Followers

Saturday 19 December 2020

१९ डिसेंबर १७४० रेवदंडा किल्ला.


 १९ डिसेंबर १७४० रेवदंडा किल्ला....🚩

चौल म्हणजे चंपावती चंपक म्हणजे चाफ्याची भरपुर झाडे असणारे ठिकाण रेवदंडा म्हणजे प्राचीन रेवती क्षेत्र रेवती हि भगवान श्रीकृश्नाचा भाऊ बलराम याची पत्नी श्रीकृष्णाने हे क्षेत्र तिला आंदण दिले म्हनुन या क्षेत्राला नाव पडले रेवतीक्षेत्र.. सहाव्या शतकात मौर्यांच्या राजवटीत चौल व रेवदंडा ही बंदरे म्हणुन भर-भराटिला आली याच ठिकाणाहून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे...
निजामशाही च्या काळात रेवदंडा हे चौल चाच भाग होता पुढे पोर्तुगीज कप्तान सोज याने या गावाचे महत्त्व ओळखून १५५८ मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली १६३६ मध्ये स्वराज्यसंकल्पक शहाजीराजांनी आपण आदिलशहा आणि मोगला विरुद्ध निजामशाही वाचविण्यासाठी लढत आहोत तेंव्हा आपले कुटुंब किल्ल्यात ठेवण्यास परवानगी द्यावी व वेळप्रसंगी आपण स्वतः ही किल्ल्याच्या आश्रयासाठी येवू असे कॅप्टनला पत्र पाठवले पण मोगलांच्या भीतीने पोर्तुगीजांनी परवानगी दिली नाही...
संभाजीराज्यांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी ६००० पायदळ व २००० घोडदळासह रेवदंडा किल्ल्यास वेढा घातला होता।पोर्तुगीजांनी चानाक्ष पणे रेवदंडा किल्ल्याचा वेढा उठवावा म्हणुन फोंडा किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा संभाजी महाराजांनी वेढ्याची सूत्रे निळोपंताना देउन फोंडा किल्ल्याच्या मदतीला धावले अखेर मराठ्यांना हा वेढा उठावावा लागला १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगीज यांच्यात उत्तर कोकणात लढाइस सुरुवात झाली या वेळी पोर्तुगीजांची सारी ठाणि जिंकुन घ्यायचीच अशा इर्षेपोटी मराठे पेटून उठले होते मराठ्यांना वसईचा बलाढ्य किल्ला जिंकला पण रेवदंडा काही त्यांना जिंकता आला नाही शेवटी २५ नोव्हेंबर १७४० रोजी एका तहानुसार पोर्तुगिजांनी कुकळली व आसाळणे या साष्टीतिल गावांच्या बदल्यात मराठ्यांना रेवदंडा किल्ल्यांचा ताबा दिला १९ डिसेंबर रोजी चिमणाजी बल्लाळ प्रधान यानी रेवदंडा किल्ल्यावर भगवे निशाण चढवले १८०६ मधे याचा ताबा इंग्रजांकडे १८१७ मधे आंग्रेकडे १८१८ मधे परत इंग्रजांकडे याचा ताबा गेला पण पनवेल भागातील माणिकगडांच्या बदल्यात तो परत आंग्रेकडे आला नंतर आंग्रे संस्थान खालसा झाल्यावर तो ताबा कायमचा इंग्रजांकडे राहिला...
➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : गोपाल निकुंभ...♥️

No comments:

Post a Comment