Followers

Tuesday, 13 August 2019

पाटेश्वर डोंगर

अदभूत शिवलिंग दर्शन..

महाशिवरात्र म्हणजे ‘देवलोकीची’ रात्र, असं म्हटलं जातं. माघ कृष्ण त्रयोदशीला येणा-या महाशिवरात्रीला विशेष महत्त्व असतं. पौराणिक ग्रंथांमधल्या संदर्भानुसार भूलोकावरचं एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकीचा एक दिवस. हा सांबशिवाचा विश्रांती काळ. महादेवानं रौद्र रूप धारण करून पृथ्वीवर अनंत शिवलिंग स्वरूपात जंगल, डोंगर, द-या, रानावनात व जलस्थळी, पाताळी अशा विविध ठिकाणी, विविध नावांनी ईश्वरी अद्भूत रूपात अवतरले. अशाच एका दुर्मिळ शिवलिंगांच्या समूह दर्शनावर टाकलेला प्रकाशझोत.

प्राचीन भारतीय संस्कृत व शिल्पकलेचा समृद्ध वारसा दर्शवणारी वैविध्यपूर्ण व मनोहारी अनोखी शिवलिंगं आपल्या उदरात जतन करत सह्याद्रीच्या कुशीत पाटेश्वरचा डोंगर शतकानुशतकं व्रतस्थाप्रमाणे उभा आहे. मात्र या अनमोल शिल्प शिवलिंग समूहाकडे इतिहास व पुराण अभ्यासक संशोधक यांसह शासनाचंही दुर्लक्ष झालेलं आहे.


मूळ नाव ‘पतेईश्वर’ असलेला हा ‘

समुद्र सपाटीपासून साधारण सव्वातीन हजार फुट उंचीचा हा डोंगर असून इथले वन्यजीव व पक्षांच्या किलबिलाटामुळे ही डोंगर चढाई प्रसन्न वाटते. डोंगरमाथ्यावरील गर्द झाडीत श्री पाटेश्वराचं मध्ययुगीन मंदिर, एक मोठी पुष्करणी, ‘व-हाड घर’ नावची प्राचीन लेणी आणि खोदीव टाक्या; असा हा सारा रम्य परिसर. प्रत्येक नजरेत अव्यक्त भावातून दिसणारी विविध रूपातली शिवलिंग, हेच नेमकं या स्थळाचं खरं वैशिष्टय़ म्हणावं लागेल.

या पूर्वाभिमुख लेण्यांमधून साकारलेल्या असंख्य शिवलिंगाच्या वाटय़ाला मात्र आजवर उपेक्षाच आली आहे. एकाच ठिकाणी स्थापन केलेली अथवा कोरलेली ही शेकडो शिवलिंगं म्हणजे एक दुर्मिळ योगायोग समजावा. पण संशोधनाअभावी प्राचीन सांस्कृतिक इतिहासावर प्रकाश टाकणारं हे स्थळ आज दुर्लक्षित राहिलेलं आहे.
श्री पाटेश्वर मंदिर, विस्तीर्ण पुष्करणी, वऱ्हाड घर लेणी, पायऱ्यांचा मार्ग अशा जागोजागी इथे शिवलिंग निर्मिती केलेली आढळते.

यातही काही स्थापित तर काही इथल्या दगडात कोरलेली आढळतात. इथे आढळणारी काही शिवलिंगं फारच विस्मयकारक आहेत. जवळच्याच एका चौकोनी तलावाच्या तटबंदीतून आत गुहेत प्रवेश केल्यावर गुहेत शिवलिंगावर नंद झोपलेला आहे व त्याच्या पाठीवर एक शिवलिंग आढळतं. शिवलिंगाच्या आकाराची भांडी, चूल, गायत्री यंत्र, आठ फुटांपासून ते सुपारी इतक्या विविध आकारांची अनेक आकारांमधली शिव शिल्पं आढळतात. नवग्रहांच्या ही पिंडी इथे असून त्या कोणत्या ग्रहाच्या आहेत, हे ओळखता यावं म्हणून शनीच्या चंद्राची कोर सूर्याच्या किरणाचं वलय इतर ग्रहांची वाहनं कोरलेली आढळतात.

असा हा विस्मयकारक शिवलिंग शिल्पांचा खजिना भारतीय संस्कृतीचा वारस अभ्यासक,इतिहासकारांना पर्वणी ठरू शकेल. अशा दुर्मिळ शिवलिंगांना इतिहासकारांनी, अभ्यासकांनी, शिवप्रेमींनी भेट दिल्यास हा दुर्मिळ खजिना उघड होईल.

‘पाटेश्वर’ या स्थळी आढळणा-या कमळ पुष्करणीच्या भूगर्भातल्या गुहेत एक विशेष विस्मयकारक शिवलिंग आढळतं, त्यास ‘काशीखंड’ या पुराण ग्रंथानुसार ‘बसवेश्वर’ असं संबोधलं जातं. ‘ब’ म्हणजे ‘ब्रह्मा’, ‘स’ म्हणजे ‘सदाशिव’, वे म्हणजे ‘विष्णू’ असून नंदीला प्राणीमात्र व पर्यावरणातला प्रमुख घटक म्हणून देवत्त्व प्राप्त झालं. यामुळेच शंकरापूर्वी नंदीचं दर्शन घेतलं जाण्याची प्रथा रूढ झाली.

      शब्दांना सत्याची धार
       ......  प्रहार .......
               वृत्तपत्र


पाटेश्वर डोंगर’ साता-यापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या देगाव (पूर्वीचं नाव ‘देवगाव’ अपभ्रंश होत-होत देगाव)च्या छोटय़ा खेडय़ातून श्री पाटेश्वराकडे जाणारी एक वाट आहे. इथल्या डोंगरावर देवाची वस्ती असल्याचं पूर्वापार मानत आल्यामुळे या गावाला ‘देगाव’ असं नाव पडलं. तसंच काही शे वर्षापूर्वीपर्यंत ‘देव’ आडनावाच्या लोकांची वस्ती असल्याचा इतिहास समजतो.

No comments:

Post a Comment