दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग २८
भाग २८
दौलतमंगळ किल्ला
दौलतमंगळ किल्ला आज शेवटच्या घटका मोजतोय.पडझडीने जीर्णशीर्ण झालेल्या या किल्ल्याचं संवर्धन होणं अत्यंत गरजेचं आहे. पर्यटक म्हणून जाणा-या ट्रेकर्सना या किल्ल्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटतं. अशा सर्व किल्ल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
daulatmangal1गड-कोटांचे संवर्धन हा केवळ सामाजिक प्रश्न नसून तो जिव्हाळयाचाही बनला आहे. महाराष्ट्रातले नेमके गड-कोट किती? यापेक्षा त्यातले सुस्थितीत किती..? हे प्रश्न आपल्या स्वाभिमानी मनाला जास्त टोचतात. याला कारणच तसं आहे म्हणा! महाराष्ट्राच्या मातीला या गड-कोटांवरच्या इतिहासाचा नेहमीच अभिमान वाटत आलाय. परंतु आपल्या सर्वाच्या नाकत्रेपणामुळेच आणि दुर्लक्षितपणामुळेच एकेकाळी वैभवात नांदणारे गड-किल्ले आज उपेक्षितांचे जीवन जगत आहेत.
एकेकाळी मराठी सत्तेचा कारभार पाहणारे बहुतांशी किल्ले तर अगदी शेवटची घटका मोजत आहेत. यापैकी काही तर नामशेष झालेसुद्धा..! अस्तित्व संपलेल्या या किल्ल्यांना अक्षरश: कागदातूनच शोधावे लागणार आहे यात शंका नाही. असाच एक इतिहासकालीन पुण्याजवळील किल्ला पूर्णत: नामशेष झाला असून हा किल्ला आता केवळ डोंगर म्हणनूच उभा आहे. दौलतमंगळ असं याचं देखणं नाव!
No comments:
Post a Comment