा न आढळणारं हे स्त्रीरूप मात्र आपल्याला कलेच्या नजरेनेच शोधावे लागते.
एखाद्या कलाकृतीकडून आपल्याला काय हवं असते तर समाधान, विरंगुळा, ऊर्जा, मनाला छेडणारी तार..हे सारं काही अनुभवायचं असेल तर भुलेश्वरच्या या मंदिराला अवश्य भेट द्या. एखादा धातू शोधायला जावे अन् अचानक हिराच सापडावा अशी काहीशी अवस्था भुलेश्वरचं हे अनुपम लावण्य पाहताना होत असते. कलेच्या सौंदर्यतेच्या मापदंडांचं परिमाण बदलणा-या अशा काही कलाकृती जेव्हा आपल्यासारख्यांच्या समोर येतात, तेव्हा आपसूकच या सौंदर्यतुषारात भिजण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. मानवी मनाला कलारसात भुलवून सोडणारं हे भुलेश्वराचं सौंदर्यदालन पाहणं म्हणजे आपल्या भटकंतीचा निव्वळ बोनस ठरावा.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग २९ दौलतमंगळ


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग २९
दौलतमंगळ
हा दौलतमंगळ अक्षरश: शेवटची घटका मोजत कसाबसा उभा आहे. या किल्ल्याच्या बाबतीत समाधानाची एकच गोष्ट म्हणजे या किल्ल्यात असलेलं एक प्राचीन आणि तितकंच सुंदर शिवमंदिर अजूनही तग धरून आहे. म्हणूनच या डोंगरावर अनेक शिवभक्त शंकराच्या पिंडीच्या दर्शनासाठी येत असतात, पण बहुतेकांना येथेच एक किल्ला होता असे म्हटले तरी पटणार नाही, इतकं भीषण वास्तव या किल्ल्याच्या बाबतीत इथं घडलंय.
ब-याचदा फिरायला जायचे कोठे, त्याचे अंतर किती अशा प्रश्नांचा गुंता सोडवता-सोडवता आपले भटकणे राहून जाते. आणि काहीच नाही यापेक्षा काहीतरी-कोठेतरी फिरूच म्हणून गजबजलेली ठिकाणे पाहिली जातात. म्हणूनच आपल्या इतिहासाचा जर अभ्यास आणि वाचन केले तर काही सुंदर नावे नक्कीच आपल्या समोर येतील. दौलतमंगळचा डोंगर हे याच पंक्तीत भर घालणारं नाव आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर यवतच्या अलीकडे उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. हा फाटा थेट माळशिरस नावाच्या गावात जातो. या गावात आलो की, एक डोंगर आपल्यासमोर ठाण मांडून उभा असतो. हा डोंगर जसजसा जवळ करू लागतो, तसतसं या डोंगराचा पडदा बाजूला होऊ लागतो. समोर येणारे बुरूज, दर्गा, तटबंदीचे अवशेष, पायरीमार्ग हे समोर येऊ लागतात. अन् मग आपल्या लक्षात येऊ लागते की, येथे फार पूर्वी एखादा किल्ला होता. खरंच आहे हे. हा डोंगर म्हणजेच पूर्वीचा दौलतमंगळ किल्ला! विजापूरचे सरदार मुरार जगदेव यांनी सन १६३४ मध्ये बांधल्याची नोंद मिळते. हा गड इतिहासात काही प्रसिद्ध पावला नाही किंवा यावर काही घडामोडीही घडल्या नाहीत. पण हा किल्ला आपल्या उदासीनतेचं आणि दुर्लक्षतेचं एक गंभीर उदाहरण आहे. कारण हा किल्ला आता पूर्णपणे नामशेष झाला आहे. याची खंत कोणालाच नाही. असो, याचे अवशेष पार करत आपण डोंगरावर आलो की मग भुलेश्वरचं मंदिर जणू काही एखादं लेणंच अंगावर घेऊन उभं असल्यासारखं वाटतं. दुरून दिसणारं हे मंदिर जसंजसं जवळ येऊ तसंतसं अधिकच खुलतंय असं वाटू लागतं.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग २८ दौलतमंगळ किल्ला

