ऐतिहासिक/ पौराणिक महत्व लाभलेला ब्रम्हगिरी आणि त्याचा जोडकिल्ला दुर्गभंडार
नाशिक
#नाशिक पासून २९ किलोमीटर अंतरावर #त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्राच्या पाठीमागे ब्रम्हगिरी/त्रंबकगड आहे.संत नामदेवांनी “दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपुरी” असा उल्लेख केलेला पौराणिक महत्व आणि आख्यायिका सांगणारा तसेच ऐतिहासिक द्रुष्टया महत्व लाभलेला हा किल्ला आहे.भगवान शिवाचे वास्तव्य लाभलेला तसेच अनेक संत, महर्षी, ऋषी याच्या तपश्चर्येने पावन झालेली हि तपोभूमी. ब्रम्हगिरी पर्वताच्या अनेक पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
पौराणिक महात्म्यापुढे ब्रम्हगिरीचे ऐतिहासिक महत्व झाकले जात आहे आहे. इतिहासात श्रीगड तसेच त्र्यंबकगड या नावाने ओळखले जात होते. त्र्यंबकगड नावाने ब्रम्हगिरीचे अनेक ऐतिहासिक उल्लेख आढळतात. याच त्र्यंबकगडाला एक उपदुर्ग देखील आहे ज्याला दुर्गभांडार असे म्हणतात. दुर्गभांडार हा तसा स्वतंत्र किल्ला नसून त्र्यंबकगडाचाच एक भाग आहे.
त्रंबकगड समुद्रसपाटी पासून ४२४८ फूट तर पायथ्यापासून अंदाजे १९०० फुट उंच आहे. याचा घेर १० मैल इतका मोठा असून किल्ल्याच्या जवळ जवळ सर्वच बाजुंनी ३०० ते ४०० फुट उंचीचा कातळकडा आहे. गावातील मंदिरापासून गंगाद्वारकडे जाणाऱ्या रस्त्याने १५ मिनिटे चालल्या नंतर आपण गंगाव्दाराकडे जाणार्या पायर्या जिथे सुरू होतात तेथे येऊन पोहोचतो. तिथून डावीकडेची पायऱ्यांची वाट चढत ब्रम्हगिरी किल्ल्यावर जानारी पायऱ्यांची वाट सुरु होते . अर्धा तास चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक ऐतिहासिक वास्तू आपली नजर तिकडे आकर्षित करते. हि दुमजली इमारत एक जुना वाडाच शोभावा अशी दिमाखदार व सुंदर आहे. नतद्रष्ट लोकांनी इतक्या सुंदर वास्तूची सगळीकडे नावे लिहून पार वाट लावली आहे. या इमारतीवर एका दगडी पाटीवरून हि १८१३ साली कोण्या व्यापाऱ्याने हि वास्तू धर्मशाळा म्हणून हिंदू लोकांस अर्पण केलेले समजते. हि धर्मशाळा दुमजली ईमारत असून हिला तीन कमानी असून कमानीच्या प्रत्येक खांबावर कोरीव शिल्प आहेत. दुसऱ्या मजल्याला नक्षीकाम केलेले खिडकीवजा झरोके देखील आहेत. या वास्तूच्या थोडे मागे एक दगडी बाव बांधलेली दिसते.ब्रम्हगिरीला जाणाऱ्या पायऱ्या या ऐतिहासिक वास्तू जवळूनच सुरु होतोत या पायऱ्या चढत असताना प्रथम उजवीकडे कातळात खोदलेली एक गुहा लागते आणि थोडे पुढे मारुतीरायाची एक दगडात कोरलेली भव्य मूर्ती. येथून पुढे खऱ्या अर्थाने दगडात कोरलेल्या पुरातन पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो. हा पायऱ्यांचा मार्ग म्हणजे चक्क दगडात कोरलेले जिनेच म्हणावे लागतील. कारण उजव्या बाजूला आहे किल्ल्याचा ताशीव कातळकडा तर डावीकडे आहे दगडाची कातळभिंत.
पायर्यांच्या अर्ध्यातासांची चडन झाल्या नंतर आपण पहील्या द्वारापर्यंत पोहचतो अगदी साध्या धाटनीचा हा दरवाजा ओळांडुन पुन्हा पायर्यांची पायपीट करुन हत्तीदरवाजा पर्यंत पोहोचतो.हत्तीदरवाजा वर मध्यभागी कमळाची तर कमानीवर घंटेची शिल्प या ऊभ्या कातलात कोरलेल्या महाव्दाराचं सौंदर्य खुलवतात.या द्वाराच्या दोन्ही बाजुंस बसलेल्या हत्तींची दोन शिल्पे आहेत पण काळाच्या ओघात ती नष्ट होतांना भासतायत.हत्ती द्वार ओलांडुन काही पायर्या चडुन ब्रम्हगीरीच्या पठारावर पोहचतो.पठारावर पोहोचताच लिंबुपाणी चहाची दुकानं स्वागताला येतात पहिल्याच दुकाना समोर दगडी झोपडी दिसते वण विभागाची लहानशी चौकी असावी ही या चौकीच्या जरा पुढे अण्यात विराची समाधी दुर्लक्षीत स्थितीत दिसेल आता त्या समाधिवर नंदी आणी शिवलिंग सिंमेटने चिपकलेला दिसेल या समाधीवरुन थोडं पुढे गेल्यावर आणखी एक समाधि दिसेल ही दुसरी समाधी पहील्या समाधी पेक्षा मोठ्या आकाराची आहे आणी तिथं ही सिमेंट,शिवलींग आणी नंदी चिपकलेला दिसेल..
ही समाधी ओलांडल्यावर ऊजवीकडे आणी डावीकडे पायवाटा लागतात ऊजव्या पायवाटेनं पुढे गेल्यास मोठा तलाव दिसतो.
डाव्या पायवाटेनं पुढे गेल्यास पुरातन वास्तुचे अवषेश दिसतात एक पुरातन चौकी वजा घर काळाच्या औघात बिना कौले आजुनही स्वाताचं अस्तीत्व टिकवण्यासाठी जाडजुड दगडी भिंती टिकवुन आहे.अश्या दोन वास्तु दिस्तील.या वास्तु पाहुन तलावाच्या कडेनं पुढं निघावं. अस्ताव्यस्त पसरलेल्य पाठावरुन दक्षीनेला पंचलिंग शिखरं मागे ऊत्तरे कडे त्रंबकेश्वर शहर,अंजनेरी,त्याच्या शेजारील नवरा नवरी सुलके दिसतात.
या पठारावर गोदावरी ऊगम स्थान, चक्रधर स्वामींचं महानुभव पंताचं मंदिर, आणी भगवान शिवाच्या जटास्थान/ जटामंदिराकडे वळावे.गौतम ऋषींनी गोहत्येचे पाप निर्वान व्हावे म्हणुन भगवान शंकराची तपश्चर्या केली या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकराने आपल्या जटा आपटून गंगेला या जटामंदिरात प्रकट केले अशी श्रद्धा आहे. . मंदिरा शेजारीच एक पाण्याचे टाके असून त्यातले पाणी पिण्यास योग्य आहे. हे मंदिर ब्रम्हगिरीच्या पश्चिमेकडे अगदी कड्यालगतच आहे. मंदिराबाहेर उभे राहिले असता समोर कापडा, ब्रम्हा, उतवड, फणी असे डोंगर तर हरिहर आणि बसगड हे किल्ले दिसतात.
जटामंदिराजवलच वाटेतच एका पिंपलाच्या झाडाखाली जमिनीत माती खचुन निर्मान झालेली भुयारासारखी घळ दिसते ही घळ म्हणजे लहानसा भुयारी मार्ग भासतोय जो थेट पठारावरुन खाली खोल दरीत ऊतरतो कोनीतरी मोठी दगडं टाकुन तो बंद केलेला भासतो.
या मंदीराकडुन पायवाट निघते ती थेट दुर्गभंडारकडे.आता पर्यंत ब्रम्हगीरी वर बिंन्धास्त, मोकाट फिरवणारी ही पायवाट 10 मिनीटांची पायपीट केल्यावर अतिशय दुर्गम आणी चित्तथरारक बनते ऊजवीकडे भलंमोठं कातल आणी डावीकडे आगदी अर्ध्या फुटावर भयंकर खोल दरी पुर्व ट्रेकचा अनुभव किंवा सराईत मार्गदर्शक नसेल तर दुर्गभंडार टाळावा कारण वाट प्रचलीत नाही तसेच बर्याच ठिकाणी निसरडी आहे पायाखाली सुकलेलं गवत ज्यावरुन पाय घसरण्याची भीती असते, डावीकडे खोल दरीकडे पाहुन भोवलं योण्याची भीती असते.ही वाट भल्याभल्या सराईत ट्रेकर्सचा कस काडनारी आणी मनोधौर्य तपासनारी आहे. या वाटेवर मस्ती करणे किंवा दुर्लक्ष करणे म्हणजे थेट मरनाला आमंत्रण समजावे.
