Followers

Friday, 12 April 2019

खानदेशी चा पहारेदार 'कन्हेरदुर्ग' अर्थात गन्हेरी किल्ला

खानदेशी चा पहारेदार 'कन्हेरदुर्ग' अर्थात गन्हेरी किल्ला
चाळीसगाव शहरातुन दक्षिणेस दुरवरती नजर टाकली की आपणास एक U आकाराचा डोंगर नजरेस पडतो हा पाटणादेवी परिसर याचा पश्चिम उंच पहाड म्हणजेच आठव्या शतकातील कन्हेरदुर्ग होय. समुद्र सपाटी पासुन सुमारे 670 ऊंच टुमदार आणि घनदाट वनराई नटलेला कन्हेरदुर्ग ईतिहासप्रेमीं भटकंती साठी चांगला परिसर होत. आकराव्या शतकात यादव मांडलीक राजांनी येथे राज्य संरक्षक म्हणून याचा उपयोग केला.जवळच विज्जलगड म्हणून त्यांचे राज्य होते दारूगोळा धान्य पाणी साठवण व टेहाळणी साठी याचा वापर करण्यात आला नंतर च्या काळात इंग्रजांनी शिकारी च्या हौसे साठी याचा वापर केला.गडा च्या पायथ्याशी प्राचीन हेमाडपंथी शिवमंदीर असुन त्याची निर्मीती यादव काळातच झाली असावी कारण याच काळात ही वास्तुकला महाराष्ट्रात आली नंतर च्या काळात अहिल्यादेवी होळकर यांनी मुघली आक्रमण काळात उध्वस्त केलेल्या अशा मंदिरांचा जीर्णोध्दार केला. सध्या हे मंदीर सुस्थित दिसते. किल्ल्या च्या पायथ्याशी प्राचीन नागार्जुन लेणी आहेत. त्या इ.स.नवव्या शतकात कोरल्या गेल्याय तेथे इंद्रदेव व भगवान महावीरां ची मुर्ती व काही कोरिव स्तंभ आहेत. म्हणजेच इ.स.पुर्व एक ते चार काळात कोरल्या जवळील पितळखोरा या बौध्द लेण्या व नंतर च्या काळातील या जैनलेण्या दोन सम्रुध्द संस्कृती चा वारसा या परिसरास देऊन जातात. तसेच जवळच शृंगार चावडी आहे ती मात्र अकराव्या शतकातील हिदुधर्मिय दिसतेय.यात काही पुसटशी शृंगारिक चित्रे रेखाटलेली दिसतात.यानंतर यादव कालखंड अवतरलेला दिसतोय.
कन्हेरदुर्ग वरती आज ही लाल माती आढळते बहुतेक हे गंधक व माती मिस्त्रण असावे त्यांमुळे यास लालगढी पण संबोधतात.गडापासुन एक दिड कीलोमीटर वरती पाटणादेवी शिल्प असुन त्याची माहिती आगोदर च्या लेखात घेतलेली आहे.कन्हेरदुर्ग चा संदर्भ भारतीय स्वतंत्र लढ्यात पण येतो क्रांतीवीर ख्वाजा नाईकांनी इंग्रजां च्या पाटलागा नंतर याच किल्ल्यात आस्त्रय घेतला होता.
एकुणच कन्हेरदुर्ग ईतिहास स्वातंत्र्यसंग्राम ते पर्यटन वन्यजीव व धार्मिक दृष्टीने महत्वाचे पर्व ठरतो.
कन्हेरदुर्ग चाळीसगाव(जि.जळगाव) येथुन दक्षिणेस आठरा कीलोमीटर अंतरा वरती पाटणादेवी जवळ आहे.
संकलन/लेखन:- अरूण थोरात(जिल्हासरचिटणीस-भाजप सो.मिडीया औरंगाबाद जिल्हा) ©


No comments:

Post a Comment