Followers

Saturday 30 January 2021

आडम किल्ला

 

आडम म्हटले कि आपल्याला आठवतो तो आंग्ल संस्कृतीतील प्रथम पुरुष. आपल्या महाराष्ट्रात देखील आडम नावाचा असाच एक प्रथम पुरुष आहे पण हा पुरुष मानव नसुन गडपुरुष आहे. महाराष्ट्रातील आजवर ज्ञात असलेल्या सर्व किल्ल्यामधील सर्वात प्राचीन किल्ला म्हणजे

आडम किल्ला. नागपुरजवळ असलेला हा किल्ला इ.स.पुर्व ५ वे शतक ते इ.स.पुर्व २ ऱ्या शतकाच्या दरम्यान बांधला गेला होता. आडमचा किल्ला नागपुरपासुन ५० कि.मी.अंतरावर तर कुही या तालुक्याच्या ठिकाणापासुन १० कि.मी. अंतरावर आहे. आडमला जाण्यासाठी नागपुर-महालगाव-वाडोदा-कुही-आडम असा एक गाडीमार्ग असुन नागपुर- व्हीरगाव– दावलीमेट- कुही- आडम असा दुसरा गाडीमार्ग आहे. दोन्ही मार्गांनी हे अंतर ५० कि.मी असुन या भागात वाहनांची फारशी सोय नसल्याने खाजगी वाहन वापरणे जास्त सोयीचे आहे. आडम किल्ला गावाबाहेर पुर्व बाजुला असुन आजचे किल्ल्याचे स्वरूप म्हणजे मातीचा ढिगारा असलेली तटबंदी आहे. गावाबाहेर पडल्यावर समोरच एक तलाव असुन या तलावाच्या मागील बाजुस आडम किल्ल्याचे अवशेष आहेत. https://durgbharari.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4.../

No comments:

Post a Comment