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग २८
दौलतमंगळ किल्ला
दौलतमंगळ किल्ला आज शेवटच्या घटका मोजतोय.पडझडीने जीर्णशीर्ण झालेल्या या किल्ल्याचं संवर्धन होणं अत्यंत गरजेचं आहे. पर्यटक म्हणून जाणा-या ट्रेकर्सना या किल्ल्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटतं. अशा सर्व किल्ल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
daulatmangal1गड-कोटांचे संवर्धन हा केवळ सामाजिक प्रश्न नसून तो जिव्हाळयाचाही बनला आहे. महाराष्ट्रातले नेमके गड-कोट किती? यापेक्षा त्यातले सुस्थितीत किती..? हे प्रश्न आपल्या स्वाभिमानी मनाला जास्त टोचतात. याला कारणच तसं आहे म्हणा! महाराष्ट्राच्या मातीला या गड-कोटांवरच्या इतिहासाचा नेहमीच अभिमान वाटत आलाय. परंतु आपल्या सर्वाच्या नाकत्रेपणामुळेच आणि दुर्लक्षितपणामुळेच एकेकाळी वैभवात नांदणारे गड-किल्ले आज उपेक्षितांचे जीवन जगत आहेत.
एकेकाळी मराठी सत्तेचा कारभार पाहणारे बहुतांशी किल्ले तर अगदी शेवटची घटका मोजत आहेत. यापैकी काही तर नामशेष झालेसुद्धा..! अस्तित्व संपलेल्या या किल्ल्यांना अक्षरश: कागदातूनच शोधावे लागणार आहे यात शंका नाही. असाच एक इतिहासकालीन पुण्याजवळील किल्ला पूर्णत: नामशेष झाला असून हा किल्ला आता केवळ डोंगर म्हणनूच उभा आहे. दौलतमंगळ असं याचं देखणं नाव!

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 27 सोनगिर किल्ला


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 27  सोनगिर किल्ला
प्रकार -
गिरिदुर्ग
उंची -
३०४ मी. समुद्रसपाटीपासून
जवळचे गाव -
सोनगीर
रांग -
मार्ग -
धुळे-सोनगीर
सोनगीर
ऐतिहासिक माहिती
मध्युगीन काळात प्रसिद्ध पावलेला सोनगिर किल्ला धुळे जिल्ह्यात असुन धुळ्यापासून २० कि.मी अंतरावर आहे. धुळ्याच्या उत्तरेला असलेल्या सोनगिर गावालगतच हा किल्ला आहे. मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक ३ हा सोनगिर जवळून जातो. सोनगिरला जाण्यासाठी धुळे येथून एस.टी च्या बसेस मिळतात. धुळे –शिरपूर तसेच धुळे-नरडाणा या बसेस येथे थांबतात. तसेच नंदूरबारकडे जाणाऱ्या बसेस ही एक कि.मी अलीकडे फाट्यावर थांबतात. येथून चालत जावूनही आपण सोनगिर गाठू शकतो. सोनगिर गावात विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराच्या दारामध्ये एक मोडकी तोफ पडलेली आहे. मंदिराच्या बाजीला ३० फुट उंचीचा बालाजीचा लाकडी रथ ही प्रेक्षणीय आहे. सोनगिर किल्य्याच्या पूर्व पायथ्याला घराची लाबंलचक रांग आहे. या घराच्या लांबलचक रांगेमधून पलीकडे जाण्यासाठी मधून मधून बोळ आहेत. गावातील या बोळांमधून पलीकडे जावून किल्ला चढवा लागतो. हा परिसर अत्यंत अस्वच्छ असल्यामुळे नाक मुठीत धरूनच चढाई सुरु करावी लागते. गडाच्या पायथ्यापासून एक मळलेली वाट आहे. आपण पंधरा मिनिटांमधे गडावर पोहोचतो. गडाचा दरवाजा कसाबसा तग धरून आहे. यावर कसलेही चिन्ह अथवा शिल्पांकन आढळत नाही. पूर्वी येथे एक शिलालेख होता. तो खाली पडलेला होता. सध्या तो धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेउन ठेवलेला आहे. २७ इंच लांब आणि ९ इंच रुंदीच्या या शिलालेखावर संस्कृत भाषेतील ओळी कोरलेल्या आहेत. दारातून आत गेल्यावर एक कबर आहे. येथून पंधरा वीस पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असून त्याची पूर्व पश्चिम रुंदी कमी आहे. इ.स. १८५४ मधे इंग्रजांनी केलेल्या नोंदी प्रमाणे गडावर फारच थोड्या वास्तू शिल्लक होत्या. आज त्याही नष्ट झालेल्या आहेत. गडावर तेलटाके, तुपटाके तसेच गोड्या पाण्याची विहीर, तटबंदी, पडलेल्या घरांचे अवशेष आढळतात. या गोड्या पाण्याच्या विहिरीतून पूर्वी गावाला पाणी पुरवठा केला जायचा. त्यासाठी पाणी काढायला वापरण्यात येणाऱ्या अंबाडीच्या दोरासाठी इ.स. १८०६ व इ.स. १८०७ मधे रु. साडेतीन खर्च झाल्याची नोंद आहे. इ.स. १३७० हिंदू राजवटीकडून हा किल्ला फारुखी सुलतानांनी जिंकला. पुढे तो अकबराने ताब्यात घेतला.पुढे तो इ.स. १८१८ मधे इंग्रजांच्या ताब्यात गेला. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोनगिर किल्ला आजमात्र उपेक्षित ठरलेला आहे.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 26 रायकोट