15/ 20 मिनीटं जिव मुठीत धरुन पायपिट करुन झाल्यावर वाटेवर एक पाण्याचं टाकं लागते.टाक्याच्या पाण्यानं तहान भागवुन पुन्हा पाऊलवाट धरावी थोड्याचं वेळात समोर कातलकड्यांवर विसावलेला दुर्गभंडार दिसतो.मुख्य ब्रम्हगीरी पासुन रागाऊन जरासा दुरावलेला पण जन्मोजंमांतरीचं नातं एका 8 फुट रुंद कातळी पुलानं आबाधित ठेवलेला भासतो.ही वाट जिथे संपते तिथे ऊजव्या बाजुला कातलात कोरलेलं मारुतीचं शिल्प दिसतं त्या नंतर तुम्हाला जे दिसेल ते ऊभ्या अखंड कातळाला मधोमध कोरुन बनवलेल्या दिडफुटी पायर्या, या पायर्या तुमच्या या सफरनाम्याचं आकर्षन होय एक एक पायरी ऊतरतांना वर आकाशाकडे पाहील्यास भल्यामोठया कातळाच्या पोटातुन भुगर्भात शिरत असल्याचा भास नक्की करुन देतील या पायर्या.50 पायर्या ऊतरल्यावर दुर्गभंडारला जोडनार्या पुलावर पोहोचवणारा आख्या दगडात कोरलेला दरवाजा लागेल हा दरवाजा सध्यातरी खाली रांगुन ओळांडावा लागतो कारण अंदाजे 6 फुट असावा असा हा दरवाजा माती पडुन पडुन बुजलेला आहे. दरवाज्या बाहेर पडताच समोर दुर्गभंडार पायाखाळी 8 फुटी कातळी पुल डावीकडे खोल दरी आणी डोळ्यांच्या टप्प्यात येनारा हरिहरगड,ऊजवीकडे खोल दरी डोल्यांसमोर त्रंबकेश्वर नगर, समोर खाली दुर्गभंडाराच्या कातळाच्या मधोमध गंगाद्वार व गोरखनाथ,गहनीनाथांची गुहा, आणी माथ्यावर मोकळं आकाश.कातळी पुळ जरा सावधानतेने पार करुन दुर्गभंडारच्या द्वारात पोहोचता,ईथेही तीच परिस्थीती दिसते हे मुख्यद्वार अंदाजे 4/5 फुट उंच असावे पण मातीत गडगल्यामुळे अवघे 2 फुट ऊरले आहे या द्वारातुन रेंगाळुन किल्ल्यात प्रवेश होतो तो पुन्हा ऊभ्या कातळात कोरलेल्या पायर्यांनी या वेळी या पायर्यांनी भुगर्भातुन आकाशाकडे प्रवास अनुभवता येतो.मुक्त मोकाट वार्याशी गप्पा मारता मारता 20मिनीटात किल्ला फिरुन होतो किल्ल्यावर 2 कोरिव पाण्याची टाकी आहेत त्यातील पाणी पिण्याजोगं आहे.पाण्याच्या टाक्यांच्या वर प्रचंड वाडलेल्या गवत झुडुपातुन जुन्यावाड्याचे अवशेस डोकावतात. थोडं पुढं गेल्यावर मनाचा थरकाप ऊडवनारा अविष्कार दिसतो तो म्हणजे टकमकटोक.टकमकटोकावर ऊभं राहुन डोकावनं सेल्फि काढनं म्हनजे पुन्हा म्रुत्युला कवटाळन्या सारखंच आहे पण तेच टोकाच्या दगडी कडेवरुन सावधानतेने झोपुन खालच्या दरीची विदारकता डोळ्यांत साठवता येते.
टकमकटोका नंतर परतीची वाट धरावी. परतताना ब्रम्हगीरीच्या पायर्या ओलांडुन पाण्याच्या टाक्याच्या वरुन एक पाऊलवाट निघते ही वाट तुमचा परतीचा प्रवास आर्धा तास कमी करते पण ही वाट शक्यतो टाळावी कारण ही वाट पहील्या वाटे पेक्षा बिकट आणी निसरडी आहे प्रत्येक पाऊल जपुन आणी संयमानं टाकावं लागतं तुमची जराशी चुक तुमचं आयुष्य संपवु शकते...
असा हा दुर्गभंडार चा सफरनामा जिगरीचा,अल्हाददायक,तुमच्या हिमतीचा कस काढनारा,तुम्हाला ईतिहासाच्या सान्निध्यात घेऊन जानारा,चांगलीच दमछाक करनारा पण अखंड स्मृती साठवता येन्या सारखा हा ट्रेक आहे.
छायाचित्र - श्री खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
8390008370
खूप छान
ReplyDelete