सुरवातीला शिवाजी महाराजांची ओळख ही आदिलशहा यांच्याकडे नोकरीला असलेल्या जहागीरदारचे एक सुपुत्र अशी होती. त्यातही वडील शहाजीराजांचे वास्तव्य दूर बंगळुरात होते. त्याकाळी आजुबाजूला अनेक बलाढ्य सत्ता होत्या. शिवाय त्यावेळी या सत्ता त्यांच्या अत्यंत्य वैभवाच्या शिखरावर होत्या. त्यांच्याकडे प्रचंड सैनिकी बळ होते, अनेक कसलेले सेनानी होते, योजना कुशल माहितगार लोक सेवेत होते. अत्यंत कपटनीती व व्यावहारिक मुत्सद्देगिरीसाठी प्रसिद्ध असलेले औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग असे अनुभवी व मातब्बर सेनानी रणधुरंधर लोके होते. या सत्ताधाऱ्यांकडे अफाट युद्ध साहित्य व संपत्ती सुद्धा होती. ह्या अश्या विघ्न परिस्थितीत महाराजांचा जन्म झाला. त्यातही त्या वेळी स्वराज्य स्थापना साठी स्वप्न बघणं म्हणजे एक विनोद होय. पण ह्या विनोदाला सार्थक करून दाखवण्याचा साहसी धाडस बाळ शिवाजी राजे व त्यांच्या मावळ्यांनी हाती घेतली. महाराजांचा एकही शत्रु सामान्य नव्हता. त्यात भर म्हणजे शिवाजी महाराजांच्या विरोधात अनेक स्वकीय मंडळी होती. यासर्वांपूढे महाराजांचे अस्तित्व अगदी छोटे होते पण आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर महाराजांनी या सत्तेला जागोजागी सुरुंग लावले आणि शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि आपलं स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन केलं. एवढेच नव्हे तर आपल्या प्रचंड धामधुमीच्या काळात मुलकी कारभार व सैनिकी व्यवस्था, नौसेना आरमार उभारले, स्वराज्यात शासकीय कामाची आदर्श कार्यपद्धत निर्माण केली, समाज व धर्म तसेच सांस्कृतिक कार्य मोठ्या प्रमाणावर केली. म्हणून महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते असेच आपल्याला म्हणता येईल.
No comments:
Post a Comment