पुण्याच्या पेठा
भाग 2
पुणे
शहर बाजीरावांना इनाम
मिळाल्यावर पेशव्यांनी पुण्याचं सर्वच बाबींना पोषक
असं वातावरण पाहुन
पुण्यातच राहायचं, आणि पुण्यातूनच पेशवे
पदाचा कारभार चालवायचं ठरवलं.
त्या नंतर त्यांनी पुण्यात स्वतःच्या वास्तव्यासाठी पुण्यातील मुख्य
कसबा पेठेत एक
दुमजली वाडा बांधला
आणि या वाड्याचे 'शनिवारवाडा' असं
नामकरण केले. हा
नामकरण सोहळा १७३२
साली रथसप्तमीच्या दिवशी
झाला आणि श्रीमंत थोरले
बाजीराव पेशवे आपल्या संपुर्ण परिवारासह पुण्यात या
वाड्यात राहायला आले. त्याचा आधी
दोन वर्ष म्हणजे
१७३० सालीच पेशवे
दफ़्तर सातारहून पुण्यात हलविले
होते. त्यामुळे हे
शहर राजकीय दृष्ट्याही फार
महत्वपुर्ण झाले. कसबा पेठेतील शनिवारवाड्यात राहायला आल्यावर पेशव्यांनी वाड्याच्या आजुबाजुच्या परिसराचा विकास
करणे सुरु केले.
या कसबा पेठेच्या सुशोभित करण्याची जवाबदारी पेशव्यांनी सदाशिव
दिक्षित पटवर्धन यांच्यावर सोपविली. त्यांनीही पेशव्यांच्या वाड्याचा परिसर शोभावा, अशी
ती पेठ नव्याने वसवली.
हे काम तब्बल
सहा वर्षे चालले.
पेशवे पुण्यात राहायला आल्यामुळे पुण्याचं एक
वेगळं महत्व हिंदुस्तानात निर्माण झालं
आणि त्यामुळे पुण्यात गर्दी
वाढु लागली. यामुळे
पेशव्यांनी पुण्यात सतत खडी फौज
राहावी या हेतूने
१७३४ साली शुक्रवार पेठेची
निर्मिती केली आणि तीत
लष्कराच्या छावण्यांना परवानगी देऊन पुण्यात लष्कराची कायमस्वरूपी सोय
करून दिली. पुढेही
व्यापार वाढवा या हेतूने
पेशव्यांनी आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत १७४०
साली जुनी मलकापूर पेठ
नव्याने वसवुन तिचे रविवार
पेठ म्हणुन नामकरण
केले. खासगीवाले यांच्यासोबतच पुण्यातील इतरही
सावकारांना वेगवेगळ्या पेठा वसविण्याची जवाबदारी दिली
आणि बाजीराव पेशव्यांनी आपल्या
काळात कसबा, रविवार,
सोमवार, मंगळवार आणि
शनिवार पेठ अशा
पाच पेठांची निर्मिती केली.
थोरले बाजीराव पेशवे
यांच्या कारकिर्दीत पुण्याची लोकसंख्या वाढून ती तीस
हजारांच्या घरात पोहोचली होती.
No comments:
Post a Comment