Followers

Monday, 29 April 2019

जयगड, रत्नागिरी




जयगड, रत्नागिरी
जयगड हा ऐतिहासिक सागरीदुर्ग शतकानुशतके किनाऱ्यावर उभा आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारी १६ व्या शतकातील कागदपत्रे उपलब्ध आहेत. किल्ल्याच्या एकूण बांधणीवरून जयगड किल्ला हा विजापूरकरांनी बांधला असावा असा अंदाज आहे. त्यानंतर १५७८-८० च्या सुमारास संगमेश्वर येथील नाईक यांनी तो जिंकून घेतला परंतु अनेकदा प्रयत्न करूनही विजापूरकरांना हा किल्ला परत जिंकता आला नाही. इ.स. १६९५ पासून जयगड कान्होजी आंग्रे यांच्याच ताब्यात होता. अखेर इ.स. १८१८ मध्ये कोणत्याही लढाईशिवाय हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
गडाच्या मुख्य दरवाजाशेजारी एक छोटा दरवाजा असून तिथून जयगड बंदराकडे थेट रस्ता जातो. मुख्य दरवाजाची कमान उत्तम अवस्थेत असून आत देवड्या आहेत. दरवाजाच्या कमानीची बांधणी मुस्लिम पद्धतीची आहे. तर कमानीवर दोन्ही बाजूंना दोन कमळशिल्पे व मध्यभागी एक गुलमोहोरासारखे पुष्प कोरले आहे.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडील तटबंदीत खोल्या आढळून येतात. पुढे तटावर जाण्यासाठी पायऱ्या असून तिथून पुढे गेल्यावर उजवीकडे एक प्रशस्त मैदान व अनेक वास्तू दिसून येतात. मुख्य दरवाजावर म्हणजे मेघडंबरीच्या जागेवर ब्रिटिश काळात दोन मजले बांधून विश्रामगृह बांधलेले आढळते. पुढे उत्तरेकडे गेल्यावर मोठ्या तीन मजली वास्तू व जवळच कौलारू गणेश मंदिर असून त्याच्याबाहेर पूर्वी दोन दीपमाळा होत्या ज्यातील एकच सध्या अस्तित्वात आहे. मंदिरामागे एका मोठ्या वाड्याची वास्तू आजही तग धरून असून मंदिराजवळच जयबाचे स्मारक आहे. पुढे तटबंदीजवळ गेल्यावर आत खोल्या बांधलेल्या दिसतात. तटबंदीवर एक नवीन मनोरा आहे. गडाच्या उत्तरेला तटबंदीवर दोन मजली बुरुज आहे व प्रवेश करायला दोन दिंडी दरवाजे आहेत.
गडाच्या बाहेरून गडाच्या संरक्षणार्थ खोदलेला खंदक आहे. जयगडाचे पडकोट व बालेकिल्ला असे दोन मुख्य भाग आहेत. मुख्य किल्ल्याला १४ बुरुज असून, पडकोटाला १० बुरुज आहेत, जे खाडीलगत बांधले आहेत. बालेकिल्ल्यातून पडकोटाकडे जाताना मोठा उतार आहे आणि सध्या तिथे जयगड गाव वसलेले आहे.
गणपतीपुळ्यापासून १६ कि.मी. अंतरावरील जयगड बंदर हे अनेक शतकांपासून व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे राहिले आहे. आजही ते एक उपयोगी बंदर म्हणून वापरात आहे. अशा या ऐतिहासिक ठिकाणी जयगड हा तितकाच ऐतिहासिक सागरीदुर्ग शतकानुशतके अस्तित्वात आहे.
शास्त्री नदीच्या खाडीतील जयगड किल्ला १२ एकर परिसरात विस्तारला असून आजही तो पूर्वीइतकाच भक्कमपणे ठाण मांडून उभा आहे. रत्नागिरीकडून खंडाळे-जयगड असा एस.टी. मार्ग असून रत्नागिरीपासून जयगड ४५ कि.मी अंतरावर आहे. हा सागरीदुर्ग समुद्रापासून ५५ मीटर उंचीवर असून चढायला अगदी सोपा आहे. जयगड पोलीस चौकीपासून गडावर जायला फक्त ५ मिनिटे लागतात. जयगडपासून जवळ भ्रमंती करण्यासाठी गणपतीपुळे, कोळिसरे लक्ष्मिकेशव, मालगुंड आदी ठिकाणे आहेत.

अजिंठा’





