रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमा वाघोटन नदीच्या तीरावर इतिहास प्रसिद्ध “#खारेपाटणचा_किल्ला”...
खारेपाटण हे इतिहास प्रसिद्ध गाव आहे वाघोटन नदीच्या दक्षिण तीरावर खारेपाटण वसलेले आहे इतिहासकाळात महत्त्वाचे स्थान मिळवलेले खारेपाटण हे पुर्वी देवगड तालुक्याचे मुख्यालय होते इ.स १८१८ ते इ.स १८७५ पर्यंत मुख्य ठिकाण असलेल्या खारेपाटणाला एक किल्ला होता...
खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे आहे मुंबई पणजी हा महामार्ग खारेपाटण जवळून जातो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमा वाघोटन नदीच्या तीरावर येवून मिळतात नदीच्या तीरावर असलेल्या लहानशा टेकडीवर किल्ल्याचे अवशेष आज आढळून येतात कालौघात दुर्लक्षीत झाल्यामुळे या किल्ल्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे, साधारण १८५० च्या सुमारास किल्ल्याचे तट व बुरुज पाडून त्याची दगडी काढण्यात आली ही घडवलेली दगडी वापरुन नदीच्या काठावर एक धक्का बांधण्यात आल्याची नोंद आहे हा धक्का उतारु लोकांना तीरावर उतरण्यासाठी बांधला होता सध्या तो ही निरुपयोगी ठरलेला आहे...
खारेपाटण ही चांगली बाजारपेठ आहे बाजारपेठेतूनच किल्ल्याकडे रस्ता जातो प्राचीन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गा जवळ वाघोटन खाडीत शिरत आणि तेथून खारेपाटण “बलिपत्तन” गावापर्यंत येत येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे अशा या प्राचीन बंदराचे राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला...
बालेकिल्ल्याच्या मार्गावर डावीकडे पाच एक फुट उंचीची तटबंदी शिल्लक राहिली आहे या आयताक ती माथ्याच्या चारही बाजुंना असलेल्या तटबंदीची अवस्था सध्या मातीच्या ढिगार्यात झालेली दिसते तीन कोपर्यावरचे तीन बुरुज कसेबसे उभे आहेत मध्यभागी मोठ्या झाडाखाली दुर्गामातेचे नव्याने जीर्णोद्धारीत मंदिर बांधलेले आहे शासकीय विश्रामगृहामधून पाण्याची सोय केल्यास येथे मुक्काम करता येवू शकतो...
८ व्या शतकात शिलाहार राजांचे दक्षिण कोकणात (तळकोकणात) राज्य होते शिलाहार राजा श्र्वम्मियराने इ.स ७८५ ते ८२० येथे किल्ला उभारून राजधानी बसविली...
इ.स १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटणा किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले..छत्रपती शिवाजी महाराजानंतर इतर सागरी आणि खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेले त्यानंतर तुळाजी आंग्रे यांच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे इंग्रज यांच्या संयुत्त्क फौजांनी किल्ल्यावर हल्ला करून तो जिंकून घेतला इ.स १८५० मध्ये मराठे आणि इंग्रज यांच्यात घनघोर युध्द झाले यात हा किल्ला उध्दवस्त झाला आणि इंग्रजांच्या ताब्यात गेला...
८ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत जवळजवळ हजार वर्षाच्या इतिहासाचा साक्षिदार असलेला किल्ला आहे...
No comments:
Post a Comment