Followers

Saturday, 5 December 2020

श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान

 












श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान

🦁
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या आग्नेय टोकावर वसलेले हे तीर्थक्षेत्र इंदापूर या तालुक्याच्या शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी या गावच्या पश्चिमेकडील भुईकोट लिल्ल्याचा तट डावीकडे सोडून टेंभूर्णी अकलूज या उत्तर-दक्षिण मार्गावर संगम स्थानक दहा किलोमीटर अंतरावर आहे.
संगम स्थानकावरुन नदीकाठाने येताना नीरा नदीचे भव्य पात्र व त्याचे अलीकडील उंच कडे रौद्र स्वरुपाने आपले लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर पलीकडील तीरावरील किल्याप्रमाणे तटबंदी असलेले नृसिंह मंदिर, मंदिराचे उत्तुंग शिखर आणि मंदिरालगतचा नीरा नदीवरील विस्तीर्ण घाट यावर आपली नजर खिळून राहाते. एखाद्या चित्रकलावंतास रस्त्यावर थांबून या लोभस दृश्यास रंगबद्ध करण्याच्या मोह झाल्याशिवाय राहणार नाही.
बावडा मार्गाने आल्यास अतुंद वेशीतून आत प्रवेश करताच उजव्या हातास प्रसिद्ध विंचूरकर वाड्याची भिंत आहे. वाड्यासमोर येताच पूर्वेकडे शंभर-दिडशे पावलांवर नृसिंहमंदिराचा पुण्याच्या शनिवारवाड्याच्या दरवाज्याची याद आणून देणारा पश्चिम दरवाजा डोळ्यांत भरतो आणि मंदिराची ऐतिहासिक बांधणूक व वास्तू मनात ठसते. दरवाज्याच्या दोन्ही बाजुचे बुलंद बुरुज आणि त्या लगतचा नदीपात्रापासून नव्वद फूट उंचीचा चिरेबंदी तट अभेद्य किल्ल्यासारखा वाटतो. दरवाज्याच्या वरील दर्शनबाजूचा नगारखानाही शनवारवाड्याच्या धर्तीचा आहे.
नीरा-नृसिंहपूर हे पृथ्वीचे नाभिस्थान आहे हे एक भूवैज्ञानिक सत्य आहे. पद्मपुराणांतर्गत नृसिंहपूर महात्याचे त खालील श्र्लोक आढळतो.
सुदर्शनमित्या्भिहितं क्षेत्रं यद् वेदविव्द्रेः
तन्नाशभिरेषभूगर्भे क्षेत्रराजो विराजते ।
याचा अन्वय
यद् क्षेत्रं वेदविव्दारैः सुदर्शनं इति अभिहितं तत्
एषः क्षेत्रराज: भूगर्भे नाभिः विराजते ।
आणि याचा अर्थ असा, वेदज्ञजन ज्याचे वर्णन सुदर्शनीय क्षेत्र असे करतात ते हे (नीरा-नृसिंहपूर) क्षेत्रराज असून ते पृथ्वीच्या नाभिस्थानी विराजमान झालेले आहे. सुदर्शनीय म्हणजे नयनरम्य व दर्शन घेण्यास सुयोग्य असेही. नीरा-नृसिंहपूर हे पृथ्वीचे नाभिस्थान आहे हे एक भूवैज्ञानिक सत्य आहे.
नीरा-नृसिंहपूरपासुन सुमारे दहा मैलांवर, भीमेच्या काठावरच, भिवरवांगी नावाचे गांव आहे. त्या गावची पाहणी भारत सरकारच्या भूशास्त्रज्ञाच्या तुकडीने केली. त्या विशेषज्ञांनी, भिवरवांगी हा पृथ्वीचा केंद्रबिंदु आहे असा शास्त्रीय निष्कर्ष प्रकट केला. बिंदूत अस्तित्वञ मात्र असते. नाभीस अस्तित्व असून रुंदीही असते. भिवरवांगी व नरसिंहपूर ही ती रुंदी होय.
नीरा-नरसिंहपूर येथे कसे याल?
बस सेवा
पुणे येथून सोलापूर जाणाऱ्या बसने टेभुर्णी येथे उतरावे. टेंभुर्णी येथून अकलूज जाणाऱ्या बसने संगम चौक येथे उतरावे. तेथून रिक्षाद्वारे नीरा-नरसिंहपूर येथे यावे. पुणे ते नरसिंहपूर अंतर १८५ किमी आहे.
पुणे-इंदापूर- टेंभुर्णी- संगम-नीरा नरसिंहपूर
पंढरपूर अकलूज मार्गाने येताना अकलूजहून टेंभुर्णी जाणाऱ्या बसने संगम येथे उतरावे. तेथून रिक्षाद्वारे नीरा-नरसिंहपूर येथे यावे.
पंढरपूर-अकलूज- संगम-नीरा नरसिंहपूर
रेल्वे सेवा
पुणे स्टेशन येथून सोलापूरला जाणाऱ्या रेल्वेने कुर्डूवाडी जंक्शन येथे उतरावे. कुर्डूवाडी ते टेंभुर्णी बसने प्रवास करावा. टेंभुर्णी येथून अकलूज जाणाऱ्या बसने संगम चौक येथे उतरावे. तेथून रिक्षाद्वारे नीरा-नरसिंहपूर येथे यावे.
पुणे-कुर्डूवाडी- टेंभुर्णी- संगम-नीरा नरसिंहपूर
an Avatar of Vishnu, located in western India, in Pune district INDAPUR

No comments:

Post a Comment