-----------------------------------------------------------------
जुन्नर परिसराचा दोन हजार दोनशे वर्षापूर्वी चा इतिहास भक्कम पुराव्यानिशी अभ्यासकाना लिहायचा असेल तर तो सातवाहन काळापासूनच लिहावा लागतो. सातवाहन साम्राज्यांनी जुन्नर ला भारतीय राजकारणाच्या नकाशावर मानाच प्रख्यात स्थान मिळून दिले. सातवाहन कालीन राजांनी राजकीय स्थिरता,उत्तम प्रशासन, धार्मिक सहिष्णुता तसेच जुन्नर नाणेघाट मार्गाने समुद्र बंदरातून पाश्चिमात्य देशाच्या व्यापारास चालना दिली.
कल्याण, सोपासोपारा तसेच पश्चिम दिशेच्या समुद्र बंदरातून पाश्चिमात्य देशातून माल आयात - निर्यात केला जात असे. सातवाहन काळात जुन्नरच्या बाजारपेठेतून विविध प्रकारचे कापड, हस्तीदंती वस्तू, मसाले, पाळीव प्राणी, मोती, औषधे अशा वस्तू निर्यात केल्या जात तर काचसामान, मंद्य, मद्यंकुंभ, सोने, चांदी, नक्षीदार भांडी अशा वस्तू नाणेघाट मार्गाने जुन्नरच्या बाजारपेठ मध्ये आयात केले जात होत्या.
व्यापार, उद्योग व्यवसायामुळे सातवाहन काळात जुन्नर परिसरात नागरी करणाला चालना मिळाली होती. सातवाहन काळात लेण्याद्री जवळील सध्याचे गोळेगांव ( गवळी वाडा ) ,अगर, खालचा माळीवाडा, कुसूर, निरगुडे, सुसरबाग, उदापुर अशा प्रकारची बरीच लोकवस्ती स्थळाची गावे होती. जुन्नर ,पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर ही सातवाहन कालीन कलेची प्रमुख केंद्र होती. बांगड्या, ताईत - पँन्डल, मणी, कर्णभूषणे, असे विविध अंलकार बनवण्याची कला परिसरातील लोकांना सातवाहन काळात अवगत होती.
सातवाहन राजांनी साहित्य, कला, स्थापत्य यात भरभरुन योगदान जुन्नर परिसराला दिल्याचे दिसून येते. याच काळात जुन्नर परिसराचा मोठा विकास व विस्तार झाल्याचे त्यांच्या शिल्लक राहिलेल्या लोकसंस्कृती अवशेषावरुन दिसून येते.जुन्नर ,पैठण, नाशिक, कर्हाड, तेर, भोकरदन हि प्रख्यात नगरे सातवाहन सम्राज्याच्या व्यापारी मार्गाने ऐकमेकाना नाणेघाट व्यापारी बाजारपेठ मुळे जोडली गेली होती. त्याकाळी हा एक महत्त्वाचा व्यापारी घाट मार्ग म्हणून ओळखला जात असायचा अंतर्गत व परदेशी व्यापार मोठ्या प्रमाणात जुन्नर मधून चालत होता.त्यावेळी जुन्नर परिसरात लेण्या, चैत्यगृह, विहार या माध्यमातून स्थापत्य कलेचा मोठा विकास झालेला होता.
--- बापुजी ताम्हाणे, जुन्नर (जिल्हा - पुणे ) महाराष्ट्र
मों. नं. 9730862068
No comments:
Post a Comment