तुळशीबाग
तुळशीबाग संस्थानचे मूळ संपादक नारो आप्पाजी हे पुणें प्रांताचे सरसुभेदार असून, पेशवाईंतील दोनचार आणीबाणीच्या प्रसंगी यानीं विशेष प्रकारची कामगिरी केलेली आहे. हे मूळ सातार्याखालील पाडळी गांवचे वतनदार कुलकर्णी असून, यांचें उपनांव खिरे हें होय. बालपणीं कांहीं तंटेबखेडे होऊन हे रुसून पुण्यास आले व खाजगीवाले यांच्या आश्रयास राहिले. त्यावेळीं हल्लींच्या तुळशीबागेच्या ठिकाणीं खरोखरीचा `तुलसीबाग’ असून, त्याचें स्वामित्व खासगीवाल्यांकडे होतें. नारायणाकडे ह्या बागेंतील तुळशी वगैरे तोडून आणण्याचें काम असे, त्याची तरतरी पाहून खासगीवाल्यांची नारायणावर मर्जी बसली व पुढें त्यानीं `तुळशीबाग’ त्यास बहाल केला. लागलीच नारोपंतानें तुळशीबागेंत श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करून, त्याच्या सेवेंत राहण्याचा क्रम आरंभिला. पुढें कर्मधर्मसंयोगानें जमाबंदीच्या मुख्याच्या जागीं याची नेमणूक झाली. अण्णाजी दत्तो याच्यानंतर जमाबंदीची व्यवस्था चांगल्याप्रकारें नारोपंतानेंच केली. त्र्यंबकेश्वरी मुक्काम असतांना गौतमाश्रमींच्या एका सत्पुरुषाच्या कृपेनें नारोपंतास श्रीराम व जानकी अशा दोन मूर्ती मिळाल्या व त्यांचीच आपल्या तुळशीबागेंत शके १६८३ च्या सुमारास त्यांनीं मोठ्या समारंभानें स्थापना केली. लक्ष्मणाची मूर्ति बखतराम नामक सुप्रसिद्ध कारागिराकडून मुद्दाम तयार करविली. तुळसीबाग संस्थानास पेशवे सरकार यांची पहिली देणगी शके १६८५ त मिळाली. नारोपंताचा पुत्र रामचंद्र हा होळकराच्या दंग्याच्या वेळीं हयात होता. [भा.इ.मं. इतिवृत्त १८३७].

No comments:
Post a Comment