Followers

Saturday, 31 March 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 27 सोनगिर किल्ला


दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 27  सोनगिर किल्ला
प्रकार -
गिरिदुर्ग
उंची -
३०४ मी. समुद्रसपाटीपासून
जवळचे गाव -
सोनगीर
रांग -
मार्ग -
धुळे-सोनगीर
सोनगीर
ऐतिहासिक माहिती
मध्युगीन काळात प्रसिद्ध पावलेला सोनगिर किल्ला धुळे जिल्ह्यात असुन धुळ्यापासून २० कि.मी अंतरावर आहे. धुळ्याच्या उत्तरेला असलेल्या सोनगिर गावालगतच हा किल्ला आहे. मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक ३ हा सोनगिर जवळून जातो. सोनगिरला जाण्यासाठी धुळे येथून एस.टी च्या बसेस मिळतात. धुळे –शिरपूर तसेच धुळे-नरडाणा या बसेस येथे थांबतात. तसेच नंदूरबारकडे जाणाऱ्या बसेस ही एक कि.मी अलीकडे फाट्यावर थांबतात. येथून चालत जावूनही आपण सोनगिर गाठू शकतो. सोनगिर गावात विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराच्या दारामध्ये एक मोडकी तोफ पडलेली आहे. मंदिराच्या बाजीला ३० फुट उंचीचा बालाजीचा लाकडी रथ ही प्रेक्षणीय आहे. सोनगिर किल्य्याच्या पूर्व पायथ्याला घराची लाबंलचक रांग आहे. या घराच्या लांबलचक रांगेमधून पलीकडे जाण्यासाठी मधून मधून बोळ आहेत. गावातील या बोळांमधून पलीकडे जावून किल्ला चढवा लागतो. हा परिसर अत्यंत अस्वच्छ असल्यामुळे नाक मुठीत धरूनच चढाई सुरु करावी लागते. गडाच्या पायथ्यापासून एक मळलेली वाट आहे. आपण पंधरा मिनिटांमधे गडावर पोहोचतो. गडाचा दरवाजा कसाबसा तग धरून आहे. यावर कसलेही चिन्ह अथवा शिल्पांकन आढळत नाही. पूर्वी येथे एक शिलालेख होता. तो खाली पडलेला होता. सध्या तो धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेउन ठेवलेला आहे. २७ इंच लांब आणि ९ इंच रुंदीच्या या शिलालेखावर संस्कृत भाषेतील ओळी कोरलेल्या आहेत. दारातून आत गेल्यावर एक कबर आहे. येथून पंधरा वीस पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असून त्याची पूर्व पश्चिम रुंदी कमी आहे. इ.स. १८५४ मधे इंग्रजांनी केलेल्या नोंदी प्रमाणे गडावर फारच थोड्या वास्तू शिल्लक होत्या. आज त्याही नष्ट झालेल्या आहेत. गडावर तेलटाके, तुपटाके तसेच गोड्या पाण्याची विहीर, तटबंदी, पडलेल्या घरांचे अवशेष आढळतात. या गोड्या पाण्याच्या विहिरीतून पूर्वी गावाला पाणी पुरवठा केला जायचा. त्यासाठी पाणी काढायला वापरण्यात येणाऱ्या अंबाडीच्या दोरासाठी इ.स. १८०६ व इ.स. १८०७ मधे रु. साडेतीन खर्च झाल्याची नोंद आहे. इ.स. १३७० हिंदू राजवटीकडून हा किल्ला फारुखी सुलतानांनी जिंकला. पुढे तो अकबराने ताब्यात घेतला.पुढे तो इ.स. १८१८ मधे इंग्रजांच्या ताब्यात गेला. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोनगिर किल्ला आजमात्र उपेक्षित ठरलेला आहे.

No comments:

Post a Comment