Followers

Sunday, 27 December 2020

कुलदैवत किंवा कुलदेवी -

 


कुलदैवत किंवा कुलदेवी -

कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय?
आपले कुलदैवत कोठे आहे?
त्याचे महत्व काय?
कुलदैवतासंबंधी आपल काय कर्तव्य आहे?
हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. विभक्त्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उध्दभवली की धावपळ सुरु होते.
प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तु, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.
कुलदैवत म्हणजे आपल्या घराण्याचे रक्षण व पालनपोषण करणारे दैवत. एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुष अथवा स्त्री ज्याप्रमाणे, त्या घरातील व्यक्तींचे रक्षण, पालनपोषण करतात , प्रत्येकाच्या अडीअडचणी , दुखलंखुपलं इकडे लक्ष पुरवतात. त्याचप्रमाणे कुलदेव (कुलस्वामी) व कुलदेवता (कुलस्वामिनी) हे त्या घराण्याचे रक्षण व पालन पोषण करतात व तसेच समृद्धी व सौख्यवृद्धी देतात.
त्या त्या विशिष्ट कुटुंबांमध्ये, ज्याची नित्य आराधना, पूजा केली जाते, ते त्या कुटुंबाच्या कुळाचे कुळदैवत किंवा कुलदैवत समजले जाते. विवाह वा मुंज अशा महत्त्वाच्या प्रसंगी होणाऱ्या कुळाचाराच्या वेळी, वा सणावारी किंवा दैनंदिन करावयाच्या पूजेच्या वेळी, प्रत्येक वेळेस 'कुळदेवतेची' पूजा करण्याची परंपरा आहे. 'कुळदैवत' हे,'देव' वा 'देवी' यांपैकी काहीही असू शकते. बहुतेककरून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे 'कुलदैवत' असते. माहूर, व त्याचे आसपासच्या सुमारे १००-१५० किलोमीटर परिसरातील राहणाऱ्या लोकांचे 'कुलदैवत' माहूरची रेणुका, कोल्हापूर परिसरात राहणाऱ्यांचे अंबा[जोतिबा]तर दक्षिणेकडून येथे आलेल्यांचे बालाजी हे कुलदैवत असू शकते. 'कुळदैवत' हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. शिवाजी महाराजांची कुळदेवता तुळजापूरची भवानी होती हे तर सर्वश्रुतच आहे.
कुलदेवता या शब्दाचा अर्थ !
‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुष देवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्री देवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.
कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व
ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.
कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?
मूळ स्वरुपातील दैवते : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया
विष्णूची अवतार रुपातील दैवते : नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम
शंकराची अवतार रुपातील दैवते : कालभैरव, खंडोबा, मारुती
आदिमायेची अवतार रुपातील दैवते : सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली
शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती, तसेच आरंभ पूजनाची देवता – गणेश
देवांचा सेनापती : कार्तिकेय (दक्षिण भारतात याला महत्त्व आहे. अय्यप्पा म्हणतात)
वैदिक देवता : इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा (यातील सूर्य व अग्नी वगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही )
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

No comments:

Post a Comment