Followers

Friday, 26 April 2019

" जसवंत सिंह की छतरी "


" जसवंत सिंह की छतरी "
सदरील वास्तू आग्रा शहरातील एकमेव हिंदू समाधी म्हणून ओळखली जाते .
जसवंत सिंह ची छत्री असे जरी नाव असले तरी राजस्थानच्या सरदार जसवंतसिंग राठोडची हि छत्री नव्हे . हि तर त्याने आपल्या वहिनीच्या स्मरणार्थ बांधलेली आग्रा मधील एकमेव समाधी आहे .
जसवंतसिंग हा नागौर संस्थानचा जहागिरदार अमरसिंग राठोडचा धाकटा भाऊ . त्याची वहिनी अर्थात बुंदी संस्थानची राजकन्या हाडा हि अमरसिंगची पत्नी होय . ती अमरसिंगचा मुघल सैन्याने केलेल्या खुनानंतर सती गेली . यमुनाकिनारी बाल्केश्वर मंदिराच्या जवळ जसवंतसिंगाने आपल्या वहिनीच्या स्मृतीप्रित्यार्थ हि लाल बलूआ पत्थरांनी नक्काशीदार समाधी बांधली .
नागौरचा संस्थानिक अमरसिंग ह्यास शहाजहानचा खजिनदार सलाबतखानाने बादशहाच्या राजस्थान भेटीत गैरहजर राहिल्याबद्दल भर दरबारात खडे बोल सुनावत अपमान केला . अमरसिंगला काही दंड ठोठावत पुढे दरबारात न येण्याबद्दल सुनावले . सलाबतखान शहाजहानचा साडु होता . तो धर्माने हिंदु असलेल्या व ऊच्च पदास पोहचलेल्या अमरसिंगवर जळत असे .
भर दरबारात अपमान झाला म्हणून अमरसिंगने तलवार म्यानातून ऊपसित झटदिशी सलाबतखानाची गर्दन धडावेगळी केली व तेथून बाकीच्य् सैन्यावर खपाखप तलवार चालवित आग्रा फोर्टच्या दक्षिण द्वारातून बाहेर घोड्यावर स्वार होत पळाला . शहाजहानने त्यास जीवे मारण्याचा हुकूम दिला काही अंतर पार केल्यावर त्यास मुघलांनी ठार केले .
पतीच्या मृत्युनंतर हाडा सती गेली . तिचा दिर व अमरसिंगचा धाकटा भाऊ ह्याने आग्रा मध्ये बल्केश्वर शिवमंदिराजवळ तिची लाल दगडांनी जाळीदार खिडकीयुक्त समाधी बांधली .
आग्रा मधील एकमेव ऐतिहासिक हिंदू समाधी म्हणून हा समाधी ओळखली जाते . Asi च्या अखत्यारीत जरी हि समाधी असली तरी ह्या समाधीची स्थानिक लोकांनी किळसवाण्या व गलिच्छ घाणेरड्या अवस्थेत दुर्दशा करून ठेवली आहे . लोक येथे दारू पितात . जुगार खेळतात . लघवी व संडासही येथील समाधीच्या आवारात करतात .
#आगरा_डायरी
#आगराकासफरनामा.
●सतिश शिंदे सह्याद्रीवेडा
9674031891

No comments:

Post a Comment