शिरवळ जवळ इतिहासाच्या पानावर
स्वराज्यातील पहिल्या रणसंग्रामाचा साक्ष देणारा किल्ले “सुभानमंगळ”...
आजही सुभानमंगळ किल्ला मितीस त्याच्या शेवटच्या घटका मोजत आहे स्वराज्यातील पहिल्या युद्धाला खूप नजीक पाहणारा गढी वजा भुईकोट किल्ला...
महाराष्ट्राला किल्ल्यांची खान म्हटले जाते आपल्या देशात किल्ल्यांची संख्या खूप जास्त असली तरी बाकीच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात किल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे असाच एक किल्ला सुभानमंगळ जो ऐतिहासिक शहर शिरवळ परिसरात नीरा नदीच्या काठावर वसलेला पाहायला मिळतो परंतु त्या ठिकाणी किल्ल्याचा एक पडका बुरुज आणि बाजूला असलेले दुर्गा देवीचे मंदिर आणि मंदिराच्या बाहेर दोन वीरगळी एवढे सोडून तिथे काही अवशेष आज शिल्लक नाहीत किल्ल्याच्या उत्तर दिशेस किल्ले पुरंदर आणि वज्रगड हे दोन किल्ले आहेत...
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला सर केल्यावर आदिलशहाने आपला सरदार फ़तेहखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यास पाठवले त्यावेळी स्वराज्याचा आकार लहान होता स्वराज्यात शिरुन त्याची नासधुस करु नये म्हणुन शत्रूला आपल्या स्वराज्यात शिरु द्यायच नाही असा विचार करून महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करायचा निर्णय घेतला त्याप्रमाणे पुरंदर किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर हे युध्द क्षेत्र ठरवण्यात आल...
महाराज पुरंधरवर असल्याने फ़तेहखानाने पुरंदरच्या जवळ बेलसरला छावणी टाकली आणि बाळाजी हैबतरावांना शिरवळच्या किल्ला घेण्यासाठी पाठवले महाराजांचे सैन्य कमी होते त्यांना सैन्याची हानीही करायची नव्हती त्यामुळे त्यांनी विशेष प्रतिकार न करता किल्ला फ़तेखानाच्या स्वाधिन केला सुभानमंगळ सहजासहजी हाती आल्याने बाळाजी हैबतराव बेफ़िकीर राहीला दुसर्या दिवशी पहाटेच कावजी मल्हार खासनीस या सरदाराला महाराजांनी सुभानमंगळ घेण्यास पाठवले त्याने किल्ल्याचा तट फ़ोडुन किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफ़िल शत्रूवर हल्ला करुन किल्ला जिंकुन घेतला...
किल्ल्याबद्दल फारशी माहिती लोकांन्ना कदाचित माहीत नाही अशा अभिमानास्पद गोष्टींबद्दल किती अनभिज्ञ असतो हे कमालीचे आहे महाराष्ट्रात या गडकिल्ल्यांच्या वारस्याची जाण ठेऊन येथे संवर्धन करण्याची खूप गरज आहे...
माहीती :
Ganesh Shitole
.फोटोग्राफी : संतोष पांडे.
No comments:
Post a Comment