पुण्याच्या पेठा
भाग 3
पुढे
१७५९ साली नानासाहेब पेशवे
यांनीही आपल्या वडीलांप्रमाणेच पुण्याचा विकास
सुरु ठेवला. सर्वात
प्रथम प्राधान्य त्यांनी पुण्याच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला दिला
आणि पुण्याचा पाण्याचा प्रश्न
मार्गी लावला. त्यासाठी त्यांनी पुण्याच्या बाहेर
कात्रज येथे मोठा
तलाव बांधला. तिथुन
खापरी नळांद्वारे पाणी
पुर्ण पुण्यात, शनिवारवाड्यात फिरविले. जागोजागी मुख्य
ठिकाणी मोठे हौद
बांधले. त्यांना कला
हौद, फडके हौद,
गणेश हौद, बदामी
हौद, शुक्रवार हौद,
अशी नावे दिली
आणि त्यात या
नळांद्वारे आणलेलं पाणी सोडलं.
त्यामुळे भरपूर पाणी पुण्याला उपलब्ध
झाले. हे काम
तब्बल आठ वर्षांनी संपले.
पुण्यातील आपल्या
निवास स्थानालाही एक
कोट बांधुन त्याला
एखाद्या भव्य राजवाड्याचे स्वरूप
प्राप्त करून दिले. पर्वतीचेही काम
सुरु होतेच. १७४८
साली त्यांनी शुक्रवार पेठेचा
आणखी विस्तार केला.
त्यानंतर त्यांनी जिवाजीपंत खासगीवाले यांना व्यापाऱ्यांची पुण्यात होत
असलेली वाढ पाहुन
एकदम पाच पेठा
वसवण्यास सांगितल्या आणि त्या पेठांचे गुरुवार पेठ,
गंजपेठ, मजफर पेठ,
न्याहाल पेठ असे नामकरण
केले आणि त्या
पेठांमध्ये व्यापाऱ्यांना
आपले व्यवहार सुरु
करण्यास सांगितले. १७५१ साली पेशव्यांनी आपल्या
चुलत बंधु, सदाशिवराव भाऊ
यांच्या नावे पेठ वसविली.
हीच ती सुप्रसिद्ध सदाशिव
पेठ!
व्यापार वाढीच्या दृष्टीने पेशव्यांनी अनेक
पाऊले उचलली. त्यासाठी एक
महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला
तो म्हणजे जकात
माफीचा! तब्बल सात
वर्षे पुण्यात व्यापाऱ्यांना जकात
माफ केला होता
आणि याचा फायदा
असा झाला की,
पुण्यातील व्यापाऱ्यांची
उलाढाल वाढण्यासोबतच बाहेरूनही अजुन
व्यापारी पुण्यात येऊ लागले आणि
पुणे शहर गजबजून
गेले. पुढे १७५५
साली आपले आराध्य
श्री गजाननाच्या नावे
त्यांनी गणेश पेठ वसविली.
त्यानंतर काही महिन्यात नानासाहेबांना पुत्ररत्न प्राप्त झाले.
त्याचे नाव नारायण
असे ठेवण्यात आले.
पुत्रप्राप्तीच्या
आनंदात नानासाहेबांनी सदाशिव
पेठेच्या शेजारीच नवीन पेठ वसवली
आणि तिला आपल्या
पुत्राचा नाव दिलं, नारायण
पेठ! पुढे नानासाहेबांनी नाना
फडणवीसांस आदेश देऊन पाण्याचे खापरी
नळ काढुन दगडी
नळ घातले. त्यानंतर नाना
फडणवीसांनी सदाशिवपेठ आणि नारायण पेठेतही हौद
आणि दगडी नळ
बांधुन पाणी फिरवले.व्यापाऱ्यांच्या
वृद्धीनंतर नगरवासीयांना राहत यावे यासाठी
नानासाहेबांनी
गोसावीपुरा, मेहुणपुरा, कामठपुरा हे तीन पुरे
वसविली आणि त्यात
लोकवस्ती वाढविली. फौजेतील लोकांना वस्तीसाठी लष्करीतळा जवळच परवानगी दिली.
शुक्रवार पेठेत बावनखणी बांधुन
कलावंतांनाही आसरा दिला.
No comments:
Post a Comment