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 26
रायकोट
प्रकार -
गिरीदुर्ग
उंची -
५०० मी. समुद्रसपाटीपासूनजवळचे गाव -
रायकोट
रांग -
सह्याद्री रांग
मार्ग -
धुळे-साक्री-कोंढईबारी


ऐतिहासिक माहिती
रायकोटचा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असून हा सह्याद्रीतील सर्वांत उत्तरेकडील डोंगरी किल्ला आहे. धुळे ते सुरत या मार्गावर कोंडाईबारी नावाचा घाट या रांगेत आहे. या घाटमार्गाच्या उत्तरेकडे हा किल्ला असून घाटातील मोरकरंज गावातून माकडदरीमार्गे तसेच कोंडाईबारी गावातून रायकोटमार्गे किल्ल्यावर जाता येते. गडावर तुरळक प्रमाणात अवशेष शिल्लक असून गडावरून माकडदरीचे दृश्य उत्तम दिसते.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 25 लळिंग

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 25
लळिंग
प्रकार -
गिरिदुर्ग
उंची -७९३ मीटर समुद्रसपाटीपासून
जवळचे गाव -
लळिंग
रांग -
मार्ग -
धुळे-लळिंग


ऐतिहासिक माहिती
लळींगचा डोंगरी किल्ला हा आग्रा-मुंबई महामार्गावर धुळ्याजवळ आहे. महामार्गापासून जवळच लळींगगाव हे किल्ल्याच्या पायथ्याला आहे.किल्ल्याचा मार्ग पूर्वेकडून असून गडावरील बुरुज व तटबंदीचे अवशेष लक्ष वेधून घेतात. गडावर मंदिर असून पाणीही विपुल आहे. गडावर अनेक वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. गडावरून दूरपर्यंतचे दृश्य रमणीय दिसते. गडावरून आग्रा महामार्ग दिसतो. गाळणा किल्ला तसेच अजिंठ्याचे डोंगरही दिसतात.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 24 भामेर


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 24
भामेर
प्रकार -
गिरिदुर्ग
उंची -
७४५ मीटर समुद्रसपाटीपासून
जवळचे गाव -
भामेर
रांग -
मार्ग -
साक्री-भामेर
ऐतिहासिक माहिती
साक्रीगावाच्या उत्तरेला भामेर हा किल्ला आहे. भामेरला जाण्यास ठराविक वेळेसच गाडी आहे. साक्री-नंदुरबार मार्गावर दोंडाईचा फाट्यावर अथवा भामेर फाट्यावर उतरून चालत जाणे सोयीचे ठरते. भामेर फाट्यावरून भामेरचे डोंगर दिसतात. समोरचा डोंगर उजवीकडे ठेऊन वळसा मारल्यावर गडावर जाणारी वाट आहे. गडाच्या डोंगरात अनेक लेणी कोरलेली आहे. माथ्यावरून दक्षिणेकडील साल्हेर, सालोटा, रतनगड, तांबोळ्या, मांगी-तुंगी, इ.शिखरे चटकन ओळखू येतात.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 23 कण्हेरगड

