Followers

Tuesday 26 January 2021

भिवगड किल्ला, नागपूर

 










भिवगड किल्ला, नागपूर
भिवगड किल्ला हा भिवसेन कुआरा म्हणून ओळखल्या जातो. दुर्गम भागातील भिवगड हा नागपूर जिल्ह्यामधील पारशिवनी तालुक्यामध्ये आहे. पारशिवनी तालुका नागपूरच्या उत्तरेला आहे. या तालुक्याच्या उत्तर भागामध्ये घनदाट जंगल आहे. या जंगलामधून पेंच नदी वाहते. पेंच नदीवर बांधलेल्या धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे हा परिसर दुर्गम आणि निसर्गरम्य झाला आहे. या फुगवट्याच्या काठावर असलेलया उंच टेकडीवर भिवगड हा किल्ला आहे. भिम गडापेक्षा भिवसेन कुआरा म्हणून त्या भागात जास्त प्रसिद्ध आहे.
मंदिराच्या जवळ अर्धा किलोमीटर अंतरावर भिवगड किल्ला आहे. याच्या छोट्याशा माथ्यावर जाण्यासाठी दोन्हीकडून मार्ग आहेत. किल्ल्याच्या पूर्वबाजूला पाण्याचा वेढा आहे तर पश्चिम बाजूला जंगलाचा वेढा आहे.
पाण्यामध्ये एका महालाचे अवशेष दिसतात. नावेमधून तेथे जाता येते. पावसाळ्यात त्याचा पहिला मजला पाण्याखाली असतो. पाणी कमी झाल्यावर चालतही तेथपर्यंत जाता येते. या महालाला दोन मजले आहेत. खालच्या मजल्यामध्ये तीन खोल्या असून त्यांची प्रवेशद्वारे अगदी लहान आहेत. एका खोलीतून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे. वरच्या मजल्यावरुन धरणाचा परिसर आणि किल्ला न्याहाळता येतो. या वास्तुला स्थानिक लोक राणीचा महाल म्हणतात.
महालाकडून भिवगडाच्या डोंगराकडे जाता येते. इकडून साधारण दोनशे मीटरची चढाई आहे.भिवगडाची गडाची तटबंदी रचीव दगडांची आहे. त्यातच एक खिडकीवजा दरवाजातून आपण गडात प्रवेश करतो. गडाच्या दक्षिण भागात रचिव दगडांची तटबंदी बांधलेली असून त्याला रचीव दगडांचा बुरुजही आहे. प्रवेशद्वार मात्र नष्ट झालेले आहे. गडावरील पाण्याची टाकी मात्र बुजलेली आहे.
- विदर्भ दर्शन

No comments:

Post a Comment