Followers

Friday, 12 April 2019

पुण्याच्या पेठा भाग १


पुण्याच्या पेठा
भाग

पुणे! सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर! चारी बाजुंनी पर्वतरांगा आणि मुळा मुठा नदींच्या तीरावर वसलेलं एक वैशिष्ट्यपूर्ण शहर! आजही कुणाही व्यक्तीला सहज आकर्षित करेल असं शहर! 'आम्ही पुणेकर', ही म्हणजे फार अभिमानास्पद गोष्ट बरं
का नसेल हो? साक्षात जिजाऊ माँसाहेबांनी आणि शिवाजी महाराजांनी स्मशानवत जमिनीवर सोन्याचा नांगर फिरवावा आणि स्वतः त्या जागेचा विकास करून एक गाव वसवावं, हे गाव सामान्य कसं असेल! आजचं काय घेऊन बसला? तुम्ही अजुन पाच हजार वर्षांनी जरी आलात, तरीही हे शहर तेव्हाही आपल्याला तितकंच आकर्षित करेल. तेव्हाही 'पुणेकर' असणं, ही अभिमानास्पद बाबच असेल. पण या गावाला 'शहर' बनवुन या उंचीपर्यंत पोहोचवायला शिवाजी महाराजांपासून सवाई माधवरावांपर्यँत सर्वांनीच खुप कष्ट घेतले. खरंतर पेशवाईत पुणे शहराचा सर्व बाजुंनी विकास झाला. आजचं पुणे सुध्दा 'पेशव्यांचंच पुणे' म्हणुन ओळखलं जातं आणि 'पेशवे आमचे' हेही प्रत्येक पुणेकर अभिमानाने सांगतो. खरंच आहे. पेशव्यांनी एखाद्या आईने आपल्या बाळाला वाढवावं, काळजी घ्यावी, त्याच तळमळीने हे शहर जपलं, त्याची वाढ केली. एका गावातुन ते 'पुणे शहर' झालं.
या शहराला वाढवलं कसं, तर ते वेगवेगळ्या पेठा वसवुन! पुण्याच्या पेठा! आजही जगभरात ह्या पेठा एकदम हटके आहेत. पुणे मुळात या पेठांमुळेच प्रसिद्ध आहे. आज आपण पेशवाईत या 'पुणेरी पेठांची' निर्मिती कशी झाली हे पाहुया. पण त्यासाठी आपण एक गोष्ट ध्यानात ठेवुया की, पेशवे येण्या आधी जेव्हा शिवाजी महाराजांनी, माँसाहेबांनी पुण्याच्या रुक्ष भुमीवर सोन्याचा नांगर फिरवुन पुणे गाव वसवायला सुरुवात केली, तेव्हाही त्यांनी व्यवसाय वृद्धीसाठी कसबा पेठ, मलकापूर पेठ, शहापूर पेठ, अस्तलपूर पेठ वसविली होती. यातील कसबा पेठ म्हणजे मुख्य पुणे गाव. कसबा पेठेच्या निर्मिती नंतर तिथे माँ साहेबांनी स्वतः गणपती मंदिराची स्थापना केली. तोच पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती! त्यानंतर श्री महादेवाच्या आणि आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने तसेच या गजाननाच्या साक्षीने शिवाजीराजांच्या हातुन स्वराज्य निर्माण होऊ लागले. पुढे ते वाढत गेलं, पुण्यातही भरपूर बदल होत गेले, आणि शेवट छत्रपती शाहु महाराजांनी बाजीराव पेशव्यांना पुणे शहर इनाम दिले. kasba peth साठी इमेज परिणाम

No comments:

Post a Comment