अजिंठा’ हे नाव आहे उंच पाषाण कड्यात कोरलेल्या प्राचीन बौध्द लेणी समुहाचे. अजिंठा नामक गावाच्या अगदी समीप असल्याने या लेण्यांचे नाव पडले अजिंठ्याची लेणी. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांच्या पलटणीतल्या काही सैनिकांना अजिंठा गावा जवळ या लेण्यांचा अचानक शोध लागला आणि मागील अनेक शतकं अज्ञातात गेलेला हा प्राचीन लेणी समूह, आधुनिक जगाला ज्ञात झाला. अजिंठ्याच्या लेणी समुहात एकूण तीस लेणी आहेत, त्यात काही चैत्यलेणी आहेत, तर इतर विहार लेणी. इथले विहार, चैत्यगृहं म्हणजे अखंड पाषाणातील प्रमाणबद्ध स्थापत्यकलेचा आणि प्राचीन चित्रकलेचा उत्तम नमून आहेत, हे पहाता क्षणीच ध्यानात येतं. जगभर ‘अजिंठ्याचीलेणी’ या नावाने हा प्रसिध्द असलेला लेणी समूह आज ‘यूनेस्को’च्या (United Nations Educational Scientific and Cultural Organization) जगातील महत्वाच्या वारसा यादीत जागतिक वारसा म्हणून घोषित झालेला आहे.
वाघुर नदीच्या प्रवाहाने नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या प्रचंड खोल घळीच्या अर्धगोलाकार उभ्या पाषाणकड्याच्या कोंदणात, चंद्र्कोरीत गुंफल्या प्रमाणे या लेण्या कोरलेल्या दिसतात. सभोवतालच्या डोंगरदरीतून फुललेल्या निसर्गाच्या भाळी बांधलेल्या तोरणा सारखा शोभून दिसावा असा हा अजिंठ्याचा लेणी समूह. या लेणींचे केवळ दुरून होणारे दर्शन, नयन रम्य तर आहेच, शिवाय मंत्र मुग्ध करणारे देखील आहे. सातवाहन आणि त्यानंतर उदयाला आलेल्या वाकाटक राजवटीच्या काळात कोरल्या गेलेल्या या लेण्या बौध्दांच्या प्रमुख पंथांना समर्पित आहेत. अशा या प्राचीन लेण्यांचा आपल्या अर्वाचीन जगाला शोध लागला त्या दिवसाला आज दोनशे वर्ष होत आहेत.
एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्धात इंग्रज लष्कराची एक पलटण ‘मद्रास आर्मी’ चा तळ सध्याच्या औरंगाबाद जिल्यातील ‘अजिंठा’ गावात पडलेला. एक दिवस पलटणीतले काही गोरे शिपाई शिकारी साठी निघाले; आणि अजिंठ्याच्या नजीकच, घनदाट जंगलांनी व्यापलेल्या अर्ध वर्तुळाकार आकाराच्या प्रचंड खोल घळीत उतरले. शिकारीच्या शोधात त्यांना कड्यात कोरलेल्या काही गुहा दिसल्या. त्यातले काही शिपाई धाडस करून एका लेणीत गेले. आत जाताच त्यांना सलग पाषाणात कोरलेले काही स्तंभ दिसत होते. त्या अष्टकोनी स्तंभांवर चित्रे देखील चितारलेली दिसत होती. त्यातल्या जॉन स्मिथ नावाच्या एका हुशार गोऱ्या सैनिकाने, समोर असलेल्या स्तंभावरच्या चित्रावर, इंग्रजी अक्षरात स्वतःचे नाव, पलटण व तारीख लिहिली ‘जॉन स्मिथ’ २८ कॅव्हलरी २८ एप्रिल १८१९.
जॉन स्मिथने लिहिलेली ती तारीख अजिंठा लेण्यांच्या इतिहासात महत्वाची ठरली आहे. का तर सातव्या, आठव्या शतकात विस्मृतीत गेलेला एक मोठा आणि महत्वाचा बौध्द लेणी समुह, या दिवसा पासून आधुनिक जगाला नव्याने ज्ञात झाला म्हणून. बहुदा सातव्या शतकात भारतात आलेल्या प्रसिद्ध चीनी यात्रेकरू हुएन-त्सांगनी नोंद करून ठेवलेला महाराष्ट्रातील हा प्राचीन बौद्धलेणींचा समुह पुन्हा प्रकाशात आला होता, थेट एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात; तब्बल बाराशे वर्षांनी.
अजिंठ्याच्या लेण्यांचा शोध तसा अचानकच लागला, असे जरी म्हणता येत असले, तरी स्थानिक लोकांस या गुहांची माहिती नक्कीच होती. अजिंठा गावच्या एका गुराख्याने त्या सैनिकांस अजिंठागावा पासून जवळच असलेली शिकारीची संभावित जागा दाखवली होती. स्थानिक समजुती नुसार हि जागा म्हणजे अजिंठा गावाच्या मागच्या बाजूस असलेले सध्याचे ‘अजिंठा व्हयूपॉईंट’ नावाचे ठिकाण होय. या ठीकाणाहुन खाली खोल वर्तुळाकार घळीच्या कड्यात दडलेल्या त्या सर्व लेण्यांचे दर्शन होते. इथूनच डावीकडे, काळ्या कातळावरून वहाणारी अवखळ वाघुरनदी त्या प्रचंड खोल घळीच्या ओंजळीत कोसळते आणि हिरव्या निळ्या डोहातून उसळी घेत, अवखळ नागमोडी होत खळखळणाऱ्या प्रवाहात मुक्त होते.
आर्य शुराच्या जातक मालेतील ‘क्षान्ति जातक’ कथेतील एक श्लोक अजिंठ्याच्या लेणी क्र. २ मध्ये लिहिला आहे. ‘निवसन्ति हि यत्रैव सन्तः सद्गुणभूषणा:I तन्मड़ल्यं मनोज्ञं च तत्तीर्थ तत्तपोवनम् II४II’ सद्गुणांनी भूषित थोर संत, महंत निवासासाठी जे ठिकाण निवडतात, ती जागा मंगल, मनोहर होते. तेच तीर्थ तपोवन असते. अजिंठा गावाजवळ पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेल्या त्या वनातील मुनीन्द्रनाथाला समर्पित असलेला, तिथल्या दिव्य लेणींचा निवास, त्या वनाचे तीर्थभूषण होता; त्या लेणींनी त्या वनाचे तपोवन केले होते.
खरे तर अजिंठा हि एक न संपणारी दृश्य कथा आहे. ही कथा आहे; भगवानबुद्धाच्या चरणांवर सर्वस्व वाहणाऱ्याची; ज्ञानयोगियांची, थेरांची, भिख्खूची, राजांची, त्यांच्या मंत्रीसेनापतींची, अमात्यांची, दानशुरांची, आणि सर्वसामान्यांच्या श्रद्धेची आणि त्या ‘अनामिक’ प्रतिभासंपन्न कलाकारांची. ज्यांनी सुगताच्याच म्हणजेच तथागत गौतम बुद्धांच्या प्रेरणेने आपल्या जवळील छिन्नी आणि कुंचल्याच्या सहाय्याने आपली प्रतिभा सजीव साकार करून, त्यांच्याच चरणी समर्पित करून, आजचे ‘अजिंठा’ नावाचे आश्चर्य निर्माण केले त्याची.
अजिंठा नावाचे ‘सुरेंद्रमौलिप्रभोपचित्’ सुरेन्द्राच्या तेजस्वी मुकुटा प्रमाणे असे विशाल सुगतालय साकार करून तथागतांच्या चरणी समर्पित करणाऱ्या त्या प्रतिभावंत कलाकारांची नावे-गावे कोठे लिहून ठेवलेली, कोरलेली आहेत का? तर याचे उत्तर नकारार्थीच मिळेल. इथेहि त्यांचे अनामिक रहाणेच दिसेल. किंवा अजिंठ्याच्या विहारांच्या भित्ती, चित्रांनी जेंव्हा सजत होत्या, तेंव्हा, म्हणजे पाचव्या, सहाव्या शतकातील बौध्द किंवा इतर साहित्यात कोठे या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? तर तसेही दिसत नाही. परंतु त्यांना जाणून घेण्याच्या उत्सुकते पोटी मनात हा विचार आला की ‘ठीक आहे, त्या कलावंतांची नावे न कळू देत, पण असे विस्मयकारक काम करणाऱ्या त्या प्रतिभावंतांची समृद्ध कला परंपरा नक्कीच असली पाहिजे. कदाचित त्या परंपरेचा मागोवा घेतला तर तिथेच ते भेटतील. किंवा त्या परंपरेच्या धाग्यात एखादे आणखी एक आश्चर्य दडलेले आसवे ज्यातून अजिंठा नावाचे दुसरे आश्चर्य साकार झाले असावे. अर्थातच अजिंठ्या पासून प्रेरणा घेत मी निघालो, आणि पोहोचलो होतो ‘बुद्धो देवस्य सानिध्यौ यत्र धात्रा प्रपुजितःI चैत्यमत्युन्नतं यत्र नाना चित्रसुचित्रितंI’ आणि समोर .........................
२८ एप्रिल १८१९ पासून,,,,,, ‘अजिंठ्याच्या शोधाच्या शोधाला’ ...........
IIश्रीII

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वेताळगड उर्फ वसईचा किल्ला


 वेताळगड उर्फ वसईचा किल्ला





औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वेताळगड उर्फ वसईचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. त्यामुळे हा किल्ला पहातांना एक परीपुर्ण किल्ला पाहील्याचे समाधान मिळते. वेताळगड जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाण्यासारखी आहेत.
पहाण्याची ठिकाणे :
वेताळगड किल्ल्याच्या एका बाजूला हळदा घाट रस्ता झाल्यामुळे या मार्गाने आपण जवळ जवळ किल्ल्याच्या प्रवेशव्दारात पोहोचतो. प्रथम दोन भव्य बुरुज आपले स्वागत करतात. त्यांच्या मागे या या दोन बुरुजां पेक्षा उंच व भव्य बुरुज आहे. त्याला नक्षीदार सज्जा आहे. दरवाजा पर्यंत पोहोचलेल्या शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी या बुरुजाची रचना केलेली आहे. दोन बुरुजांमधून फरसबंदी केलेली वाट काटकोनात वळून उत्तराभिमुख प्रवेशव्दाराकडे जाते. या प्रवेशव्दाराचे तोंड जंजाळा किल्ल्याकडे असल्यामुळे याला "जंजाळा दरवाजा" म्हणत असावेत. दरवाजाची उंची २० फूट असून त्याच्या दोन बाजूस शरभ शिल्प कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. दरवाजाच्या वर जाण्यासाठी जीना आहे. या जीन्याने वर गेल्यावर दरवाजाच्या छतावर एक चौकोनी खाच केलेली आहे. त्यातून उतरणारा जीना आपल्याला एका मोठ्या खोलीत घेऊन जातो. दरवाजावर उभे राहील्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी, त्या खालचा हळदा घाट व सर्वात खाली वेताळवाडी धरण पहायला मिळते. तर वरच्या बाजूला बालेकिल्ल्याची तटबंदी पहायला मिळते.

प्रवेशव्दारावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक कोरडे खांब टाके लागते. ते पाहून पुन्हा दरवाजापाशी येऊन तटबंदी उजव्या हाताला ठेऊन चालू लागल्यावर उजव्या बाजूस भव्य बुरुजात जाण्याचा प्रवेश मार्ग दिसतो. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटवाघळे असल्यामुळे आत शिरता येत नाही. थोड पुढे गेल्यावर आपण तटबंदीतील पूर्व टोकाच्या बुरुजापाशी पोहोचतो. येथून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्यावर आपण ५ मिनिटात बालेकिल्ल्यावर पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुजाजवळ एक छोटी घुमट असलेली इमारत आहे. या इमारतीच्या छ्ताला एक झरोका आहे. येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुजापर्यंत चालत जावे. मधल्या बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले तेल तुपाचे टाक पहायला मिळत. या टाक्याच्या बाजूला धान्य कोठाराची इमारत आहे. या इमारतीच्या समोर एक भग्न इमारत आहे. पुढे गेल्याव्रर नमाजगीर नावाची इमारत (मस्जिद) आहे. त्याच्या भिंतीवर निजामाचे चिन्ह व त्याखाली क्रॉस कोरलेला आहे. नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर आहे. नमाजगीरच्या समोर तलाव आहे.
किल्ल्याच्या उत्तर टोकावर बारदरी नावाची २ कमान असलेली इमारत दुरुन नजरेत भरते. या इमारतीकडे जातांना डाव्या बाजूला एक इमारत आहे. बारादरी ही किल्ल्याच्या उत्तर टोकाला आहे. या इमारतीत २ कमानींच्या दोन रांगा आहेत. राजघराण्यातील लोकांना उन्हाळ्यात हवा खाण्यासाठी अशी इमारत देवगिरी किल्ल्यावरही बांधलेली आहे. बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याचा मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते.
किल्ल्याच्या मुख्या दरवाजाकडे जाण्यासाठी बारादरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे पुढे ही वाट बारादरी खालून उतरत खाली जाते. येथे एक बुजलेले टाके आहे. त्याच्या बाजूला ६ फूट १० इंच लांबीची तोफ पडलेली आहे. उजव्या बाजूच्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. दोन बुरुजात बसवलेले किल्लाचे मुख्य प्रवेशव्दार उत्तराभिमुख आहे. प्रवेशव्दार २० फूट उंच असून त्याच्या दोनही बाजूला शरभ शिल्प कोरलेली आहेत. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. दुसरे प्रवेशव्दार पश्चिमाभिमुख आहे. हे प्रवेशव्दार पाहीले की आपली गड फेरी पूर्ण होते. येथून २० मिनिटात आपण वेताळवाडी गावात पोहोचतो.
रुद्रेश्वर लेणी :- वेताळवाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरात रुद्रेश्वर लेणी आहेत. ही हिंदू (ब्राम्हणी) लेणी असून यात नरसिंह, गणेश, भैरव व सप्तमातृका यांची शिल्पे आहेत. याशिवाय लेण्यात शिवलिंग व नंदी आहे. वेताळवाडीतून रुद्रेश्वर लेण्यांपर्यंत जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी जंजाळा गडावर जाता येते.
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन १२ किमीवर हळदा गाव आहे. हळदा गावापुढे घाट सुरु होतो. या घाटातच हळद्यापासून ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. घाट चढल्या पासूनच वेताळवाडी किल्ला दिसू लागतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ न उतरता किल्लासुरु होतो तेथे उतरावे. इथून पायवाट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाते.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव - वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गडावर नाही, सोयगावातील हॉटेलांत होऊ शकते.
पाण्याची सोय :
गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. पाणी बरोबर बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) वेताळवाडी गावातून गडावर जाण्यासाठी ४५ मिनीटे लागतात. २) हळदा घाट रस्त्यावरून गडावर जाण्यासाठी १० मिनीटे लागतात.
सूचना :
१) स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून पहाटे निघून जंजाळा किल्ला , घटोत्कच लेणी, वेताळगड व रुद्रेश्वर लेणी एका दिवसात पहाता येतात.
२) जंजाळा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे

Friday, 26 April 2019

" जसवंत सिंह की छतरी "


" जसवंत सिंह की छतरी "
सदरील वास्तू आग्रा शहरातील एकमेव हिंदू समाधी म्हणून ओळखली जाते .
जसवंत सिंह ची छत्री असे जरी नाव असले तरी राजस्थानच्या सरदार जसवंतसिंग राठोडची हि छत्री नव्हे . हि तर त्याने आपल्या वहिनीच्या स्मरणार्थ बांधलेली आग्रा मधील एकमेव समाधी आहे .
जसवंतसिंग हा नागौर संस्थानचा जहागिरदार अमरसिंग राठोडचा धाकटा भाऊ . त्याची वहिनी अर्थात बुंदी संस्थानची राजकन्या हाडा हि अमरसिंगची पत्नी होय . ती अमरसिंगचा मुघल सैन्याने केलेल्या खुनानंतर सती गेली . यमुनाकिनारी बाल्केश्वर मंदिराच्या जवळ जसवंतसिंगाने आपल्या वहिनीच्या स्मृतीप्रित्यार्थ हि लाल बलूआ पत्थरांनी नक्काशीदार समाधी बांधली .
नागौरचा संस्थानिक अमरसिंग ह्यास शहाजहानचा खजिनदार सलाबतखानाने बादशहाच्या राजस्थान भेटीत गैरहजर राहिल्याबद्दल भर दरबारात खडे बोल सुनावत अपमान केला . अमरसिंगला काही दंड ठोठावत पुढे दरबारात न येण्याबद्दल सुनावले . सलाबतखान शहाजहानचा साडु होता . तो धर्माने हिंदु असलेल्या व ऊच्च पदास पोहचलेल्या अमरसिंगवर जळत असे .
भर दरबारात अपमान झाला म्हणून अमरसिंगने तलवार म्यानातून ऊपसित झटदिशी सलाबतखानाची गर्दन धडावेगळी केली व तेथून बाकीच्य् सैन्यावर खपाखप तलवार चालवित आग्रा फोर्टच्या दक्षिण द्वारातून बाहेर घोड्यावर स्वार होत पळाला . शहाजहानने त्यास जीवे मारण्याचा हुकूम दिला काही अंतर पार केल्यावर त्यास मुघलांनी ठार केले .
पतीच्या मृत्युनंतर हाडा सती गेली . तिचा दिर व अमरसिंगचा धाकटा भाऊ ह्याने आग्रा मध्ये बल्केश्वर शिवमंदिराजवळ तिची लाल दगडांनी जाळीदार खिडकीयुक्त समाधी बांधली .
आग्रा मधील एकमेव ऐतिहासिक हिंदू समाधी म्हणून हा समाधी ओळखली जाते . Asi च्या अखत्यारीत जरी हि समाधी असली तरी ह्या समाधीची स्थानिक लोकांनी किळसवाण्या व गलिच्छ घाणेरड्या अवस्थेत दुर्दशा करून ठेवली आहे . लोक येथे दारू पितात . जुगार खेळतात . लघवी व संडासही येथील समाधीच्या आवारात करतात .
#आगरा_डायरी
#आगराकासफरनामा.
●सतिश शिंदे सह्याद्रीवेडा
9674031891

भूपाळगड (बाणूर गड)

भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))🚩🚩

🚩🚩किल्ल्याची ऊंची:-२९८२.

किल्ल्याचा प्रकार:-गिरीदुर्ग

डोंगररांग:-डोंगररांग नाही

जिल्हा:-सांगली

श्रेणी:-मध्यम

भूपाळगड हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेला किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याच्या बाणूर गावामुळे या किल्ल्याला "बाणूरचा किल्ला" म्हणूनही ओळखले जाते. किल्ल्याचा घेर खूप मोठा आहे. पूर्व आणि उत्तरेकडे साधारण ७०० फूट उंच कडे आहेत. पण पश्चिमेकडून किल्ला फार उंच नाही. बाणूर गाव किल्ल्याच्या याच बाजूला आहे. सध्या किल्ल्यातच गाव वसलेल आहे. किल्ल्याची तटबंदी फोडून रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्याने गाडी घेऊन थेट किल्ल्यावर जाता येते.

पळशीचे सिध्देश्वर मंदिर, शुकाचार्य मंदिर, कोळदुर्ग आणि बाणूरगड ही ठिकाणे खाजगी वहान असल्यास एका दिवसात पाहाता येतात. कोळदुर्गची माहिती साईटवर दिलेली आहे.

इतिहास:-
भूपाळगड हा किल्ला स्वराज्याच्या सीमेवर होता. या किल्ल्यावर फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होते असा उल्लेख आहे. १६७९ मध्ये संभाजी राजे मुघलांना जाऊन मिळाले. दिलेरखानाने त्यांना फौज देऊन भूपाळगड किल्ला घेण्यास सांगितले. संभाजी राजे गडावर चालून आलेले पाहून किल्लेदार फिरंगोजीने प्रतिकार केला नाही. तो गड सोडून पन्हाळगडावर शिवाजी महाराजांकडे गेला. किल्ला घेतल्यावर मुघलांनी किल्ल्यातील मावळ्यांचे हात पाय तोडले.

पहाण्याची ठिकाणे:-
बाणूर गावातून किल्ल्यावर प्रवेश करताना किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. किल्यावर वस्ती आहे. या वस्तीतून डावीकडे एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने पुढे गेल्यावर गावाची वस्ती संपते . पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पठार आहे . समोर एक छोटी टेकडी आपले लक्ष वेधून घेते. या टेकडीवर महादेवाचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेर सिमेंटमध्ये बांधलेली एक कमान आहे ती दुरवरुनच दृष्टीस पडते. या कमानी पर्यंत पोहोचायला १५ मिनिटे लागतात. या टेकडीच्या पायथ्याशी रस्ताच्या उजव्या बाजूला कातळात खोदलेला तकाव आहे. तलाव पाहून पायर्‍यांच्या मार्गाने कमानीतून टेकडीवर आपला प्रवेश होतो. टेकडीवर शंकराचे पुरातन मंदिर आहे. मंदिराला एकेकाळी तटबंदी असावी. आता फ़क्त तटबंदीतील दरवाजा भक्कमपणे उभा आहे. या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच एक तुळाशी वृंदावन आहे. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची ही समाधी आहे. या टेकडीजवळच एक पाण्याचे छोटे कोरडे टाके आहे. गडाच्या तटबंदीत २ ते ३ दिंडी दरवाजे (चोर दरवाजे) आहेत. किल्ल्यावर सर्वत्र तुटलेल्या रचीव तटबंदीचे अवशेष दृष्टीस पडतात. किल्ल्यावरुन कोळदुर्ग दिसतो.

पोहोचण्याच्या वाटा:-
भूपाळगडावर जाण्यासाठी प्रथम कराड गाठावे. कराड - पंढरपूर रस्त्याने (४२ किमी वरील) विटा गाव गाठावे विटा गावातून थेट बाणूर गडावर जाण्यासाठी एसटी बसेस आहेत. खाजगी वहान असल्यास विटा गावाच्या पुढे २२ किमीवरील खानापूर हे तालुक्याचे गाव गाठावे. खानापूर वरून पळशी आणि बाणूरगडाचा फ़ाटा १२ किमीवर आहे. फाट्यापासून बाणूरगड १० किमी अंतरावर आहे. बाणूर गाव हे किल्ल्यातच आहे. बाणूरगडावरील टेकडीवर असलेल्या महादेव मंदिरापर्यंत गाडीने जाता येते. बाणूरगडावर जाण्यासाठी दिवसातून एकदा थेट तासगावहून एसटी आहे.(खाली दिलेले एसटीचे वेळापत्रक पाहा)

राहाण्याची सोय:-
किल्ल्यावरील महादेव मंदिराच्या आवारात राहाता येईल.

जेवणाची सोय:-
जेवणाची सोय आपण स्वत…: करावी.

पाण्याची सोय:-
गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी उत्तम
कालावधी:-
वर्षभर🚩🚩

केंजळगड!

रायरेश्वराच्या पठारापासून साधारण पूर्वेला एका डोंगरसोंडेवर एक बुलंद किल्ला आहे. त्याचे नाव किल्ले

केंजळगड!

स्वराज्याच्या सीमेवरला हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. अल्याड भोर परगणा जो माहाराजांचा ताब्यात होता आणि पल्याड वाई परगणा जो आदिलशीत होता,असा भू-राजनैतिक आणि लष्करी महत्व असलेला हा किल्ला ऐन राज्याभिषेकाच्या मुहूर्तावर शत्रूच्या ताब्यात असणं धोकादायक होतं.

म्हणूनच शिवरायांनी एक बेत ठरवला. अचानक हल्ला करून केंजळगड स्वराज्याच्या सेवेत दाखल करायचा. मोहिमेची आखणी झाली. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी बिनीची फौज आणि त्यावरील शिलेदार निश्चित झाले.शत्रू गाफील असताना रात्रीच्या मुहूर्तावर सुलतानढवा करून गडावर मोर्चे लावायचं पक्क झालं.

आता फक्त प्रश्न होता की या मोहिमेचे नेतृत्व कोण करणार? महाराजांच्या खाश्या खाश्या सरदारांना वाटत होतं की या मोहिमेची सुपारी आपल्यालाच मिळावी आणि हा किल्ला सर करून महाराजांची सरफराजी पाववावी..

अनेक तर्क लढवले जात होते..शेवटी भवती न भवती होऊन मोहिमेचा नेता निश्चित झाला...अर्थात ही गोष्ट ठराविक लोकांनाच माहीत असणे जरूर होत कारण एकूणच सारा मामला गनिमी काव्याचा होता. तेव्हा गुप्तता पाळणं फार गरजेचे होत.

कोण होता या मोहीमेचा प्रमुख?

मंडळी,

आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल..

स्वतः शिवाजी महाराजच या हल्ल्याचे नेतृत्व करणार होते..राज्याभिषेक केवळ 40 दिवसांवर आलेला असताना महाराज मोठं धाडस करायला तयार झाले होते. मला सांगा, आजचा कोणता नेता स्वतःचे प्राण असे धोक्यात घालायला तयार होईल?

पण शेवटी महाराज हे निश्चयाचे महामेरू होते.

Leading by Example या शिवरायांच्या गुणविशेषामुळेच आजवर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटांमध्ये महाराजांच्या शूर मावळ्यांनी त्याना कायम साथ दिली होती आणि प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदानही देण्यासही त्यानी मागे पुढे पाहिलेले नव्हते!

रामदास स्वामींनी महाराजांची प्रशस्ती करताना म्हणलं आहे की राज्यसाधनेची लगबग कैसी केली ? याप्रसंगी त्या समर्थवचनाचा प्रत्यय येत होता.

राज्याभिषेकाची एकीकडे रायगडावर गडबड सुरू असताना महाराज मात्र इकडे राज्यसाधनेच्या मागे लागले होते!

आपल्याकडे एक संस्कृत वचन आहे. साहसे श्री: प्रतिवसति! अर्थात जिथे साहस आहे तिथे यश हमखास आहे.

आणि तो मुहूर्ताचा दिवस ठरला...

चैत्र वद्य १४,शके १५९६, इंग्रजी दिनांक २४ एप्रिल १६७४(ज्युलियन दिनांक)!

केंजळगडवर शत्रूचा मोठा करोल पहारा होता. गंगाजी नाईक किरदत्त नावाचा एक मराठी किल्लेदार आदिलशहाच्या वतीने गडावर किल्लेदार म्हणून तैनात होता. महाराजांनी स्वतः मावळयांची निवड केली आणि त्या निवडक सेनेसह माहाराज बिनीचे सेनापती होऊन त्यानी किल्ल्यावर एकच एल्गार केला.

गंगाजी एक कसलेला योद्धा आणि रांगडा, मर्द शिपाईगडी होता. मराठी आणि आदिलशाही सेना एकमेकांना भिडल्या. स्वतः माहाराज त्या सैन्याचे नेतृत्व करत होते. त्यामुळे प्रत्येक मराठी छाव्याला आपसूकच दहा हत्तींचे बळ प्राप्त झाले होते.

मराठयानी पराक्रमाची शर्थ केली. गंगाजीनेही मोठा पराक्रम गाजवला. काहीं मावळ्यांना त्याने धारातीर्थी पाडले पण त्याने मराठे बिलकुल कचरले नाहीत. अखेर तो विजयाचा क्षण समीप आला. लढता लढता गंगाजी नाईक किरदत्त पडला .

केंजळगड स्वराज्यात सामील झाला. आदिलशाही निशाण उतरवून किल्ल्यावर मराठ्यांनी भगवे निशाण फडकवले.

दि २४ एप्रिल १६७४ (ज्युलियन दिवस)हा दिवस आणि मराठयांचा पराक्रम अश्या प्रकारे इतिहासात अजरामर झाले.

आज त्या दिवसाला बरोब्बर ३४५ वर्षे पूर्ण झाली. मराठयांच्या प्रेरणादायी इतिहासातील या सोनेरी पर्वाचा साक्षीदार असलेला केंजळगड शिवरायांच्या आणि त्यांच्या सवंगड्यांच्या पराक्रमाच्या आठवणी उराशी बाळगून ताठ मानेने आजही उभा आहे.

©पराग लिमये
दि २४ एप्रिल २०१९

चौगावचा विजयगड व श्री क्षेत्र त्रिवेणी मंदिर










चौगावचा विजयगड व श्री क्षेत्र त्रिवेणी मंदिर
जळगाव जिल्ह्यात प्राचिन वैभवसंपन्न राजघराण्यांचा वारसा सांगणारे काही गडकोट आहेत व ते आवर्जून पाहाण्यासारखे आहेत.यावर कोणाचाही चटकन विश्वास बसणार नाही.अशा या गड किल्ल्यांच्या द्रुष्टीने फारसा ऐकिवात नसलेल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सातपुडाच्या पहिल्याच रांगेत एका उंचच उंच कड्यावर कधी काळी घोर गर्द जंगल असलेल्या जंगलभागात हिरमुसले तोंड करून दुर्ग विरांची व पुरातत्व विभागाची आतुरतेने वाट पाहात बसलेला  चौगावचा विजयगड उभा आहे..

प्राचीन काळापासून मध्यप्रदेशात जाणार्या भिराम घाट या डोंगरी भागावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या चौगावच्या विजयगडाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच होते.असा हा प्राचीन काळाशी धागेदोरे जोडणारा चौगावचा किल्ला समुद्र सपाटी पासुन 660 मीटर उंचीवर उभा असुन तो चौगाव गावापासुन उत्तरेला असणार्या सातपुडा डोंगराच्या पहिल्याच रांगेत उभा विराजमान आहे.
चोपड्यापासून नऊ कि.मी.अंतरावर पश्चिमेला चौगाव गाव असून चौगाव पासून साधारण चार कि.मी.उत्तरेला चारचाकी किंवा दुचाकी वाहणाने आपण गडाशेजारच्या महादेव मंदिराशेजारी येऊन पोहचतो.या ठिकाणी तीन प्रवाहीत ओढ्यांचा संगम असल्यामुळे यास त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जाते येथे काही शतकापुर्वीचे बांधेले सुंदर असे प्रशस्त महादेवाचे मंदिर आहे.या मंदिराभोवती जंगलात भरपुर सरपण व ओढ्याला पावसाळ्यात नेहमी थंडगार पाणी असल्यामुळे तसेच अलिकडच्या काळात मोठे पत्री शेड उभारण्यात आल्याने हे मंदिर दुर्गभटक्यांना पथार्या पसरायला योग्य आहे.त्रिवेणी संगमाच्या या गाभार्यात शिवलिंग,पंच मुखी हनुमान,गणपती व नंदी सभोवार असणारे खांब व त्यावर तोललेल्या कमानी तसेच मंदिराच्या संमुख भागात संस्क्रुत भाषेत असलेली कोणशिला जुन्या परंपरेला साजेशा अश्याच आहेत.
आपण मंदिर परीसर पाहून शेजारील ओढा पार करून मळलेल्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण एका पठारावर येऊन पोहचतो.येथे समोरच उत्तरेस आपणास खुरट्या झाडी -झुडपाने व्यापलेला चौकोणी आकाराचा चौगावचा विजयगड दिसतो.या किल्ल्याच्या आसपास अनेक छोटे मोठे डोंगर असून त्यांना काली टेकडी,बांदरा डोंगर लहाण चिपाट्या म्हणून ओळखले जाते.येथिल पठारावरून आपण गडाशेजारी जाऊन पोहचतो.चौगावचा किल्ला जरी उंचीने थोडका असला तरी याचा अंतिम कातळटप्पा सभोवार विस फुटाचा ताशीव असाच आहे.त्रिवेणी संगम मंदिरापासुन चालायला सुरवात केल्यानंतर साधारण तासाभरात आपण गडाच्या पुर्वाभिमुख प्रवेशद्वाराच्या समोर येऊन पोहचतो.सुबक घडीव अशा आयताक्रुती दगडात बांधलेले हे प्रवेशद्वार आजही उत्तम स्थितीत उभे असुन त्याच्या माथ्याची कमान फारच सुंदर आहे.प्रवेद्वाराच्या बाहेरूनच डाव्याबाजूला एक पायवाट असुन अगदी हाकेच्या अंतरावर दोन भुयारी टाक्या आहेत.त्यातील एका टाकीत खाली उतरल्यावर दुरवर कायम थंडगार पाणी भरलेले असते.तर बाजूलाच दुसरी भुयारी टाकी आहे तिला उंबरची टाकीही म्हणतात.तेथेही खाली उतरल्यावर 20 ते 25 फुट स्टार्च लावून भुयारी मार्गाने पुढे जावे लागते.आत गेल्यावर तेथे आई भवानीची मुर्ती द्रुष्टीस पडते.आत बसण्यासाठी मोकळीक आहे.तेथून परत प्रवेद्वाराकडे येऊन या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर चौगाव गडाचा झाडी भरला माथा आपणास दिसतो .गड प्रवेश केल्याकेल्या समोरच एक कोरडा तलाव असुन तो पार करून पुढे गेल्यावर डाव्या हाताला झेंडा बुरूज लागतो.या बुरूजाभोवतीची तटबंदी आजही उत्तम स्थितीत उभी असुन येथेच आसपास भिंती शाबुत असलेली शिबंदीची घरटी आपणास दिसतात.ही घरटी पाहून पुढे गेल्यावर एका झाडाखाली कोरीव सुघड दगड एकत्र करून रचलेले दुर्गादेवीचे अर्धवट मंदिर पाहावयास मिळते.या छोट्या मंदिरात देवीचा मुळ तांदळा व अलिकडे बसवलेली मुर्ती असुन परीसरात अनेक इतस्तत: पडलेले कोरीव दगड आपणास दिसतात.या दगडांवरून येथील इतिहास काळातील मंदिर काही वेगळेच असणार याची आपणास थोडीफार कल्पना येते.या मंदिराच्या पुढेच थोडे खालच्या बाजूस झाडी भरल्या भागात दगडात कोरीव टाक्यांचा समुह असुन  या टाक्यांतील पाणी गड चढाईचा थकवा घालविणारे आहे.या टाकी समुहात मधोमध दगडाच्या भिंती असुन त्यावरून आपण ईकडे तिकडे फिरू शकतो.या टाक्यांना लागून चार कमानीयुक्त गुहालेणी आहेत.
गडावरील हा टाकी समुह पाहून आपण एक चढ चढून उत्तरेकडील उंचवट्यावर बांधलेल्या राजप्रसादाच्या इमारतीजवळ पोहचतो.येथिल वाड्यास या भागातील लोक गवळी राजांचा राजप्रसाद म्हणून ओळखतातचौगाव किल्ल्यावरील या वाड्याच्या सभोवती विस ते पंचवीस फुट उंचीच्या दगड व  चुन्याच्या मदतीने बांधलेल्या भिंती आजही उत्तम स्थितीत उभ्या आहेत.विशेष करून या भिंतींच्या माथ्यावर दोन टप्प्यात केलेले नक्षीकाम फारच सुंदर असुन असे काम इतरञ कोणत्याही किल्ल्यावर पाहावयास मिळत नाही .त्यामुळे हे राजप्रसादावरचे विटांचे नक्षीकाम आपल्यासाठी संस्मरणीय ठरते.पुर्व बाजूने प्रवेश्द्वार असलेल्या या वाड्याच्या आत गेल्यावर समोरच एक भिंत असुन तिला वळसा मारून आत प्रवेश केल्यावर या वाड्याची भव्यता आपल्या नजरेस भरते.या वाड्याच्या आतील बाजुस अनेक दालने ,देवळ्या व कोनाडे आजही आपले अस्तित्त्व टिकवून असुन हा सर्व परीसर पाहील्यानंतर गड नांदता असतांना या राजप्रसादाचा डामडौल किती न्यारा असेल याचे चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभे रहाते.याच्याच पश्चिमेला पावसाळ्यात सहाशे मीटर उंचीचा धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहात असतो.हा रोहर्षक नजारा पाहाण्यासाठी खास करून पावसाळ्यात अनेक भागातून पर्यटक या ठिकाणी येत असतात.या वाड्यासमोरील मोकळ्या जागेत सहा फुट लांबीच्या ऐतिहासिक तोफा सन 1977 साली सापडल्या असुन त्या चोपडा तहसिलदार कचेरीच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत.गडाच्या उत्तरेस खालच्या बाजूस गडाचे दुसरे प्रवेशद्वार असुन त्याला डोंगरी दरवाजा म्हणतात.
असा हा चौगावचा विजयगड जळगाव जिल्ह्यातील आवर्जून पाहावा अशा किल्ल्यांपैकी एक असुन परीसरात अनेक वन्य प्राणी ,पक्षी द्रुष्टीस पडत असुन अस्वल,मोर, हरण,जंगली डुक्कर,तडस,ससे आदि प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.पावसाळ्यात खास करून श्रावण महिण्यात या ठिकाणी दुर्ग प्रेमी पर्यटकांची मोठी वर्दळ असते.श्रावनी सोमवारला या भागात यात्रेचे स्वरुप प्राप्त होते.
      विश्राम तेले
उपाध्यक्ष, वन व्यवस्थापण समिती चौगाव
तालुका संपर्क प्रमुख,निसर्ग मित्र समिती चोपडा
मो.9823985631

देवगिरी, दौलताबाद किल्ला !!

!! श्री श्री श्री शिवछत्रपतयं नम: !!🚩

⛳!! सह्याद्रीतील पर्वत रांगा !!⛳
!! आजचा किल्ला :-

किल्ल्याचे नाव :- देवगिरी (दौलताबाद)
गुणक :- ●●●●●
ऊंची :- 2975
प्रकार :- गिरीदुर्ग   
श्रेणी :- मध्यम
ठिकाण :- महाराष्ट्र, भारत
जिल्हा :- औरंगाबाद
तालुका :- औरंगाबाद
जवळचे गाव :- औरंगाबाद
पायथ्याचे गाव :- ●●●●●
डोंगररांग :- देवगिरी
सध्याची अवस्था :- व्यवस्थीत
स्थापना :- {{{स्थापना}}}
   
भौगोलीक स्थान :-

भारतातील महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यामधील हा एक किल्ला महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश आहे. याच महाराष्ट्रातील काही उत्तम किल्ल्यांमध्ये देवगिरी किल्ल्याची गणना होते. सभासदाने याचे वर्णन ‘‘ दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका ’’असे केलेले आहे. या देवगिरी पूर्वी "सुरगिरी" या नावाने देखिल ओळखला जात असे. राजा भिल्लम यादवाने बांधलेल्या या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि एश्वर्य इंद्रनगरीशी स्पर्धा करीत होते, असेही देवगिरीचे वर्णन आढळते. या देवगिरीची "देवगड व धारगिरी" अशी ही नावे आढळतात. पुढे मोगलांचे यावर आक्रमण झाल्यावर याचे नाव ‘ दौलताबादचा किल्ला ’ म्हणून प्रसिध्द झाले.

देवगिरी किल्ल्यावर पाहाण्याची ठिकाणे :-

किल्ल्याच्या पायथ्याला पूर्णपणे सपाट प्रदेश आहे. या प्रदेशात अनेक उध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष आहेत. या भागाला ‘कटक ’ म्हणत असत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल चाले. सध्या या परिसरात दौलताबाद गाव वसलेले आहे. दौलताबादला एकुण मिळून चार कोट आहेत. सर्वात बाहेरचा आहे तो ‘ अंबरकोट ’ या कोटाची बांधणी निजामशाही सरदार ‘मलिक अंबर ’ याने केली आहे. सध्या दौलताबाद गावा भोवती या कोटाचे अवशेष आढळतात. या कोटाच्या आतमधील तटबंदीला ‘ महाकोट ’ असे म्हणतात. हा महाकोट म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट. या भुईकोटा मध्ये किल्ल्याचे खुप अवशेष आहेत. यानंतर येते ती किल्ल्याची मुख्य तटबंदी ‘ कालाकोट ’. कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे खुद्‌द किल्ला व त्याच्यावर असणारी तटबंदी. अंबरकोटला पूर्वीच्या काळात सात वेशी होत्या. या वेशींना आजुबाजुच्या गावांची नावे होती. यापैकी ‘ लासूर वेस ’ एक जी लासूर गावाकडे तोंड करुन उभी आहे.

