Followers

Saturday 30 January 2021

क्रांतिवीर संगोळी रायन्ना...

 

६ जानेवारी १८३१

क्रांतिवीर संगोळी रायन्ना...
पोस्टसांभार :: 'सचिन पोखरकर'
क्रांतिवीर संगोळी रायन्ना या स्वातंत्र्य योद्ध्याचा जन्मदिवस १५ ऑगस्ट पुढे जाऊन भारताचा स्वातंत्र्यदिवस ठरावा आणि प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या वीराला ज्या दिवशी फाशी देण्यात आली तो दिवस २६ जानेवारी पुढे जाऊन भारताचा प्रजासत्ताक दिन ठरावा यासारखा एकमेव्द्वितीय योगायोग म्हणजे जणू भारत-भारतीने आपल्या वीरपुत्रास देलेली हि आदरांजलीच म्हणावी लागेल...
क्रांतिवीर संगोळी रायन्ना कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती ब्रिटीशांविरोधात सलग-सतत सहा वर्षे लढून, त्यांना 'सळो की पळो' करून सोडणारे आणि वेळोवेळी संकटात आणणारे एक महान क्रांतिकारक तलवारीच्या टोकावर इंग्रजांना आव्हान देणारा योद्धा स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन, फासावर जाणारे स्वातंत्र्यवीर मरण समोर असताना देखील पुन्हा जन्म घेऊन इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करणारे भारतमातेचे सच्चे वीरपुत्र याच व्यक्तिमत्वा बद्दल घेतलेला हा आढावा...
संगोळी रायन्ना यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी संगोळी या गावी झाला लहानपणा पासुनच मर्दांनी खेळांची आवड असल्याने अल्पावधीतच ते कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती बनले वारसा हक्काच्या वादामुळे कित्तूरची राणी चन्नमा आणि इंग्रज यांच्यात युद्धास सुरवात झाली स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले हेच ते कित्तुरचे युद्ध या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः लढल्या तर संगोळळी रायन्ना यांनीही पराक्रमाची शर्त केली परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्मा यांना बेल्लोन्गालच्या किल्ल्यावर पकडण्यात आले मात्र संगोळी रायन्ना यांनी गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली...
२६ जानेवारी १८३१ रोजी नंदगड येथे त्यांना फाशी देण्यात आली जेव्हा संगोळी रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते...
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment