-----------------------------------------------------------
जुन्नर हे शहर सातवाहन काळापासून ऐक महत्त्वाचे प्रमुख व्यापारी बाजारपेठ चे शहर म्हणून ओळखले जाते. सातवाहन काळात तसेच मध्ययुगीन काळात जुन्नरचा नाणेघाट मार्गे कल्याणला व्यापारी माल जात असे.
ब्रिटिश काळात कल्याण कडे जाणारा मार्गे हा जुन्नर ते कल्याण महत्त्वाचा म्हणून ओळखला जात असत. जुन्नर शहरातील कल्याण पेठमधील जुन्नरचे उपनगराध्यक्ष अँडव्होकेट राजेंद्र बुट्टे पाटील यांच्या निवासस्थाना जवळच ऐक " जुना ऐतिहासीक मैलाचा दगड" रस्त्याच्या कडेला उभा आहे. त्या वैशिष्ट्यपूर्ण दगडावर एका वर्तुळाकार निळ्या तैलरंगाने स्पष्ट दिसेल अशा इंग्लिश 56 अंकात तर ५६ मराठी ,देवनागरी अंकात आकडे दिसतात.
वैशिष्ट्यपूर्ण हा दगड तळाशी जरा रुंद तर वरच्या बाजूला निमुळता होत गेलेल्या सारखा दिसतो. दगडाच्या उभ्या दुसऱ्या बाजूला वर्तुळामध्ये असणारे इंग्लिश मध्ये 1 आणि मराठी, देवनागरी अंकात १ असे आकडे आपल्याला दिसून येतात. या आकड्यांशिवाय कोणतेही आकडे किंवा अक्षरे तसेच खुणा ह्या दगडावर दिसून येत नाहीत. जुन्नर ते कल्याण हे अंतर इंग्लिश मध्ये 56 तर मराठी, देवनागरी अंकात ५६ मैल असे दाखविणाऱ्या रस्त्यावरील हा पहिला अंतरदर्शक दगड म्हणून ओळखला जातो. १ हा अंक रस्ता मार्गे दर्शविणारा असावा. अशाच प्रकारचे "मैलाचे दगड" जुन्नर जवळील पाडळी रस्त्यावर तसेच नाणेघाट, माणिकडोह जवळ आहेत. काही मैलाचे दगड रात्रीच्या वेळी प्रवास करताना दिसावे ,त्यावरील मैलाचे अक दिसावे यासाठी अकाच्या बाजूने ऐक लहान कोनाडा कोरलेला दिसतो. त्यात रात्रीच्या वेळी दिवा पेटता ठेवत असत. कारण किती मैल प्रवास करायचा,अगर केला हे समजावे म्हणून ति सोय केलेली असावी.
---- बापुजी ताम्हाणे, गोळेगांव - लेण्याद्री ( जुन्नर )
ता. जुन्नर, जि. पुणे ( महाराष्ट्र )
No comments:
Post a Comment