संतोष चंदने
घोरपडे घाट. पुणे.
शिवकाळापूर्वी पासून मुठा या नदीकाठी भांबुर्डा या नावाने वसाहत होती.
या नदीकाठी हा घाट व वृध्देश्वर मंदिर होते.
पेशवेकाळात या घाटावर त्रंबकेश्वराच मंदिर असल्याचा इतिहास अभ्यासकांच मत आहे.
मंदिर देखभालीसाठी दौलतराव घोरपडे यांना काही जागा इनाम होती.
या घाटाचे अवशेष पाहतांना येथे शिवमंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. त्यावरून मंदिराची कल्पना करू शकतो.
घाटाच्या परिसरात या मंदिराचा जोता, विटकाम ,शिल्पकाम व गोमुख पाहायला मिळत.
#घोरपडे घाट. पुणे.
पुनवडीतील
ऐतिहासिक वारसां बद्ल सांगायच म्हंटल तर मंदिर, समाधी, वाडे या बद्ल
सांगता येथील . पण पुण्यातील एक असा वारसा असा आहे की तो आपले पाय पाण्यात
घट्ट रोवून उभा देतोय इतिहासाची साक्ष.
हा वारसा आहे मुठा नदीतीरावरी ऐतिहासिक घोरपडे घाट.
जितका सुंदर पण तेवढाच दुर्लक्षित हा घाट.
पुणे महानगरपालिका समोर नदीपात्रात हा घाट पाहायला मिळतो.
हा घाट दक्षिणतीरावर असून या घाटाला चार बुरुज आहेत.
टप्याने नदीपात्रात उतरणा-या पाय-या व बुरुजांना जोडणा-या भिंतीमध्ये दोन्ही बाजूला खोल्या आहेत तर भिंतीवर देवड्या ही दिसतात.
दगडी बांधणीच्या या घाटाचे काम रेखीव व प्रमाणबध्द आहे.
मोघलांना धडकी भरवणारे सेनापती संताजी घोरपडे यांच्या घराण्यातील दौलतराव घोरपडे यांनी हा घाट मुळा नदीकाठी बांधला.
पानशेतच्या प्रलयात नदीकाठच्या आनेक वास्तुंचे नुकसान झाले. याचा फटका या घोरपडेघाटाला ही बसला.
या घाटाची ऐतिहासिक वारसा म्हणून महानगरपालिकेत नोंद असलीतरी या घाटा कडे दुर्लक्षितपणे पाहीले जातय.
हा वारसा आसल्याने हेरिटेज सेल ने या कडे लक्ष देऊन याची पुर्नबांधणी करुन याचे संर्वधन केल पाहीजे.
मुठा नदीकाठचा एकमेव शिल्लक असलेल्या या घाटाचे सतत येणा-या पुरा मुळे याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड
पुणे.
संतोष मुरलीधर चंदने.
चिंचवड
No comments:
Post a Comment