१) किल्ल्यातील वास्तू :- 
आज आपण ज्या प्रवेशद्वारातून आत शिरतो, त्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. सर्व तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस खंदक खोदलेला दिसतो. हा खंदक संपूर्ण महाकोटाच्या तटबंदीच्या बाजूने फिरवलेला आहे. सध्या यावर एक छोटासा पूल बांधलेला आहे. त्यावरुन आत शिरल्यावर आपण दोन तटबंदीच्या मधल्या भागात येतो. या दोन तटबंदीमधील अंतर १०० फुटांपेक्षा जास्त असावे. याच्या मध्येच किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. या पहिल्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. याला मोठाले, ज्यांची लांबी १२ सेंमी एवढी आहे, असे खिळे बाहेरुन लावलेले आहेत. आतल्या बाजूस काटकोनात शिरल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. या द्वारातून आत शिरल्यावर आपण एका चौका सारख्या भागात येतो. हा चौक म्हणजे गडाचा दुसरा आणि पहिला दरवाजा यामधील जागा. या चौकात उजवीकडे पहारेकर्‍यांच्या ५ ते ६ खोल्या आहेत. त्यावर सध्या गाड्यांवर वर असणारी तोफ ठेवलेली आहे. समोरच्या काही खोल्यांमध्ये ‘सुतरनाळ ’ या प्रकारच्या काही तोफा ठेवलेल्या दिसतात. जर शत्रु या चौकात चुकुन आला तर तो संपूर्णपणे मार्‍याच्या टप्प्यात येइल अशी सर्व योजना येथे केलेली दिसते. दुसर्‍या दरवाजाच्या पायथ्याशी गरुडाचे शिल्प आहे. या दरवाज्याला सुध्दा पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. या देवड्यांच्या मागून एक रस्ता दुसर्‍या प्रवेशद्वाराच्या बुरुजावर आणि बाजूच्या तटबंदीवर जातो. येथून ज्या चौका मधून आपण आलो तो चौक दिसतो. समोरील तटबंदीपाशी काही शिल्पे ठेवलेली दिसतात. या अवशेषांवरुन आपण असा अंदाज करु शकतो की, ही सर्व शिल्पे मंदिराची असावीत आणि नंतरच्या काळात या सर्व शिल्पांचा तटबंदी, बुरुज याला लागणार्‍या दगडांसाठी करण्यात आला. किल्ला फिरत असतांना आपल्याला अनेक ठिकाणी असे शिल्प असणारे दगड तटांमध्ये, बुरुजांमध्ये बसविलेले आढळतात. हे पाहून झाले की किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाज्यातून आत शिरायचे. या दरवाजाच्या कमानीच्या बाजूला दोन पुरुषभर उंचीचे जोते आहेत. समोर जैन मंदिरे आहेत, एक दिपमाळ आहे. पुढे उजवीकडे एक देऊळ आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवी कडे एक वाट जाते. या वाटेत एक भली मोठी तोफ पडलेली दिसते. थोड्याच अंतरावर कमानी आणि विटांनी बांधलेली विहिर आहे. विहीरीत उतरण्यासाठी पायर्‍यांची सुध्दा व्यवस्था केलेली दिसते. याच्या मागील बाजूस कमानींच्या काही इमारती आहेत. हे सर्व पाहून पुन्हा माघारी दरवाजापाशी यायचे आणि समोरची वाट धरायची.

२) हत्ती तलाव :- 
मुख्य वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर उजवीकडे काही खोल्या दिसतात. या खोल्यांच्याच बरोबर विरुध्द दिशेला म्हणजेच मुख्य वाटेच्या डावीकडे काही पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर समोर लांबी-३८ मी * रुंदी-३८ मी * खोली- ६६मी. असलेला हौद आहे. एकुण १०,००० घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता यात आहे. या हौदाच्या आकारावरुन संपूर्ण किल्ल्याची पाण्याची व्यवस्था याच हौदातून होत असावी असे वाटते.

३) भारतमाता मंदिर :-
या हौदाच्या मागील बाजूस एक मोठी वास्तू आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराकडे जाणार्‍या वाटेवर अनेक शिल्पांचा खच पडल्याचे दिसून येतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांचे खांब बाहेरच्या बाजूने (‘नळदुर्गाच्या’ नऊ पाकळ्यांच्या बुरुजा सारखे) आहेत. या मंदिराच्या आत शिरल्यावरच त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येते. याच्या प्रांगणाचे छत गायब आहे. मात्र सर्व खांब शिल्लक आहेत. एकंदर मंदिराच्या अवशेषांवरुन ते यादवकालीनच असावे असे वाटते. मंदिराच्या आत मध्ये ‘भारतमातेची’ भव्य मुर्ती आहे.

४) चॉद मिनार :-
भारतमाता मंदिराच्या समोरच १०० मी. उंचीचा एक मनोरा आहे. इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजया प्रित्यर्थ हा मनोरा बांधला असे म्हणतात. या मनोर्‍याचे बांधकाम इराणी पध्दतीचे आहे. आत मधून वर पर्यंत जाण्यास गोलाकार जिना आहे. मध्ये जागोजागी हवा आणि उजेडासाठी झरोके सुध्दा आहेत. सध्या या मनोर्‍यामध्ये जाण्यास बंदी घातली आहे. या चॉद मिनारच्या मागच्या बाजुस काही इमारतींचे अवशेष दिसतात. इथे काही राजवाडे, मशिदी होत्या. काही ठिकाणी हमामखाना असल्याचे सुध्दा दिसते. यापैकी एका इमारती मध्ये किल्ल्यातील सर्व वास्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या आहेत. इथे तोफा, मंदिरांवर आढळणारी सर्व शिल्प ठेवलेली आहेत. इथे सुंदर बगीचा देखील बांधला आहे. हे सर्व पाहून पुन्हा मुख्य रस्त्याला लागायचे आणि समोरची वाट धरायची. आता हळूहळू मुख्य देवगिरी कडे वाटचाल करायला सुरुवात करतो. समोरची तटबंदी दिसते ती ‘कालाकोट’ ची. या तटबंदीला जाण्या अगोदर उजवीकडे हेमाडपंथी मंदिराचे भग्नावशेष दिसतात. यामधील खांब आजही व्यवस्थित शिल्लक आहेत. मोगलांच्या काळात ह्या मंदिराचे रुपांतर मशिदीमध्ये केलेले दिसते. या तटबंदीला डावीकडे ठेवत थोडे पुढे गेले की अनेक पडझड झालेल्या वास्तू नजरेस पडतात.

५) कालाकोट देवगिरी :-
कालाकोटच्या तटबंदी मधील पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. यामधून आत शिरल्यावर मुख्य देवगिरी किल्ल्याच्या चढणीला सुरुवात होते. आत शिरल्यावर वाट उजवीकडे वळते, या वाटेवरच सैनिकांना राहण्यासाठी दालन आहे. याच्या पुढे दुसरे प्रवेशद्वार आहे याचे नाव ‘दिंडी दरवाजा’ याची लाकडी दारे अजुनही शिल्लक आहेत. पुढे पुन्हा पहारेकर्‍यांच्या देवड्या, मग पायर्‍या लागतात. या सर्व पायर्‍या चढून गेल्यावर वर एक पडलेल्या अवस्थेतील वाडा लागतो, याचे नाव ‘चिनीमहाल’. हा वाडा दुमजली असावा, असे त्याच्या बांधणीवरुन वाटते. या वाड्याचा उपयोग कैदीखाना म्हणून केला गेला. पुन्हा मागे येऊन डावीकडे वळायचे, इथे आणखी एक वाडा आहे, याचे नाव ‘निजामशाही वाडा’. यात अनेक खोल्या आणि दालने आहेत. एकंदर वाड्याच्या आकारमानावरुन खरोखरच इथे राजेशाही थाट असावा असे वाटते. या वाड्यातील कोरीव काम सुध्दा अप्रतिम आहे. वाडा पाहून एक वाट वाड्याच्या मागच्या बाजूस असणार्‍या लेण्यांकडे जाते. या किल्ल्यावर एकूण दोन लेणी समूह आहेत. लेणी पाहून पुन्हा निजामशाही राजवाड्यापाशी जाता येते. वाड्याच्या समोरच बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे, हीचे नाव मेंढा तोफ. या तोफेची लांबी २३ फुट आहे ही तोफ चौफेर फिरवता येइल अशा पध्दतीने बसविलेली आहे. या तोफेवर असणार्‍या लेखात तिला ‘किल्ला शिकन’ म्हणजेच किल्ला उध्वस्त करणारी तोफ म्हटलेले आहे. या तोफेच्या मागच्या बाजूस असलेल्या मेंढ्याच्या तोंडामुळे याला मेंढा तोफ म्हटले जाते. हा बुरुज केवळ या तोफेसाठीच बनविलेला असावा असे वाटते. या बुरुजावरुन देवगिरी किल्ल्याच्या भोवती असणारा खंदक दिसतो. हा खंदक डोंगरातच कोरुन काढलेला आहे. याची रुंदी २० मी आहे. खंदक ओलांडून जाण्यासाठी पूलाचा वापर करावा लागतो. येथे सध्या दोन पूल आहेत. यापैकी एक जमिनीच्या पातळीवर लोखंडी पत्र्यापासून बनविलेला, तर दुसरा खाली दगडांचा बनविलेला. यापैकी दगडांचा पूल जुना आहे. खंदकाची पाण्याची पातळी राखण्यासाठी येथे दोन बंधारे सुध्दा बांधलेले आहेत. शत्रु किल्ल्याची अगोदरची अभ्येद्य तटबंदी फोडून पुलाजवळ आला की, बंधार्‍यातून एवढे पाणी सोडण्यात येइ की तेव्हा हा दगडांचा पूल पाण्याखाली जात असे जेणेकरुन शत्रुला किल्ल्यात प्रवेश करता येत नसे. खंदकाच्या तळापासून डोंगरकडा शेदोनशे फुट चांगलाच तासून गुळगुळीत केलेला दिसतो. पुलावरुन पलिकडे गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार आहे. वाट एवढी निमूळती आहे की, दहा बाराच्या संख्येच्या वर येथे माणसे उभी सुध्दा राहू शकत नाहीत. येथून पुढे जाणारी वाट कातळातच खोदलेली आहे. वाट एका चौकात येऊन संपते. समोर गुहे सारख्या अंधार्‍या खोल्या दिसतात आणि इथून चालू होतो देवगिरीचा ‘भुलभुलय्या’ मार्ग. या भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार लेण्यासारखेच दिसते. या द्वारावर पुढे काही किर्तीमुखेही आहेत .आत गेल्यावर एक निमुळता चौक दिसतो. तो उघडाच आहे. यावर छत नाही तो ४ ते ५ माणसे मावतील एवढाच आहे, त्यामुळे तिथे पोहचल्यावर उजवीकडच्या पायर्‍यांनी ओट्यावर चढावे लागते. कारण चौकात आल्यावर ओट्यावर चढणे हा एकच मार्ग आहे. शत्रूची फसवणूक करण्यासाठी हा मार्ग बनविलेला आहे. येथे उजवीकडच्या कातळात एक खिडकी आहे. चुकुन शत्रु इथपर्यंत आला तर पुढे या अंधारी मार्गाच्या चकव्यात पडण्यासाठीचा हा चोरवाटे सारखा दिसणारा मार्ग ठेवलेला आहे.या खिडकी खाली दोन पायर्‍या खोदलेल्या असून तिथून सरळ खाली खंदकात पडण्याची सोय केलेली आहे. पण खरा भुयारी मार्ग तर डावीकडे आहे. एवढेच नव्हे तर वर काही काही ठिकाणी भुयारी मार्गात कातळातील खिडक्या आहेत. याचा उपयोग वर असणार्‍या सैनिकांना शत्रूवर दगडधोंडे टाकण्यासांठी होत असे. हा सर्व भुयारी मार्ग ५० ते ६० मी लांबीचा आहे. पुढे या भुयारी मार्गातूनच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍या चढून वर गेल्यावर शेवटच्या ठिकाणी जिथे आपण वरच्या टप्प्यावर पोहचतो, तिथे एक तवा ठेवलेला असायचा. त्यावर गरम तेल व मिरच्या ओतून हा धूर या अंधारी मार्गात सोडण्यात येत असे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युक्त्या करुन हा किल्ला जेवढा अभेद्य बनवता येइल तेवढा बनवला होता. एकंदर पाहाता हा किल्ला एवढा अभेद्य, दुर्गम आणि भक्कम आहे की त्याला सरळमार्गाने जिंकूण घेणे कठीणच होते.
भुयारी मार्गातून एकदा किल्ल्यावर आले की पुन्हा कातळकड्यात खोदलेल्या पायर्‍या लागतात. थोडे वर चढून गेले की गणेशाचे मंदिर आहे. एकंदर मंदिराच्या बांधणीवरुन हे मंदिर अलिकडच्या काळातील असावे. प्रथम वंदितो तुज गणराया असे म्हणून गणेशाचे दर्शन घ्यायचे आणि वरच्या पायर्‍या चढायला लागायचे. १५० पायर्‍या चढून गेल्यावर एक अष्टकोनी इमारत दिसते. या इमारतीला ‘बारदरी’ असे म्हणतात. मोघल सुभेदाराची राहण्याची ही जागा होती. इमारत खुप प्रशस्त आहे. डावीकडील जिन्याने वर गेले की इमारतीचा पहिला माळा लागतो. इथे घुमटाकृती छत, जाळीच्या खिडक्या, अष्टकोनी खोल्या आणि सज्जा असे सर्व प्रकार पहावयास मिळतात. बारदरीच्या उजवीकडे एक दरवाजा आहे, तो आपल्याला बिजली दरवाजापाशी घेऊन जातो. याच्या थोडे पुढे चालत गेल्यावर एक भला मोठा बुरुज लागतो. याच्या पोटात एक गुहा सुध्दा आहे. त्यात डावीकडच्या बाजूस जनार्दनस्वामींच्या पादुका आहेत. तर उजवीकडे कोपर्‍यात पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यावर लाकडात बसविलेली ‘काला पहाड’ नावाची तोफ सुध्दा आहे. गुहेपासून सुमारे १०० पायर्‍या चढून गेल्यावर बुरुजाच्या माथ्यावर पोहचतो, यावर एक तोफ आहे. जिची लांबी २० फुट आहे. हीचे नाव दुर्गा किंवा ‘धूळधाण’तोफ आहे. या बुरुजावरुन किल्ल्याचा संपूर्ण घेरा नजरेस पडतो. किल्ल्याच्या अंबरकोटाची तटबंदी खूप लांबवर पसरलेली दिसते. देवगिरीचा किल्ला हा मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. अनेक शाह्यांनी यावर राज्य केले, पण आज मात्र सर्व शांत सर्व इमारती मूक झालेल्या दिसतात. किल्ला व्यवस्थित फिरण्यास सात आठ तास लागतात.

देवगिरी किल्ल्यावर पोहोचण्याच्या वाटा :-

देवगिरीचा किल्ला औरंगाबाद - धुळे रस्त्यावर औरंगाबाद पासून १५ किमी अंतरावर आहे. या दौलताबादला जाण्यासाठी औरंगाबाद-धुळे, औरंगाबाद - कन्नड, चाळीसगाव, खुलदाबाद अशी कोणतीही एसटी चालते. या शिवाय औरंगाबादहून अनेक खाजगी जीप आणि वाहने दौलताबादला जातात.

देवगिरी, दौलताबाद किल्ल्यावर राहण्याची,जेवणाची,पाण्याची सोय व लागणारा वेळ,अंतर तसेच योग्य कालावधी व सुचना :-


राहाण्याची सोय :-
किल्ल्यात राहण्याची सोय नाही. औरंगाबादला राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय :-
किल्ल्याच्या समोर खाण्यासाठी हॉटेल्स आहेत.

पाण्याची सोय :-
किल्ल्यात पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :-
औरंगाबादपासून अर्धा तास.

अंतर :- औरंगाबाद पासुन देवगिरी,दौलताबाद किल्ला हा १६ कि.मी. आहे.

जाण्यासाठीचा उत्तम कालावधी :- ●●●●●

सूचना :-
औरंगाबादहून देवगिरी , खुलदाबाद येथील औरंगजेबाची कबर , वेरुळची लेणी आणि औरंगाबादची पाणचक्की ही ठिकाण एकाच दिवसात पाहाता येतात. दररोज औरंगाबादहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सहल (गाइडेड टूर) या ठिकाणांना जाते.

स्वराज्य९६
#मराठा हा शब्द स्वराज्यातील तमाम रयतेसाठी आहे याची नोंद घ्यावी.शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहितीसाठी पेज लाईक करा*
👉https://www.facebook.com/sachin.parate.33





देवगिरी, दौलताबाद किल्ला !!

पूर्णगड, रत्नागिरी



पूर्णगड, रत्नागिरी

मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इ.सं. १७२४ मधे पूर्णगड किल्ला बांधला असावा अशी माहिती आंग्रे शकावलीत आहे. गडावर गेल्यावर मुख्य दरवाजा लगेच दिसतं नाही. जवळचं हनुमानाचं मंदिर ही इथली महत्वाची खूण आहे. उत्तम बांधणीचा पूर्णावस्थेतील भक्कम महादरवाजा जांभ्या दगडातील असून त्यावर मधोमध चंद्रसूर्य व गणेशाची प्रतिमा कोरली आहे. दरवाजातून आत गेल्यावर देवड्या दिसतात.