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 23
कण्हेरगड
प्रकार -
गिरिदुर्ग
उंची -
६६०मी समुद्रसपाटीपासूनजवळचे गाव -
पाटणाखोरे
रांग -
मार्ग -
चाळीसगाव-पाटणाखोरे


ऐतिहासिक माहिती

अजिंठा-सातमाळ रांगेतील एका उत्रेकडे घुसलेल्या टोकावर क्न्हेर्गड आहे. कन्हेरगडाच्या पायथ्याला पाटणादेवी आहे. चाळीसगावावरून येथपर्यंत गाडीमार्ग आहे. राज्य परिवहनाच्या बसेस येतात. महादेव मंदिरापासून गडावर जाणारी पायवाट आहे. वाटेवर लेणी आहेत. शृंगारचौरी लेणी म्हणून यांस ओळखतात. गडाचा दरवाजा व भग्न तटबंदी आहे. माथ्यावर पानाची टाकी व इतर अवशेष आढळतात. गडावरून पितळखोऱ्याचे दृश्य चांगले दिसते, पेडका किल्ला दिसतो.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 22 लासूर


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 22
लासूर
प्रकार -
गढी
उंची -
जवळचे गाव -
लासूर
रांग -
मार्ग -
जळगाव-चोपडा-लासूर
ऐतिहासिक माहिती
लासूर हे जळगावच्या वायव्येला आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेला लासूर हे गाव वसलेले आहे. चाळीसगाव-अमळनेर-लासूर अथवा जळगाव-चोपडा-लासूर असे गाडीमार्ग आहेत. शिरपूरकडूनही हातेड मार्गे लासूरला येता येते. लासुरचा किल्ला हा टोके घराण्याकडे होता. इंग्रजांनी हा किल्ला पाडून टाकला. किल्ल्यामधील वाडाही मोडकळीला आला असून सध्या एका हिंदू कुटुंबीयांनी तो विकत घेतला आहे. वाड्याजवळ एक मोठा तलाव आहे. सर्वत्र वस्ती असल्याने अवशेषही शोधणे कठीण झाले आहे.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 21 पारोळा

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 21
पारोळा
प्रकार -
स्थलदुर्गउंची -
जवळचे गाव -
पारोळा
रांग -
मार्ग -
जळगाव-पारोळ


धुळे ते जळगाव यांच्यामध्ये पारोळा आहे. हे तालुक्याचे गाव मुंबई-नागपूर या राष्ट्रीय मार्गावर आहे. धुळे, अमळनेर, एरंडोल, भडगाव, धरणगाव या गावांशी गाडीमार्गाने पारोळा जोडलेले आहे. गावात भुईकोट किल्ला आहे. पारोळ्याचा किल्ला हा झाशीच्या राणीने बांधलेला किल्ला आहे असे म्हणतात, पण प्रत्यक्षात तसा काहीही संबंध नाही. पारोळा किल्ला १७२७ मध्ये जहागीरदार हरि सदाशिव दामोदर यांनी बांधल्याचा उल्लेख आहे. किल्ल्याभोवती खंदक असून तो बारमाही पाण्याने भरलेला असतो. तटबंदी, बुरुज, दरवाजे, वाड्याचे भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात.

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 20 रसलपूर

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 20
रसलपूर
प्रकार -
सराई

उंची -
जवळचे गाव -
रसलपूर
रांग -
मार्ग -
जळगाव-भुसावळ-रावेर-रसलपूर
ऐतिहासिक माहिती
जळगाव-बुऱ्हाणपूर मार्गावर रावेर हे तालुक्याचे गाव आहे. रावेरपासून ५ कि.मी. अंतरावर रसलपूर आहे. रसलपूरमध्ये सराई आहे. स्थानिक लोक या सराईला किल्ला म्हणतात. सराईला दोन दरवाजे आहेत. पैकी एक घरांमुळे बंद केलेला आहे. सराईच्या बाहेर खंदक आहे. खंदक दोन बाजूंना बऱ्यापैकी असून बाकी बुजलेला आहे. तटबंदीची उंची कमी असून कमी उंचीचेच बुरुज आहेत. तटबंदीच्या आतून लहान-लहान खोल्या असून सध्या यांच्यामध्ये बरीच कुटुंबे राहतात.