Followers

Saturday, 30 January 2021

छत्रपती शिवरायांच्या आरमाराचा बालेकिल्ला म्हणजे “हर्णे बंदर”..


 छत्रपती शिवरायांच्या आरमाराचा बालेकिल्ला म्हणजे “हर्णे बंदर”....🚩

कोकणच्या रत्नागिरी किनारपट्टीत दाभोळ व हर्णे ही दोन बंदरे महत्त्वाची मानली जातात ऐतिहासिक साक्षीदार असलेले हर्णे बंदर पूर्वी चालत असलेल्या मुंबई-हर्णे-दाभोळ या प्रवासी बोटीमुळे अनेकांचा मुंबईला जाण्याचा एकमेव मार्ग होता यामुळे या बंदराला पूर्वी महत्त्व होते...
हे गाव पूर्वी सुवर्णदुर्ग या नावाने ओळखले जायचे नावाप्रमाणे खरोखरच येथे सोन्याप्रमाणे मौल्यवान वस्तूंची आणि किमती साहित्याची लयलूट असायची हर्णे बंदरात चालणारा मत्स्य व्यवसायामुळे येथे रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असत मुख्यत्वे याच बंदरामुळे आज परिसरातील अर्थकारण व बाजारपेठ अवलंबून आहे तालुक्यात येणारे पर्यटक येथील बंदर, किल्ल्यांना भेटी देत असतात त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे...
मासळी, आंबापेटी आदींची वाहतूक प्रवासी बोटीतून मुंबईकडे केली जात असे हर्णे बंदर येथे खास तिकीटघरही होते दापोली, खेड, चिपळूण येथील प्रवासीही मुंबईकडे जाण्यासाठी येथे दाखल होत असत त्यामुळे येथे प्रवाशांना घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्याची वर्दळ असे हर्णे-मुंबई प्रवास अवघा ४-५ रुपयांत होत असे प्रवासी बोट मासेमारी करण्यासाठी हर्णे येथे रत्नागिरीहून येत असत एक-दोन सिलेंडरच्या सहाय्याने चालणाऱ्या बोटींची जागा १९८० च्या सुमारास येथील मच्छिमारांच्या यांत्रिक लाँचनी घेतली.. हर्णे मासळी व्यवसायाची मोठी आर्थिक उलाढाल करणारे बंदर म्हणून नावारूपास आले आहे याच बंदरात पूर्वी मालवाहतूक करणारी गलबतेही येत असत ही गलबते आली की नगाऱ्यांचा विशिष्ट प्रकारचा आवाज क रून त्याची माहिती दिली जात असे मंगलोरी कौलाची वाहतूक गलबतांमधून होत असे ही गलबते अगदी १९८० पर्यंत बंदरात येत होती पुढे दळवळणाचे मार्ग वाढल्यावर ही गलबते बंदरात येणे बंद झाले...
हर्णे बंदराजवळ पूर्वी फत्तेगड व जवळच असलेल्या पाजपंढरी गावात प्रामुख्याने कोळी समाजाची वसाहत होती हर्णे बंदरावर उभी असलेली ‘बत्ती’ ही मासेमारांना दिशादर्शकाचे काम करते आता ही वास्तू जुनी झाली असली तरी हर्णे बंदरातील बत्ती अशी ओळख आजही कायम टिकून आहे...
➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : @saoorabh ♥️

बुलडाणा जिल्ह्यातला “किल्ला मैलगड”

 






बुलडाणा जिल्ह्यातला “किल्ला मैलगड”...🚩

दऱ्या, खोऱ्या, निसर्ग वेलींनी नटलेला बुलडाणा जिल्हा प्राचीन मुर्त्या, किल्ले व ऐतिहासिक वास्तूंची खाण आहे.. ओंकारचा आकार असलेल्या अजिंठा पर्वतरांगांमधील डोंगरांनी बुलडाणाच्या नैसर्गिक सौदर्यात भर घातली आहे खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराने बुलडाण्याला जगात प्रसिद्धी मिळवून दिली तर संपूर्ण देशाचे स्फूर्तीस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान सिंदखेड राजाने या जिल्ह्याला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिले...
१६ व्या शतकात हा किल्ला हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या तावडीतून निसटून वेशांतर करून रायगडावर जाताना ते बऱ्हाणपूरवरुन मैलगडावर आले होते येथे ते वास्तव्यास राहणार होते औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडून देणाऱ्याला मोठे बक्षिस जाहीर केले होते त्यावेळी किल्लेदार असलेल्या गोसावीला शिवाजी महाराज मैलगडावर मुक्कामास आले असल्याचे समजले त्याने बक्षिसाच्या लालसेपोटी औरगंजेबाला ही माहिती देण्याचे ठरविले त्याचा सैनिकांशी केलेला हा वार्तालाप त्याच्या सुनेने ऐकला व तिने गडावर असलेल्या प्रवाशां मध्ये जावून शिवाजी महाराजांना ही माहिती दिली त्यामुळे शिवाजी महाराज तत्काळ येथून निघून गेले...
इ.स १८०१ च्या सुमारास वऱ्हाडात गाजीखान नावाच्या व्यक्तीने सैन्य जमवून लुटालूट चालविली होती.. त्यामुळे द्वितीय रघुजी भोसले यांनी यशवंतराव भवानी शंकर काळू याच्या अधिपत्याखाली पाच हजार सैन्य देवून पाठविले गाजीखान हा मैलगड किल्ल्यात बसला होता.. काळू यांनी या किल्ल्यावर तोफांनी मारा सुरु केला किल्ल्यावर सैनिकांच्या हल्ल्यानंतर गाजीखानला पराभवाचे लक्षण दिसताच तो लष्करी साहित्य सोडून पळून गेला...
➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : unknown

क्रांतिवीर संगोळी रायन्ना...

