Followers

Monday 22 June 2020

किल्ले जंजिरा उर्फ दंडाराजपुरी.

किल्ले जंजिरा उर्फ दंडाराजपुरी.

#दंडाराजपुरी_दुर्ग.
दंडाराजपुरी येथील किल्ला ज्याला आपण जंजिरा नावाने आता ओळखतो तेथे गेले असता त्याची अजिंक्यता तेथील लोक आपणास ऐकवतात. पाण्यातील पाश्चिमात्य दैत्यांचा अभ्यास केल्यावर जंजिरा अजिंक्य का ठरला ह्याचे उत्तर आपणांस मिळते. तसेच शिवकाळातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या व छत्रपती संभाजी महाराजांच्या जंजिऱ्यावरील मोहिमांचा अभ्यास केल्यावर त्यांना माघार का घ्यावी लागली ह्या प्रश्नांची उत्तरे जंजिऱ्यावरील घटनावळींमध्ये आपल्याला आढळतात.
दर्यामध्ये ताठ उभा असलेला जंजिरा दर्याकिनाऱ्यावरील मराठ्यांपुढे कितीतरी वेळा झुकला आहे ते इतिहासाची पाने चाळल्याशिवाय समजणे मुश्किल.
जंजिऱ्याचे आरमार,त्याची बांधणी,त्यावरील युद्धसामुग्री ई. गोष्टी रणांगणात शौर्य गाजविणाऱ्या मराठ्यांमध्ये बरेच अंतर राखून होत्या. शिवकाळात कोकणी माणसाची आपल्या वतनाची आसक्ती आणि उत्तर काळामध्ये धर्मसहिष्णूता ह्यामुळे जंजिरा पाण्यामध्येच अजिंक्य राहिला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

आभार : अतुल अनंत मोरे.

- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment