मराठा " धोप" तलवार एक सर्वोत्कृष्ट हत्यार.....
------------------------------------------------------------
शिवकालापूर्वी ज्या तलवारी वापरत त्याला उघडी मुठ असायची ती शिवाजी महाराजांनी मूठ बंद करुन घेतली एखाद्या तलवारीचा वार घसरुन खाली हातावर आला तरी हात सुरक्षित रहावा यासाठी मुठीला आवरण लावलं. त्यांच बरोबर तलवार जी थोडी जाड होती ती पातळ करुन एक फुटापर्यंत आणखी लांब शिवाजी महाराजांनी केली. पाते लांब केले परंतु वजन वाढणार नाही यांची काळजी ही घेतली आणि शत्रूच्या मोठ्यात - मोठ्या घावणे तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था महाराजांनी करुन घेतली.
त्यासाठी तलवारीला मधून पन्हळ ठेवली .त्याचा प्रभाव इतका दिसून आला की हे हत्यार सर्व पायदळासाठी उपलब्ध व्हावे अशी गरज त्या वेळच्या मावळ्यांनी व्यक्त केली. अशा तलवारी ला मराठा तलवार म्हणून ओळखले जाऊ लागले. शिवाजी महाराजांनी ही मराठा तलवार लांब केल्याने त्याचे टोकाकडील वजन यांचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्या सारखे वाटे त्याला पर्याय म्हणून अशा प्रकारच्या तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली. ऐक प्रसंगी तलवारीच्या मुठी मागील हा गजही शत्रुच्या डोक्यात खिळ्याप्रमाणे ठोकला जाई. ही तलवार चालवून हाताला घाम येईल तो घाम हाताच्या मुठी पर्यत जाऊन मूठ सैल होईल आणि तलवार हातातून गळून पडेल अशी शक्यता होती तेव्हा पकड एकदम मजबूत रहावी म्हणून मुठीला आतून गादीचा अस्तर लावून घेतले म्हणून मराठे सात तास सलग हत्यार चालवू शकले. अशा ह्या धोप तलवारी चा खुप वैशिष्ट्यपूर्ण माहिती अजून मोठी आहे. ह्या धोप तलवारी निर्मिती बद्दल खुप मोठा इतिहास आहे.
-- बापुजी ताम्हाणे, लेण्याद्री - गोळेगांव ( जुन्नर )
मों. नं. 9730862068
No comments:
Post a Comment