छत्रपती शिवरायांच्या आरमाराचा बालेकिल्ला म्हणजे “हर्णे बंदर”....
कोकणच्या रत्नागिरी किनारपट्टीत दाभोळ व हर्णे ही दोन बंदरे महत्त्वाची मानली जातात ऐतिहासिक साक्षीदार असलेले हर्णे बंदर पूर्वी चालत असलेल्या मुंबई-हर्णे-दाभोळ या प्रवासी बोटीमुळे अनेकांचा मुंबईला जाण्याचा एकमेव मार्ग होता यामुळे या बंदराला पूर्वी महत्त्व होते...
हे गाव पूर्वी सुवर्णदुर्ग या नावाने ओळखले जायचे नावाप्रमाणे खरोखरच येथे सोन्याप्रमाणे मौल्यवान वस्तूंची आणि किमती साहित्याची लयलूट असायची हर्णे बंदरात चालणारा मत्स्य व्यवसायामुळे येथे रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असत मुख्यत्वे याच बंदरामुळे आज परिसरातील अर्थकारण व बाजारपेठ अवलंबून आहे तालुक्यात येणारे पर्यटक येथील बंदर, किल्ल्यांना भेटी देत असतात त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे...
मासळी, आंबापेटी आदींची वाहतूक प्रवासी बोटीतून मुंबईकडे केली जात असे हर्णे बंदर येथे खास तिकीटघरही होते दापोली, खेड, चिपळूण येथील प्रवासीही मुंबईकडे जाण्यासाठी येथे दाखल होत असत त्यामुळे येथे प्रवाशांना घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्याची वर्दळ असे हर्णे-मुंबई प्रवास अवघा ४-५ रुपयांत होत असे प्रवासी बोट मासेमारी करण्यासाठी हर्णे येथे रत्नागिरीहून येत असत एक-दोन सिलेंडरच्या सहाय्याने चालणाऱ्या बोटींची जागा १९८० च्या सुमारास येथील मच्छिमारांच्या यांत्रिक लाँचनी घेतली.. हर्णे मासळी व्यवसायाची मोठी आर्थिक उलाढाल करणारे बंदर म्हणून नावारूपास आले आहे याच बंदरात पूर्वी मालवाहतूक करणारी गलबतेही येत असत ही गलबते आली की नगाऱ्यांचा विशिष्ट प्रकारचा आवाज क रून त्याची माहिती दिली जात असे मंगलोरी कौलाची वाहतूक गलबतांमधून होत असे ही गलबते अगदी १९८० पर्यंत बंदरात येत होती पुढे दळवळणाचे मार्ग वाढल्यावर ही गलबते बंदरात येणे बंद झाले...
हर्णे बंदराजवळ पूर्वी फत्तेगड व जवळच असलेल्या पाजपंढरी गावात प्रामुख्याने कोळी समाजाची वसाहत होती हर्णे बंदरावर उभी असलेली ‘बत्ती’ ही मासेमारांना दिशादर्शकाचे काम करते आता ही वास्तू जुनी झाली असली तरी हर्णे बंदरातील बत्ती अशी ओळख आजही कायम टिकून आहे...
फोटोग्राफी : @saoorabh
No comments:
Post a Comment