 

६ जानेवारी १८३१

क्रांतिवीर संगोळी रायन्ना...
पोस्टसांभार :: 'सचिन पोखरकर'
क्रांतिवीर संगोळी रायन्ना या स्वातंत्र्य योद्ध्याचा जन्मदिवस १५ ऑगस्ट पुढे जाऊन भारताचा स्वातंत्र्यदिवस ठरावा आणि प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या वीराला ज्या दिवशी फाशी देण्यात आली तो दिवस २६ जानेवारी पुढे जाऊन भारताचा प्रजासत्ताक दिन ठरावा यासारखा एकमेव्द्वितीय योगायोग म्हणजे जणू भारत-भारतीने आपल्या वीरपुत्रास देलेली हि आदरांजलीच म्हणावी लागेल...
क्रांतिवीर संगोळी रायन्ना कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती ब्रिटीशांविरोधात सलग-सतत सहा वर्षे लढून, त्यांना 'सळो की पळो' करून सोडणारे आणि वेळोवेळी संकटात आणणारे एक महान क्रांतिकारक तलवारीच्या टोकावर इंग्रजांना आव्हान देणारा योद्धा स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन, फासावर जाणारे स्वातंत्र्यवीर मरण समोर असताना देखील पुन्हा जन्म घेऊन इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करणारे भारतमातेचे सच्चे वीरपुत्र याच व्यक्तिमत्वा बद्दल घेतलेला हा आढावा...
संगोळी रायन्ना यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी संगोळी या गावी झाला लहानपणा पासुनच मर्दांनी खेळांची आवड असल्याने अल्पावधीतच ते कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती बनले वारसा हक्काच्या वादामुळे कित्तूरची राणी चन्नमा आणि इंग्रज यांच्यात युद्धास सुरवात झाली स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले हेच ते कित्तुरचे युद्ध या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः लढल्या तर संगोळळी रायन्ना यांनीही पराक्रमाची शर्त केली परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्मा यांना बेल्लोन्गालच्या किल्ल्यावर पकडण्यात आले मात्र संगोळी रायन्ना यांनी गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली...
२६ जानेवारी १८३१ रोजी नंदगड येथे त्यांना फाशी देण्यात आली जेव्हा संगोळी रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते...
➖➖➖➖➖➖➖➖➖

वेध इतिहासाचा. घोरपडे घाट. पुणे.

संतोष चंदने































वेध इतिहासाचा.
घोरपडे घाट. पुणे.
शिवकाळापूर्वी पासून मुठा या नदीकाठी भांबुर्डा या नावाने वसाहत होती.
या नदीकाठी हा घाट व वृध्देश्वर मंदिर होते.
पेशवेकाळात या घाटावर त्रंबकेश्वराच मंदिर असल्याचा इतिहास अभ्यासकांच मत आहे.
मंदिर देखभालीसाठी दौलतराव घोरपडे यांना काही जागा इनाम होती.
या घाटाचे अवशेष पाहतांना येथे शिवमंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. त्यावरून मंदिराची कल्पना करू शकतो.
घाटाच्या परिसरात या मंदिराचा जोता, विटकाम ,शिल्पकाम व गोमुख पाहायला मिळत.
#घोरपडे घाट. पुणे.
पुनवडीतील ऐतिहासिक वारसां बद्ल सांगायच म्हंटल तर मंदिर, समाधी, वाडे या बद्ल सांगता येथील . पण पुण्यातील एक असा वारसा असा आहे की तो आपले पाय पाण्यात घट्ट रोवून उभा देतोय इतिहासाची साक्ष.
हा वारसा आहे मुठा नदीतीरावरी ऐतिहासिक घोरपडे घाट.
जितका सुंदर पण तेवढाच दुर्लक्षित हा घाट.
पुणे महानगरपालिका समोर नदीपात्रात हा घाट पाहायला मिळतो.
हा घाट दक्षिणतीरावर असून या घाटाला चार बुरुज आहेत.
टप्याने नदीपात्रात उतरणा-या पाय-या व बुरुजांना जोडणा-या भिंतीमध्ये दोन्ही बाजूला खोल्या आहेत तर भिंतीवर देवड्या ही दिसतात.
दगडी बांधणीच्या या घाटाचे काम रेखीव व प्रमाणबध्द आहे.
मोघलांना धडकी भरवणारे सेनापती संताजी घोरपडे यांच्या घराण्यातील दौलतराव घोरपडे यांनी हा घाट मुळा नदीकाठी बांधला.
पानशेतच्या प्रलयात नदीकाठच्या आनेक वास्तुंचे नुकसान झाले. याचा फटका या घोरपडेघाटाला ही बसला.
या घाटाची ऐतिहासिक वारसा म्हणून महानगरपालिकेत नोंद असलीतरी या घाटा कडे दुर्लक्षितपणे पाहीले जातय.
हा वारसा आसल्याने हेरिटेज सेल ने या कडे लक्ष देऊन याची पुर्नबांधणी करुन याचे संर्वधन केल पाहीजे.
मुठा नदीकाठचा एकमेव शिल्लक असलेल्या या घाटाचे सतत येणा-या पुरा मुळे याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड
पुणे.
संतोष मुरलीधर चंदने.
चिंचवड