Followers

Sunday, 27 December 2020

अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर -

 













अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर -

भारतातील भुमीज शैलीतील अत्यंत प्राचिन अशा मंदिरांपैकी एक मंदीर म्हणजे अंबरनाथचे प्राचिन शिवमंदिर.
सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे.
शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ.स.१०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. 1868 मध्ये एका ब्रिटिश सर्वेक्षण अधिकाऱ्यास हा शिलालेख दृष्टीस पडला. त्यानंतर लगेचच त्या शिलालेखाचा ठसा घेऊन विविध शास्त्रज्ञांनी त्याचं वाचन केलं आणि 'Bombay branch of the Royal Asiatic Society'च्या जर्नलमध्ये त्यातील मजकूर प्रसिध्द झाला.
उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. हे मंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते.
शिल्प शास्त्रप्रमाणो अंबरनाथचे शिवमंदिर हे सप्तांग भूमीज पध्दतीत मोडते. या मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. एकावर एक असे सात भूमी(शिल्प रांगा) रचण्यात आले होते. मात्र कालांतराने गाभा:यावरील शिखर नष्ट झाल्यामुळे तीनच भूमी (शिल्प रांगा) शिल्लक आहेत. नष्ट झालेल्या भूमीचे अवशेष मंदिराच्या परिसरात सापडतात. या मंदिराचा गाभारा 13 -13 फूट चौरस आहे. या मंदिराच्या बाहेरील शिल्पांवर देवतांचे शिल्प कोरण्यात आले आहे. या मंदिरावर गरुडासन विष्णू, त्रिपुरावध मुर्ती, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची शोडशवर्षीय (सोळा वर्षाची)पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, लिंडोद्मव मुर्ती, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, मरकडेय कथेची मुर्ती, गणोश नृत्य मुर्ती, नृसिंह अवताराची मुर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे. मात्र त्यातील अनेक मुर्ती आज भग्ण अवस्थेत आहेत. काहींची झीज झाली आहेत. त्यांची देखरेख करण्याची गरज आहे. त्यांची योग्य निगा पुरातत्व खात्याने केल्यास हे मंदिर भावी पिडीसाठीही अभ्यासाचा विषय ठरेल.
या शिवमंदिराचा कोणताही ट्रस्ट स्थापन न झाल्याने आजही या मंदिरावर येथील मूळ पाटील परिवाराचे वर्चस्व आहे. मंदिराची देखभाल आणि पूजाही त्यांच्याकडेच आहे.

No comments:

Post a Comment