दक्षिणेकडे सुरुच्या दाट बनांनी झाकलेला गावखडीचा निर्मनुष्य समुद्रकिनारा या ठिकाणाहून खूप सुंदर दिसतो. गडावरील सर्व वास्तू तटबंदीवर उभं राहून नीट दिसू शकतात.

दरवाज्याशेजारून बांधीव पायऱ्यावरून तटबंदीवर जाता येते. तटबंदीवर पोहोचल्यावर नजरेसमोर येतो तो अथांग सागर व मुचकुंदी नदीची खाडी

बुरुजात व तटबंदीत बंदुकी व तोफांचा मारा करण्यासाठी ठिकठीकाणी जंग्या आहेत. याच तटबंदीमधून सागराकडे जाणारा १० फूट उंचीचा रेखीव कमानीचा दरवाजा आहे.

कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाल्यावर इ.सं. १७३२ मधे पूर्णगड पेशव्यांकडे आला. त्याकाळांत त्यांनी गडावरील कारभारासाठी जे अधिकारी नेमले होते त्यांचे वंशज आजही किल्ल्यावर वास्तव्य करून आहेत. १८१८ मधे पेशव्यांची सत्ता संपल्यावर किल्ला इंग्रजांकडे आला असा किल्याचा इतिहास आहे. पूर्णगड जवळून पावस, गणेशगुळे, कशेळी सूर्यमंदिर, आडीवरे महालक्ष्मी मंदिर, साटवली किल्ल्या अश्या ठिकाणी भेट देता येते.

मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर सुमारे दोन एकरावर वसलेला पूर्णगड हा सागरीदुर्ग ५० मीटर उंचीवर आहे. उत्तर दक्षिण पसरलेला हा किल्ला समुद्रातील व्यापारी जलमार्गावर खाडीमुखाशी अगदी मोक्याच्या ठिकाणी वसला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावसपासून ७ किमी. अंतरावर हा किल्ला आहे. तिथपर्यंत स्थानिक किंवा खासगी वाहनाने पोहोचता येते. गडावर फक्त २० मिनिटात चढून जाता येते मात्र जाताना गावातून जाण्याऱ्या रस्त्याचा वापर करावा.

Wednesday, 24 April 2019

किल्ले अजिंक्‍यतारा

किल्ले अजिंक्‍यतारा
सातारचा किल्ला (अजिंक्‍यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्‍यतारा. सातार्‍याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसर्‍या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्‍नी चांदबिबी येथे कैदेत होती. शिवाजीच्या राज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातार्‍याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणार्‍या मोगलांवर ढासळला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण आझमतारा झाले .ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर अजिंक्‍यतारा केले., पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छ.शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली. दुसर्‍या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.

Monday, 22 April 2019

तुळशीबाग

तुळशीबाग
तुळशीबाग संस्थानचे मूळ संपादक नारो आप्पाजी हे पुणें प्रांताचे सरसुभेदार असून, पेशवाईंतील दोनचार आणीबाणीच्या प्रसंगी यानीं विशेष प्रकारची कामगिरी केलेली आहे. हे मूळ सातार्‍याखालील पाडळी गांवचे वतनदार कुलकर्णी असून, यांचें उपनांव खिरे हें होय. बालपणीं कांहीं तंटेबखेडे होऊन हे रुसून पुण्यास आले व खाजगीवाले यांच्या आश्रयास राहिले. त्यावेळीं हल्लींच्या तुळशीबागेच्या ठिकाणीं खरोखरीचा `तुलसीबाग’ असून, त्याचें स्वामित्व खासगीवाल्यांकडे होतें. नारायणाकडे ह्या बागेंतील तुळशी वगैरे तोडून आणण्याचें काम असे, त्याची तरतरी पाहून खासगीवाल्यांची नारायणावर मर्जी बसली व पुढें त्यानीं `तुळशीबाग’ त्यास बहाल केला. लागलीच नारोपंतानें तुळशीबागेंत श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करून, त्याच्या सेवेंत राहण्याचा क्रम आरंभिला. पुढें कर्मधर्मसंयोगानें जमाबंदीच्या मुख्याच्या जागीं याची नेमणूक झाली. अण्णाजी दत्तो याच्यानंतर जमाबंदीची व्यवस्था चांगल्याप्रकारें नारोपंतानेंच केली. त्र्यंबकेश्वरी मुक्काम असतांना गौतमाश्रमींच्या एका सत्पुरुषाच्या कृपेनें नारोपंतास श्रीराम व जानकी अशा दोन मूर्ती मिळाल्या व त्यांचीच आपल्या तुळशीबागेंत शके १६८३ च्या सुमारास त्यांनीं मोठ्या समारंभानें स्थापना केली. लक्ष्मणाची मूर्ति बखतराम नामक सुप्रसिद्ध कारागिराकडून मुद्दाम तयार करविली. तुळसीबाग संस्थानास पेशवे सरकार यांची पहिली देणगी शके १६८५ त मिळाली. नारोपंताचा पुत्र रामचंद्र हा होळकराच्या दंग्याच्या वेळीं हयात होता. [भा.इ.मं. इतिवृत्त १८३७].

Friday, 12 April 2019

पुण्याच्या पेठा भाग 3


पुण्याच्या पेठा
भाग  3
पुढे १७५९ साली नानासाहेब पेशवे यांनीही आपल्या वडीलांप्रमाणेच पुण्याचा विकास सुरु ठेवला. सर्वात प्रथम प्राधान्य त्यांनी पुण्याच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला दिला आणि पुण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यासाठी त्यांनी पुण्याच्या बाहेर कात्रज येथे मोठा तलाव बांधला. तिथुन खापरी नळांद्वारे पाणी पुर्ण पुण्यात, शनिवारवाड्यात फिरविले. जागोजागी मुख्य ठिकाणी मोठे हौद बांधले. त्यांना कला हौद, फडके हौद, गणेश हौद, बदामी हौद, शुक्रवार हौद, अशी नावे दिली आणि त्यात या नळांद्वारे आणलेलं पाणी सोडलं. त्यामुळे भरपूर पाणी पुण्याला उपलब्ध झाले. हे काम तब्बल आठ वर्षांनी संपले.

पुण्यातील आपल्या निवास स्थानालाही एक कोट बांधुन त्याला एखाद्या भव्य राजवाड्याचे स्वरूप प्राप्त करून दिले. पर्वतीचेही काम सुरु होतेच. १७४८ साली त्यांनी शुक्रवार पेठेचा आणखी विस्तार केला. त्यानंतर त्यांनी जिवाजीपंत खासगीवाले यांना व्यापाऱ्यांची पुण्यात होत असलेली वाढ पाहुन एकदम पाच पेठा वसवण्यास सांगितल्या आणि त्या पेठांचे गुरुवार पेठ, गंजपेठ, मजफर पेठ, न्याहाल पेठ असे नामकरण केले आणि त्या पेठांमध्ये व्यापाऱ्यांना आपले व्यवहार सुरु करण्यास सांगितले. १७५१ साली पेशव्यांनी आपल्या चुलत बंधु, सदाशिवराव भाऊ यांच्या नावे पेठ वसविली. हीच ती सुप्रसिद्ध सदाशिव पेठ

व्यापार वाढीच्या दृष्टीने पेशव्यांनी अनेक पाऊले उचलली. त्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला तो म्हणजे जकात माफीचा! तब्बल सात वर्षे पुण्यात व्यापाऱ्यांना जकात माफ केला होता आणि याचा फायदा असा झाला की, पुण्यातील व्यापाऱ्यांची उलाढाल वाढण्यासोबतच बाहेरूनही अजुन व्यापारी पुण्यात येऊ लागले आणि पुणे शहर गजबजून गेले. पुढे १७५५ साली आपले आराध्य श्री गजाननाच्या नावे त्यांनी गणेश पेठ वसविली. त्यानंतर काही महिन्यात नानासाहेबांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव नारायण असे ठेवण्यात आले. पुत्रप्राप्तीच्या आनंदात नानासाहेबांनी सदाशिव पेठेच्या शेजारीच नवीन पेठ वसवली आणि तिला आपल्या पुत्राचा नाव दिलं, नारायण पेठ! पुढे नानासाहेबांनी नाना फडणवीसांस आदेश देऊन पाण्याचे खापरी नळ काढुन दगडी नळ घातले. त्यानंतर नाना फडणवीसांनी सदाशिवपेठ आणि नारायण पेठेतही हौद आणि दगडी नळ बांधुन पाणी फिरवले.व्यापाऱ्यांच्या वृद्धीनंतर नगरवासीयांना राहत यावे यासाठी नानासाहेबांनी गोसावीपुरा, मेहुणपुरा, कामठपुरा हे तीन पुरे वसविली आणि त्यात लोकवस्ती वाढविली. फौजेतील लोकांना वस्तीसाठी लष्करीतळा जवळच परवानगी दिली. शुक्रवार पेठेत बावनखणी बांधुन कलावंतांनाही आसरा दिला.parvati hill साठी इमेज परिणाम