हत्तीगढी( भूईकोट किल्ला) ११ वे शतक
#इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावात ,
एक ऐतिहासिक वास्तू स्वताच्या उदरात प्रचंड मोठा इतिहास घेउन उभि आहे.
तो इतिहास प्रचंड समृद्ध व संपन्न व ताकत वर होता ,
पन तो उपेक्षित राहिला आहे. इतका मोठा वैभवशाली इतिहास आपल्या पुर्वजांचा व आपल्या तालुक्यातील आहे .
पण त्याला लाभलेले ग्रहण पाहून प्रचंड मनाला वेदना होतात, तो वैभवशाली इतिहास मांडणार आहे.
अथुर्णे गावात हत्तीगढी विषयी विचारता ;
सगळे जण हत्तीवाडा त्याला म्हणतात, पण त्या विषयी विचारता तो धापटे पाटलांचा वाडा आहे अस बोलतात .
कुणी काही बोलत ,
कुणी म्हणतात फार जुना इतिहास आहे पण आठवत नाही,
पण या वाड्यातुन एक भुयारी मार्ग आहे, तो एका बारवे पाशि निघतो,
या वाड्यातिल महिला भुयारातुन पाणी आणत एवढे मोठे भुयार होते ;
याला खंदक होते,मोठी तटबंदि होती अशा आठवणी सांगितल्या जातात .
परंतु थोडा तर्क लावून या #हत्तीगढि कडे पाहिले असता उपेक्षित वास्तू वर प्रकाश पडतो . हत्तीगढी हा भूईकोट किल्ला या भागातील एक महत्त्वाचा किल्ला ,
त्याला चारि बाजूने खंद्क होते. तसेच, या गढीतुन संकट काळी बाहेर पड्न्यास भुयारी मार्ग होते,तटबंदि प्रचंड मोठी होति,
अजून जुने लोक सांगतात कि त्यावरून बैलगाडी फिरेल एवढा आकार होता,
तसेच प्रचंड मोठे हत्ति जाण्यासाठी दरवाजे होते.
त्याच बरोबर या ठिकाणी तिन समाध्या असून ;एका समाधिवर दोन बाजूंनी दरवाजा नजीक वाघ कोरले आहेत, व एका समाधी शेजारी शिव पिंड आहे ,आज हि गढी शेवटच्या घटका मोजतेय. हि गढी केव्हांचि याबाबत संभ्रम आहे ,
पन गढी शेजारी एक शिव मंदिर आहे ते अतिशय सुंदर आहे.
#लेखक श्रीकांत रामचंद्र करे
No comments:
Post a Comment