Followers

Saturday 30 January 2021

बुलडाणा जिल्ह्यातला “किल्ला मैलगड”

 






बुलडाणा जिल्ह्यातला “किल्ला मैलगड”...🚩

दऱ्या, खोऱ्या, निसर्ग वेलींनी नटलेला बुलडाणा जिल्हा प्राचीन मुर्त्या, किल्ले व ऐतिहासिक वास्तूंची खाण आहे.. ओंकारचा आकार असलेल्या अजिंठा पर्वतरांगांमधील डोंगरांनी बुलडाणाच्या नैसर्गिक सौदर्यात भर घातली आहे खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराने बुलडाण्याला जगात प्रसिद्धी मिळवून दिली तर संपूर्ण देशाचे स्फूर्तीस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान सिंदखेड राजाने या जिल्ह्याला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिले...
१६ व्या शतकात हा किल्ला हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या तावडीतून निसटून वेशांतर करून रायगडावर जाताना ते बऱ्हाणपूरवरुन मैलगडावर आले होते येथे ते वास्तव्यास राहणार होते औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडून देणाऱ्याला मोठे बक्षिस जाहीर केले होते त्यावेळी किल्लेदार असलेल्या गोसावीला शिवाजी महाराज मैलगडावर मुक्कामास आले असल्याचे समजले त्याने बक्षिसाच्या लालसेपोटी औरगंजेबाला ही माहिती देण्याचे ठरविले त्याचा सैनिकांशी केलेला हा वार्तालाप त्याच्या सुनेने ऐकला व तिने गडावर असलेल्या प्रवाशां मध्ये जावून शिवाजी महाराजांना ही माहिती दिली त्यामुळे शिवाजी महाराज तत्काळ येथून निघून गेले...
इ.स १८०१ च्या सुमारास वऱ्हाडात गाजीखान नावाच्या व्यक्तीने सैन्य जमवून लुटालूट चालविली होती.. त्यामुळे द्वितीय रघुजी भोसले यांनी यशवंतराव भवानी शंकर काळू याच्या अधिपत्याखाली पाच हजार सैन्य देवून पाठविले गाजीखान हा मैलगड किल्ल्यात बसला होता.. काळू यांनी या किल्ल्यावर तोफांनी मारा सुरु केला किल्ल्यावर सैनिकांच्या हल्ल्यानंतर गाजीखानला पराभवाचे लक्षण दिसताच तो लष्करी साहित्य सोडून पळून गेला...
➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : unknown

No comments:

Post a Comment