दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग २९
दौलतमंगळ
भाग २९
दौलतमंगळ
हा दौलतमंगळ अक्षरश: शेवटची घटका मोजत कसाबसा उभा आहे. या किल्ल्याच्या बाबतीत समाधानाची एकच गोष्ट म्हणजे या किल्ल्यात असलेलं एक प्राचीन आणि तितकंच सुंदर शिवमंदिर अजूनही तग धरून आहे. म्हणूनच या डोंगरावर अनेक शिवभक्त शंकराच्या पिंडीच्या दर्शनासाठी येत असतात, पण बहुतेकांना येथेच एक किल्ला होता असे म्हटले तरी पटणार नाही, इतकं भीषण वास्तव या किल्ल्याच्या बाबतीत इथं घडलंय.
ब-याचदा फिरायला जायचे कोठे, त्याचे अंतर किती अशा प्रश्नांचा गुंता सोडवता-सोडवता आपले भटकणे राहून जाते. आणि काहीच नाही यापेक्षा काहीतरी-कोठेतरी फिरूच म्हणून गजबजलेली ठिकाणे पाहिली जातात. म्हणूनच आपल्या इतिहासाचा जर अभ्यास आणि वाचन केले तर काही सुंदर नावे नक्कीच आपल्या समोर येतील. दौलतमंगळचा डोंगर हे याच पंक्तीत भर घालणारं नाव आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावर यवतच्या अलीकडे उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. हा फाटा थेट माळशिरस नावाच्या गावात जातो. या गावात आलो की, एक डोंगर आपल्यासमोर ठाण मांडून उभा असतो. हा डोंगर जसजसा जवळ करू लागतो, तसतसं या डोंगराचा पडदा बाजूला होऊ लागतो. समोर येणारे बुरूज, दर्गा, तटबंदीचे अवशेष, पायरीमार्ग हे समोर येऊ लागतात. अन् मग आपल्या लक्षात येऊ लागते की, येथे फार पूर्वी एखादा किल्ला होता. खरंच आहे हे. हा डोंगर म्हणजेच पूर्वीचा दौलतमंगळ किल्ला! विजापूरचे सरदार मुरार जगदेव यांनी सन १६३४ मध्ये बांधल्याची नोंद मिळते. हा गड इतिहासात काही प्रसिद्ध पावला नाही किंवा यावर काही घडामोडीही घडल्या नाहीत. पण हा किल्ला आपल्या उदासीनतेचं आणि दुर्लक्षतेचं एक गंभीर उदाहरण आहे. कारण हा किल्ला आता पूर्णपणे नामशेष झाला आहे. याची खंत कोणालाच नाही. असो, याचे अवशेष पार करत आपण डोंगरावर आलो की मग भुलेश्वरचं मंदिर जणू काही एखादं लेणंच अंगावर घेऊन उभं असल्यासारखं वाटतं. दुरून दिसणारं हे मंदिर जसंजसं जवळ येऊ तसंतसं अधिकच खुलतंय असं वाटू लागतं.
No comments:
Post a Comment